‘ओल्ड लेडी ऑफ थ्रेडनीडल स्ट्रीट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचा- ‘बँक ऑफ इंग्लंड’चा रंजक इतिहास..
नावात ‘ओल्ड लेडी’ आहे म्हणून दुर्लक्ष नका करू. तिच्याबद्दल जाणून घेणं खूप रोचक आहे. हे टोपणनाव आहे ३०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचं.. ‘बँक ऑफ इंग्लंड’चं! आपली जशी रिझव्र्ह बँक आहे, तशी ही इंग्लंडची. पण आपली आहे ‘यंग लेडी’.. अवघे ऐंशी वयोमान.
..तर साल १६९४! म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या थोडासा नंतरचा काळ. इंग्लंडचा राजा तिसऱ्या विल्यमचा फ्रान्सने दारुण पराभव केला होता. आपलं नौदल सुधारलं तरच भविष्यात आपला निभाव लागेल असं राजाला वाटलं. पण त्यासाठी खूप मोठय़ा रकमेची गरज होती. राजाकडे एवढा पैसा नव्हता. कर्जाऊ रक्कम मिळवण्याएवढी बाजारात त्याची पतही नव्हती. म्हणून ही बँक स्थापन करायचं त्यानं ठरवलं. खाजगी भागधारकांच्या या बँकेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या चार आठवडय़ांत हवी असणारी रक्कम जमा झाली. भागधारकांना आठ टक्के लाभांश देण्याचे ठरले. आणि ही बँक सरकारी झाली. राजानं (सरकारनं) बँकेला सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात चलनी नोटा इश्यू करण्याचे अधिकार दिले. बँकेनं राजाला अर्थसहाय्य दिलं. त्या जोरावर राजाने नौदल सक्षम केलं. अनुषंगानं शेती व उद्योगधंद्यांचीही भरभराट झाली. इंग्लंड बलशाली बनलं. सरकारची बँक, आर्थिक विकासाला चालना आणि चलनी नोटांचं वितरण या आधुनिक काळातल्या मध्यवर्ती बँकेच्या कार्याची बीजं इंग्लंडमध्ये १७ क्लार्क आणि दोन चपराशांनिशी सुरू झालेल्या या बँकेनं अशा तऱ्हेने सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीच रोवली.
सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याकाळी ज्या नोटा इश्यू केल्या जात ती प्रत्येक नोट हाताने लिहिलेली असे. आणि तीवर कॅशिअर सही करत असे. त्या काळात सर्वात लहान नोट होती पन्नास पौंडांची! अर्थात तेव्हा तिथल्या जनतेचं सर्वसाधारण वार्षिक उत्पन्न होतं फक्त वीस पौंड. त्यामुळे कित्येकांना उभ्या आयुष्यात एकदाही ही नोट हाताळायला मिळत नसे.
नंतरच्या काळात अंशत: छापील नोटा आल्या. १७४४ साली पहिली शंभर टक्के छापील नोट बाजारात आली. कालांतरानं गरजेनुसार तीत अनेक बदल होऊन आपण आजच्या आधुनिक चलनी नोटेपर्यंत येऊन पोहचलो आहोत. त्याकाळी चलनी नोटा बँक ऑफ इंग्लंडबरोबर इतर बँकाही इश्यू करत असत. पण हळूहळू इतर बँकांचे नोटा इश्यू करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि ती बँक ऑफ इंग्लंडची मक्तेदारी झाली.
