प्रत्येक देशाची अशी काहीतरी खासीयत असते, की ती खासीयत वा ते वैशिष्टय़ ही त्या देशाची ओळख ठरते. हजारो तळ्यांची भूमी.. ‘लँड ऑफ थाऊजंड लेक्स’ आणि ‘सौना बाथची मातृभूमी’ म्हणून ओळखला जाणारा फिनलंड हा देश त्यापकी एक. या वैशिष्टय़ांपकी एक नैसर्गिक आहे, तर दुसरे मानवनिर्मित. खरं तर फिनलंडमधील तळ्यांसाठी हजारो हा शब्दही अपुरा आहे, कारण नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार, तिथे आजघडीला १,८७,८८० तळी आहेत. लेक लँड या भागात ‘साईमा’ हे फिनलंडमधील सर्वात मोठे तळे आहे. या तळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे इथे वास करणारे ‘रिंग्ड सील्स’ हे जगातील अत्यंत दुर्मीळ प्राण्यांतले एक होय.
जिथे तळी आहेत तिथे त्यांच्या काठावर हिरवीगार जंगले आहेत. फिनलंडचा बहुतेक भाग सपाट असून त्यापकी सत्तर टक्के भाग पाइन, मेपल, बर्च अशा सदाहरित वृक्षांची जंगले व तळ्यांनी व्यापला आहे. प्रदूषणमुक्त हवा, स्वच्छ, सुंदर निळे आकाश, तळ्यांमधील पाण्याच्या निळाईच्याही विविध छटा तसेच तळ्याकाठची हिरवीगार झाडी यामुळे या निसर्गावर निळा व हिरवा रंग आधिपत्य गाजवताना दिसतो.
फिनिश लोकांचे पाण्याशी आणि पाण्याकाठच्या जंगलांशी घनिष्ठ ऋणानुबंध जुळलेले आहेत. कित्येकांचे आयुष्यच त्यांच्याशी बांधले गेले आहे, तर कित्येकांचे जीवन त्यावर अवलंबून आहे. बहुतेक तळ्यांच्या काठावर लहान लहान गावे वसली आहेत. तर शहरात राहणाऱ्या लोकांनी तिथे आपली समर कॉटेजेस् बांधली आहेत. तळ्याच्या काठी जरा उंच भागात लालचुटुक कौलांची लाकडी घरे, त्याच्या खालच्या टप्प्यावर लाकडी सॉना व तळ्यात लाकडी तराफा टाकून त्याला बांधलेल्या एक-दोन होडय़ा असे काहीसे चित्र फिनलंडमधील तळ्यांच्या काठी दिसते. थंडीच्या दिवसांत ही सगळी तळी गोठतात आणि मग त्यावर आइस स्केटिंग आणि बर्फातील गाडय़ांचे रस्ते बनवले जातात. स्केटिंगप्रमाणेच तळ्यावरील बर्फाच्या थराला भोक पाडून त्यातून मासे पकडायचे, हे फिनिश लोकांचे हिवाळ्यातील आवडते खेळ.
वर्षांतले आठ-नऊ महिने बर्फाने आच्छादलेली धरती आणि उरलेले दिवस जवळजवळ २०-२२ तास सूर्यप्रकाश.. असे आगळे रूपसौंदर्य लाभलेल्या फिनलंडच्या धरतीवरील बर्फाची शाल दूर व्हायला लागली आणि सूर्याचे दर्शन घडले, की लोकांच्या जगण्यात एक प्रकारचे चतन्य येते. सहा महिने बर्फ आणि पांढरा रंग सोडून निसर्गात दुसरा कोणताच रंग दिसत नाही. त्यामुळे निसर्गातील वेगवेगळे रंग डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आणि सूर्यप्रकाश अनुभवण्यासाठी लोक घराबाहेर पडतात. त्यांच्यावर झाडे तोडू नका, जंगलात जाऊ नका, शिकार करू नका अशी कोणतीच बंधने नसल्यामुळे सुटीच्या दिवशी लोक जंगलात मनमुराद भटकतात. जंगलात खाण्यायोग्य अशा बेरीज् आणि मशरूम्स खुडतात. ससे, बदके, ग्राऊस पक्ष्यांची शिकार करतात आणि नंतर खास फिनिश बीयरसोबत मिळालेली शिकार भाजून त्याचा आस्वाद घेतात. उबदार मोसमात खूप चालायचे, खूप सायकल चालवायची, तळ्याकाठी बसून मासे पकडायचे वा जंगलात शिकारीला जायचे हे फिनिश माणसाचे आवडते छंद आहेत.
