एकदा तळवलकर माझ्या टेबलाजवळ आले. माझं लक्ष नव्हतं. मी खाली मान घालून आदल्या दिवशी दांडी मारल्यामुळे साचलेलं काम पुरं करण्याच्या गडबडीत होतो. ‘‘काय हो नाडकर्णी, तुमचे हे नाटकवाले असे कसे?’’ मला काहीच कळेना. ‘‘अहो, काल मला त्यांच्या नाटकाच्या पंचविसाव्या प्रयोगाचं खास निमंत्रण द्यायला आले होते. त्या समारंभाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारावं, असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हटलं, ‘माझा तुमच्या नाटकाशी काय संबंध? मी तुमचं नाटक पाहिलेलंही नाही. तुम्ही मलाच का बोलावताय? यातला कावा मी ओळखला आहे. माझ्या समीक्षकानं तुमच्या या नाटकावर टीकेची झोड उठवली होती. आता त्याच नाटकाचा माझ्याकडून तुम्हाला गौरव करून घ्यायचा आहे. मी माझ्या समीक्षकाच्याच बाजूचा आहे.’ मी त्यांना स्पष्ट नकार दिला.’’ एवढं सांगून तळवलकर आपल्या केबिनमध्ये निघून गेले.

सव्यसाची पत्रकार गोविंदराव तळवलकर आणि मी यांच्यासंदर्भात काही लिहिणं, आमच्या संबंधांबद्दल बोलणं म्हणजे प्रसिद्ध पुरुषाशी घट्ट मैत्री असल्याचं भासवून स्वत:चं मोठेपण मिरवण्याची मिळालेली संधी- असं कुणीही म्हणू शकेल; पण मी एक दशकभर तळवलकरांच्या हाताखाली इमानेइतबारे समीक्षागिरी केली, त्याला कोण काय करणार?

Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
businessman attacked with sharp weapon over minor dispute near kasba ganapati temple
किरकोळ वादातून व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कसबा गणपती मंदिराजवळील घटना
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर

बालगंधर्व जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक विशेषांक काढायची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि अरुण आठल्ये या अभ्यासू रसिक वाचकाच्या साहाय्याने त्यांनी ती अमलात आणायचं ठरवलं. पु. ल. देशपांडे आणि विद्याधर गोखले या त्यांच्या निकटवर्तीय नाटकवेडय़ांनी त्यांची ही कल्पना उचलून धरली. अरुण टिकेकर व अरुण आठल्ये यांनी सर्वतोपरी मदत करायची हमीच दिली.

वरच्या फळीची सिद्धता झाली. पण काम करणारी मधली फळी महत्त्वाची असते. त्यासाठी त्यांना एक श्रमिक हवा होता. टिकेकर, आठल्ये व पु. ल. या तिघांनी माझं नाव सुचवलं. आणि एके दिवशी सकाळी मला गोविंदरावांचा फोन आला. ‘‘आमच्याकडे येणार का? यायचं असेल तर तिसऱ्या मजल्यावर मला भेटा.’’ टेलिफोन ठेवला गेला.. हीच त्यांची दूरध्वनीवरून बोलण्याची पद्धत होती. नेमकं आणि कमीत कमी शब्दांत संवाद. मी उडालोच. कोणाचा फोन? कशाला भेटा? ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा आणि माझा काय संबंध? मला काहीच कळेना. मी तितरभितर झालो. टिकेकरांना फोन करून विचारले तेव्हा साद्यंत वर्तमान कळले. ‘नाही म्हणू नका,’ एवढाच अखेरीस त्यांचा शब्द. ‘नाही’ म्हणण्याची शक्यताच नव्हती. मनातल्या मनात खूप धन्यता वाटली. दोन दिवस तर माझ्या डोक्यात आणि कानात तळवलकरांचेच शब्द- ‘येणार का आमच्याकडे?’ याचेच प्रतिसाद उमटत होते.