लंडनच्या सिटी ऑफ लंडन या प्रभागात १७३४ पासून या बॅंकेचे मुख्य कार्यालय आहे आणि हा सारा परिसर ही बँक म्हणूनच ओळखला जातो. इथे बँक नावाचं एक खूप मोठं टय़ूब स्टेशनही आहे. बॅंकेची इमारत एखाद्या गढीसारखी आहे. तिच्या चारही बाजूला ठराविक अंतरावर मोठमोठय़ा रुंद खांबांची तटबंदी आहे. आणि तिला रस्त्यावर उघडणारी एकही खिडकी नाही. इमारतीच्या चारही बाजूंना प्रत्येकी एक असे आपल्याकडे किल्ल्याला असतात तसे बुलंद दरवाजे आहेत. त्यामुळे बाहेरून आत काय असेल याची जराही कल्पना येत नाही. आत बँकेचं सात-मजली कार्यालय आहे. विशेष म्हणजे इथल्या व्हॉल्टमध्ये इंग्लंडचं आणि इतर काही देशांचं सुमारे ४७०० टन सोनं बारच्या रूपात सुरक्षित आहे. एखाद्या मॉलमध्ये चॉकलेटचे बार ठेवावेत तसे प्रत्येकी १२.४ किलो वजनाचे हे बार शेल्फवर विराजमान आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी या व्हॉल्टचे कर्मचारी कोण आहेत, याचीही गुप्तता राखली जाते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा इथे तैनात आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे या व्हॉल्टच्या चाव्या सुमारे तीन फूट लांब आहेत. लंडनच्या अतिशय गजबजलेल्या भागात या इमारतीच्या तळघरात ही एक अतिशय अवाढव्य अशी सोन्याची खाणच आहे म्हणा ना! तुलनेसाठी सांगता येईल की, भारताकडे आहे फक्त (?) ५५७ टन सोनं! आपणापैकी काहींना आठवतही असेल की १९९१ च्या आर्थिक आणीबाणीत परकीय चलन मिळवण्यासाठी आपणही आपलं सुमारे ४० टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे तारण ठेवलं होतं.
बँक ऑफ इंग्लंडमधील गोल्ड व्हॉल्टमधील सोन्याच्या साठय़ाची पाहणी करताना इंग्लंडची राणी..
सिटी ऑफ लंडन या लंडनच्या भागात फिरायला खूप छान वाटतं. एकदा असेच बँक परिसरात फिरत असताना या बँकेचं म्युझियम आहे असं नकाशावर दिसलं. मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात रस असल्याने पावलं आपोआपच तिकडे वळली. बँकेच्या स्थापनेचा इतिहास, वास्तूचा इतिहास, जुन्या काळची नाणी, पहिल्या कागदी चलनी नोटा, पहिल्या सेक्रेटरीचं हस्तलिखित, नोटांचं डिझाईन कसं ठरवलं जातं त्याचे नमुने, अवैध नोटा छापणं कठीण करणारं डिझाईन कसं तयार केलं जातं त्याचे नमुने, नोटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पूर्वी वापरात येणाऱ्या लाकडी पेटय़ा, नोटा छापण्याचं पुरातन मशीन, आभासी गोल्ड व्हॉल्टमध्ये काढता येणारा सेल्फी, देशाच्या विकासात बँकेची भूमिका असं सगळं अतिशय रंजक रीतीनं त्यात सादर केलं गेलं आहे. इथलं आणखी एक आकर्षण म्हणजे खऱ्या सोन्याच्या १२.४ किलो वजनाच्या बारला आपण स्पर्श करू शकतो. आणि ताकद असेल तर उचलूनही बघू शकतो.
ही बँक लंडनच्या ज्या सिटी ऑफ लंडनमध्ये आहे तो लंडनचा एक सर्वात जुना भाग आहे. लोक याला लाडाने नुसतं ‘सिटी’सुद्धा म्हणतात. त्याचं क्षेत्रफळ आहे फक्त १.२ चौरस मैल. म्हणून याला ‘स्क्वेअर माइल’ असंही संबोधलं जातं. लंडनच्या आणि पर्यायाने जगाच्या आर्थिक उलाढालीचं हे केंद्र आहे. सर्व बँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची मुख्यालये, विख्यात कंपन्यांची मुम्ख्यालये या परिसरात एकवटली आहेत. इथे रहिवाशी आहेत फक्त ८०००. पण सुमारे तीन लाख लोक इथे रोज कामासाठी येतात. त्यामुळे ऑफिसच्या दिवशी हा भाग खूप वर्दळीचा असतो. शनिवार-रविवार मात्र अगदी सुनसान. भाग जुना असल्याने इथले रस्ते बोळकंडीसारखे आहेत. पण विश्वविख्यात कंपन्यांच्या मुम्ख्यालयांमुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. इमारतीही जुन्याच, तरीही शानदार आहेत.