तळ्याकाठच्या जंगलातील लाकूड हे शहरांतील तसेच तळ्याकाठची घरे, घरातील फíनचर, सॉना, तळ्यात फिरण्यासाठी लहान होडय़ा बनविण्यासाठी वापरले जाते. बरेच लोक जंगलातील झाडे कापून त्यापासून स्वत:च आपली तळ्याकाठची समर कॉटेजेस् बनवतात. थंडीच्या दिवसांत शेकोटीसाठी व घरातील फायर प्लेस पेटवण्यासाठीदेखील त्यांना लाकडे साठवून ठेवावी लागतात. बहुतेक घरांतून लाकडे साठवण्यासाठी खास जागा केलेली असते. लाकडाच्या वस्तू बनवणे ही फिनलंडमधील पारंपरिक कला आहे. पूर्वापार इथे जंगलातील लाकडांपासून कलात्मक वस्तू बनविल्या जात आहेत.
फिनलंडला ‘सौना बाथची मातृभूमी’ असेही म्हटले जाते. ‘सौना’ हा शब्द फिनिश भाषेतलाच आहे. शेकडो वर्षांपूर्वी पहिला लाकडी सौना या देशात बांधला गेला. तेव्हापासून तो फिनिश संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. आज प्रत्येक हॉटेलमध्ये तसेच बहुतेक सर्व घरांत सौना असतोच. तिथे वीस लाखांच्या वर- म्हणजे दर तीन माणसांगणिक एक सौना आहे. यावरून फिनिश माणसाच्या जीवनशैलीत सौनाला किती महत्त्व आहे हे लक्षात येते.
सौना बाथची खरी मजा जिथे त्याचा शोध लागला त्या फिनलंडमध्येच अनुभवावी. कामाच्या चर्चा सौनामध्ये बसून केल्या जातात. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांना फिनिश लोक सौनाचा अनुभव देऊ करतात. फिनिश रीतिरिवाजानुसार सौनाचा अनुभव देणे हा आदरातिथ्यातील एक महत्त्वपूर्ण भाग समजला जातो.
फिनलंडमधील लोकांसाठी सौना ही चन नसून रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या मते, सौना हा फक्त बाह्य़ शरीराला उपयोगी नसून त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात मनाला शांतता आणि उभारी मिळते. शारीरिक श्रमांचे काम करणाऱ्यांच्या थकलेल्या स्नायूंना आराम मिळतो, तसेच शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ होतात. पारंपरिक पद्धतीनुसार फिनलंडमध्ये सौना बाथ म्हणजे लहान-मोठय़ा आजारांवरील रामबाण उपाय समजला जातो.
पारंपरिक फिनिश सौनामध्ये लाकडे पेटवून विशिष्ट तापमान तयार केले जाते. त्या उष्णतेमुळे शरीरातून घाम यायला लागतो व शरीरातील सगळी दूषित द्रव्ये बाहेर पडतात. फिनिश सौनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात बर्चच्या फांद्या ठेवलेल्या असतात. विशिष्ट वास असलेल्या औषधी बर्चची पाने अगदी हलक्या हाताने अंगावर घासल्यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होण्यास मदत होते. त्यानंतर तळ्यातील गार पाण्यात डुबी मारून ताजेतवाने व्हायचे. हिवाळ्याच्या दिवसांत सौना बाथ घेतल्यानंतर लोक बर्फात लोळून आपले शरीर थंड करतात व नंतर कोमट पाण्याने आंघोळ करतात. फिनलंडमधील सौना बाथ म्हणजे असा सगळा प्रकार असतो.
प्रारंभीच्या काळात या उबदार खोल्या फक्त सौना बाथसाठीच नाही, तर घरातील इतरही अनेक कार्यक्रमांसाठी वापरल्या जात असत. या खोल्या अतिशय स्वच्छ व जंतूविरहित असल्यामुळे घरातील स्त्रियांची बाळंतपणेही या खोलीत केली जात. लग्नाच्या आधीचे काही कार्यक्रम तसेच घरातील कोणाचा मृत्यू झाला तर या खोलीत काही विधी केले जात. काळ बदलला, तशा या पद्धती मागे पडल्या. पण फिनिश लोकांच्या जीवनातले सौनाचे महत्त्व मात्र तसेच कायम राहिले.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत शांतता, वेळ व स्वत:साठी अवकाश (स्पेस) या गोष्टी दुर्मीळ झाल्या आहेत. फिनिश लोक मात्र या दुर्मीळ गोष्टी अनुभवण्यासाठी सौना बाथ घेणे व तळ्याकाठी वेळ घालवणे पसंत करतात. देशातील तळी, जंगले व सौना बाथ यांचे फिनिश लोकांशी किती जवळचे नाते आहे, हे यावरून समजून येते आणि ‘सौना बाथची मातृभूमी’ वा ‘हजारो तळ्यांची भूमी’ ही या देशाची ओळख किती सार्थ आहे हेही पटते.
मृणाल तुळपुळे mrinaltul@hotmail.com