मी माझ्या आवडत्या कामाला मेहनतपूर्वक सुरुवात केली. बाल नसूनही मी बालगंधर्वमय होत होतो. माझ्या कामावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. मला दररोज किती लेख आले, त्यांचे विषय, त्यांची गुणवत्ता याबद्दल विचारायचे. त्यावेळी संपादकीय केबिनमध्ये- म्हणजेच सिंहाच्या गुहेत शिरणारा मी एकटाच दुसऱ्या फळीचा श्वापद होतो. मी बिनधास्त असायचो. इतर सहकारी त्यांच्या गुहेत शिरायला घाबरायचे हे मला माहीतच नव्हतं. त्यामुळे माझ्या या औद्धत्याला धाडस म्हणणेही योग्य ठरणार नाही. पण माझ्या या बिनघाबरू स्वभावामुळे एक झालं, की दररोजच्या सकाळच्या मीटिंगला मलाही हजर राहण्याची पर्वणी चालून आली. काही सहकाऱ्यांची मात्र ‘जलन’ झाली. कित्येक वर्षांत त्यांना जे शक्य झालं नव्हतं ते मी पदार्पणातच मिळवलं होतं. दुपारच्या त्यांच्याबरोबरच्या भोजनफेरीत माझाही समावेश करण्यात आला होता. माझ्या गमतीशीर उपजत स्वभावामुळे मी हास्यविनोद करीत टेबल-खुर्चीला संपूर्ण वेळ चिकटून बसलेल्या सहकाऱ्यांच्या आजूबाजूला फिरत राहायचो. हसत-खेळत आणि फिरत, टोप्या उडवत, गाणे गुणगुणत काम करायचो. पहिल्या काही महिन्यांतच माझा हा ‘पराक्रम’ पाहून तळवलकर टिकेकरांना म्हणाले, ‘‘अहो, तुमचा हा नाडकर्णी विनोदीच दिसतोय!’’

तळवलकरांचे माझ्या माहितीतले नाटकवाले दोस्त म्हणजे पु. भा. भावे, विद्याधर गोखले आणि पु. ल. देशपांडे.

विद्याधर गोखलेंची आणि त्यांची दाट मैत्री. खरं तर पु. भा. भावे काय किंवा विद्याधर गोखले काय, या दोघांची विचारसरणी तळवलकरांच्या एकदम विरुद्ध टोकाची. त्यामुळे त्यांची मैत्री हे एक आश्चर्यच होतं. पण ‘नाटक’ हा त्यांच्यातला एकमेव नात्याचा दुवा होता. विद्याधर गोखले यांच्या संगीत नाटकांबद्दल त्यांना कमालीचं प्रेम होतं. खरं तर सर्वच संगीत नाटकांबद्दल त्यांना मनस्वी जिव्हाळा होता. छोटा गंधर्व हे त्यांचे माझ्या माहितीतले आवडते नाटय़गायक होते. गोखल्यांच्या सर्वच नाटकांना ते आवर्जून हजेरी लावत. विद्याधर गोखल्यांचा स्वभाव कमालीचा गप्पिष्ट. एकदा त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली की बोलणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला- कुणालाच वेळेचं भान नसायचं. मधूनच केव्हातरी लहर आली की तळवलकर माझ्यातर्फे गोखल्यांना भेटून जायचा निरोप द्यायचे. लेखाबिखांसाठी नव्हे, तर फक्त गप्पांची मैफल जमवण्यासाठी. त्यांनी वेळोवेळी माझ्यावर ही कामगिरी सोपवली आणि मी ती आज्ञाधारकपणे पाळली. विद्याधर गोखले तर लहरींचे सम्राटच. ते केव्हाही तळवलकरांच्या केबिनमध्ये घुसत. ते सकाळी आले की मग आमची खात्री असायची- आज संध्याकाळी दोघेजण एकत्रच बाहेर पडतील. आणि तसंच व्हायचं. या अचानक भेटीमुळे त्यांच्या कामात व्यत्यय कसा येत नाही? अग्रलेख ते पुरा कधी करतात? असे प्रश्न आम्हा बाहेरच्या पामरांना पडायचे. पण तेही एक आश्चर्यच होतं. गोखल्यांच्या गप्पांचं असं विलक्षण गारूड तळवलकरांवर कायमच होतं.

एका मोठय़ा हॉटेलमध्ये खास समारंभात बालगंधर्वाच्या गाण्यांच्या ध्वनिफितीचा का कसलासा कार्यक्रम होता. तळवलकरांची खास उपस्थिती होती. बरेच दिग्गज नाटकवाले, संगीतकार सोहळ्याला उपस्थित होते. गर्दी उसळली होती. मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर पेयपानाकडे रसिक वळले. इतक्यात गर्दीतून वाट काढीत कुणीतरी माझ्याकडे आलं आणि म्हणाले, ‘‘तळवलकरांचा निरोप आहे. बाकी काही घेऊ नका. आजची वाइन घ्या. ती अन्यत्र कुठे मिळणार नाही.’’ मला आज त्या वाइनचं नाव आठवत नाही, पण मी त्यांचं मत कितपत खरं आहे याची खात्री करून घेतली. माझ्यासारख्या एका सामान्य सहकाऱ्याबरोबरही ते आपली रसिकता शेअर करीत असत. मला मात्र केव्हा केव्हा फार अवघडल्यासारखं होत असे.