इथल्या रस्त्यांची नाव मात्र परंपराप्रिय लंडनकरांनी रोमनकाळात होती तीच अजूनही राखली आहेत. बहुतेक रस्त्यांना रोमनकाळात तिथं चालणाऱ्या कामावरूनच नावं मिळाली आहेत. जसं की, पुडिंग लेन, मिल्क स्ट्रीट, पोल्ट्री, ब्रेड स्ट्रीट, ब्रिक लेन, चिपसाइड (म्हणजे मार्केट प्लेस).. अशा नावांच्या रस्त्यांवर प्रसिद्ध कंपन्यांची ऑफिसं, मोठमोठी रेस्टॉरंट्स, प्रसिद्ध दुकानं पाहणं खूप मजेशीर वाटतं. एक ‘गटर लेन’ नावाची लेनही आहे सिटीत!
सिटीतल्या थ्रेड्नीडल स्ट्रीट नावाच्या स्ट्रीटवर ही बँक आहे. पूर्वी इथे एका र्मचट टेलरिंग कंपनीचं कार्यालय होतं. म्हणून या रस्त्याला हे ‘थ्रेड्नीडल’ नाव पडलं आहे असं म्हटलं जातं. तर झालं काय, की १७९४ साली फ्रान्सबरोबर झालेल्या युद्धात इंग्लंडचा खजिना रिकामा झाला होता. सरकारची कर्जे बेसुमार वाढली होती. म्हणून सरकारने नोटेच्या बदल्यात बॅंकेने सोन्याची नाणी वितरीत करू नयेत असा फतवा काढला. विरोधी पक्षांना हे मान्य नव्हतं. पार्लमेंटमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू होती. चर्चेच्या ओघात एका सभासदाने बँक ऑफ इंग्लंडचा उल्लेख ‘दॅट ओल्ड लेडी ऑफ थ्रेड्नीडल स्ट्रीट’ असा केला. दुसऱ्या दिवशी जेम्स गिलरी या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे त्यावर भाष्य करणारे चित्र पेपरात छापले गेले. तेव्हापासून बँक ऑफ इंग्लंडला ‘ओल्ड लेडी ओफ थ्रेडनीडल स्ट्रीट’ हे नाव जे चिकटले, ते कायमचे. चित्रातली म्हातारी आहे बँक ऑफ इंग्लंड. ती बसली आहे बँक ऑफ इंग्लंडच्या खजिन्याच्या पेटीवर. पण पेटीला डबल लॉक आहे. म्हणजे खजिना मिळण्याची सुतराम शक्यता नाही. तिने घातलेला झगा एक पौंडाच्या नोटेचा आहे. कारण तेव्हा प्रथमच लहान मूल्याच्या- म्हणजे एक पौंडाच्या नोटा नाइलाजाने छापाव्या लागल्या होत्या. तो निळा ड्रेस घातलेला इंग्लंडचा त्यावेळचा पंतप्रधान आहे. तो तिच्या खिशातून सोन्याची नाणी काढायचा प्रयत्न करतो आहे. कारण त्याला तेव्हा पैशाची फार गरज होती. पण ओल्ड लेडीने तर हात वर केले आहेत.
अशी आहे या ‘ओल्ड लेडी’ची गोष्ट!
वात ‘ओल्ड लेडी’ आहे म्हणून दुर्लक्ष नका करू. तिच्याबद्दल जाणून घेणं खूप रोचक आहे. हे टोपणनाव आहे ३०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचं.. ‘बँक ऑफ इंग्लंड’चं! आपली जशी रिझव्र्ह बँक आहे, तशी ही इंग्लंडची. पण आपली आहे ‘यंग लेडी’.. अवघे ऐंशी वयोमान.