मला बालगंधर्व विशेषांकासाठी बोलवलं होतं, पण त्यात तळवलकरांचा दूरदर्शीपणा होता. काही महिन्यांतच त्यावेळचे त्यांचे नाटय़समीक्षक निवृत्त व्हायचे होते. बालगंधर्व अंकाचे काम संपले की रिकाम्या झालेल्या जागी माझी नेमणूक करता येईल, अशी ती योजना होती. आणि झालंही तसंच.

तळवलकरांचं मराठीतील सांस्कृतिक जगतावर लक्ष असायचं. पु. लं.बरोबर एनसीपीएमधील सर्व नाटय़प्रयोगांना व संगीत मैफलींना ते हजर असायचे. सत्यजीत रे यांचा प्रत्येक चित्रपट ते आवर्जून पाहायचे.

एकदा दूरदर्शनवर त्यांनी प्रशांत दामलेला कुठच्या तरी एका कार्यक्रमात पाहिलं. मला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले, ‘‘अहो, हा प्रशांत दामले चांगला विनोदी नट दिसतोय.’’

‘‘तो गाण्यातही माहीर आहे. तो मास्टर दामले (नूतन पेंढारकर) यांचा पुतण्या आहे.’’ मी माझ्याकडे अधिक माहिती असल्याचा पुरावा दिला. ‘‘मग केव्हातरी मुलाखत घ्या ना! बघू या तरी- एकूण रंगभूमीबद्दल काय म्हणतो ते.’’

एकदा असाच सांगावा शबाना आझमी यांची मुलाखत घेण्याबद्दल आला. चित्रपट अभिनेत्रीची मुलाखत घेण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. शिवाय ‘नाही’ म्हणायची हिंमतच नव्हती. माझ्या छातीत धडकीच भरली. मी अरुण टिकेकरांच्या साहाय्याने ही मुलाखत कशीबशी पूर्ण केली. मी केवळ नावाचा धनी होतो. श्रेय सगळे टिकेकरांचे होते. माझ्या संकटनिवारणार्थ त्यांनी धाव घेतली आणि मला वाचवलं.

एकदा तळवलकर माझ्या टेबलाजवळ आले. माझं लक्ष नव्हतं. मी खाली मान घालून आदल्या दिवशी दांडी मारल्यामुळे साचलेलं काम पुरं करण्याच्या गडबडीत होतो. ‘‘काय हो नाडकर्णी, तुमचे हे नाटकवाले असे कसे?’’ मला काहीच कळेना. ‘‘अहो, काल मला त्यांच्या नाटकाच्या पंचविसाव्या प्रयोगाचं खास निमंत्रण द्यायला आले होते. त्या समारंभाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारावं, असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हटलं, ‘माझा तुमच्या नाटकाशी काय संबंध? मी तुमचं नाटक पाहिलेलंही नाही. तुम्ही मलाच का बोलावताय? यातला कावा मी ओळखला आहे. माझ्या समीक्षकानं तुमच्या या नाटकावर टीकेची झोड उठवली होती. आता त्याच नाटकाचा माझ्याकडून तुम्हाला गौरव करून घ्यायचा आहे. मी माझ्या समीक्षकाच्याच बाजूचा आहे.’ मी त्यांना स्पष्ट नकार दिला.’’ एवढं सांगून तळवलकर आपल्या केबिनमध्ये निघून गेले. संपादक माझं परीक्षण वाचतात हे ऐकून मी अवाक्  झालो. आणि एवढय़ा मोठय़ा व्यक्तीनं माझी बाजू घ्यावी हे बघून मला शब्दच फुटेनात!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या सादरीकरणाची जाहिरात एक ‘महानाटक’ अशी केली होती. मी त्या प्रयोगावर ‘जाणता राजा- दी ग्रेट बाबासाहेब पुरंदरे सर्कस’ अशा शीर्षकाचा टीका करणारा लेख लिहिला होता. त्यावेळी तळवलकर परदेशी होते. लेख छापून आल्यानंतर चारच दिवसांनी त्या लेखाबद्दल माझे अभिनंदन करणारा निरोप तळवलकरांनी पाठवल्याचे मला कळले. आणि मला पावायला ‘धन्य’ हे शब्द कमी पडले.

अन्य विषयांच्या धबडग्यातही गोविंदराव तळवलकर कला विषयात किती रस घ्यायचे, विशेषत: रंगभूमीबद्दलही किती आस्था बाळगायचे, हे मला त्यांच्या एका दशकाच्या सहवासातून कळून चुकलं. त्यांना नाटय़समीक्षकाची आदरांजली!

कमलाकर नाडकर्णी kamalakarn74@gmail.com

Story img Loader