रेणू सावंत

स्तब्धता म्हणजे मृत्यू आणि हालचाल म्हणजे जीवन. मृत्यूला हरवण्यासाठीच जणू काही आपली सततची चाललेली धडपड असते. या धडपडीत चाललेलं दैनंदिन जीवन गोंदवत आपल्या जगण्याची नोंद करणं हे काम त्या त्या काळाची बखरच बनवण्याचे आहे. आपल्या डॉक्युमेंटरी फिल्म्समधली माणसं आणि आपण ह्यांच्यातील वैयक्तिक आणि सामाजिक परस्परसंवादाला त्या फिल्म्समध्ये स्थान असावं असं मला वाटतं. म्हणून मी ‘पर्सनल डॉक्युमेंटरी’ने सुरुवात केली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

एका वैयक्तिक कारणामुळे २०१४ मध्ये मी मुंबई सोडून रत्नागिरीला काही काळ राहण्याचा निर्णय घेतला. नुकतीच पुण्यातल्या एफ.टी.आय.आय. मधून फिल्म दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिऱ्या गावामध्ये माझे वडिलोपार्जित घर आहे. ठरावीक छोटेखानी, कौलारू वगैरे आणि गावातल्या मराठा वस्तीत. ठरावीक असलं तरी मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात शांततेचा वेगळा परिणाम होतोच. माझ्यासमोर असलेली व्यक्तिगत पोकळी आणि रिकामा वेळ यांच्यामुळे एक प्रश्न उभा राहिला- सिनेमा माध्यमाकडे केवळ करिअर म्हणून न बघता रोज सराव करता येईल, असे कौशल्य म्हणून बघता येईल का? याबरोबर डिजिटल कॅमेरा हा फिल्म कॅमेऱ्यापेक्षा वेगळा असतो, त्याच्या शूटिंगची लय वेगळी असते आणि त्यामुळे त्यातून सांगितलेली गोष्ट आणि स्थल-काल बांधणी कशी वेगळी असू शकते, हाही प्रश्न मनात होता.

हेही वाचा : अस्तित्वाचा तपास..

एक गाव, त्यातली माणसं, गावाचा एक वरून वरून माहीत असलेला आणि एक सूक्ष्म राजकीय इतिहास, सामाजिक विषमतेची रचनात्मक बांधणी आणि या व्यवस्थांमधून आपआपली वाट काढत असलेली माणसं हेही मला सामोरं येत होतं. काही महिने रोज डायरी लिहिल्यासारखे स्वत:ची शैली विकसित करत डिजिटल कॅमेराबरोबर मी शूट करत गेले. त्यातून माझी पहिली डायरी फिल्म, ‘मेनी मन्थ्स इन मिऱ्या’ ही बनली. त्यात गावामधली राजकीय, सामाजिक परिस्थिती, माणसांचे परस्पर नातेसंबंध आणि मी- यांच्यातील वेगवेगळे पदर हळूहळू उलगडत गेले.
सिनेमाचा वास्तविकतेशी मूलभूत संबंध आहे. फिक्शन चित्रपटांमध्येही एखाद्या ‘शॉट’मध्ये असलेली घटना काल्पनिक असली तरी वास्तवात शूट करावीच लागते. हा वास्तविकतेचा अंत:प्रवाह सिनेमा टाळू शकत नाही. माझ्या माहितीपट किंवा डायरी फिल्म्सना मी आजूबाजूच्या रोज घडणाऱ्या वास्तवाची आणि माझ्या जगण्याची नोंद असं समजते. रोजच्या घटनांवर, आजूबाजूच्या वास्तविकतेवर फिल्म्स बनवणारे आणि डॉक्युमेण्ट्रीचा विषय आपण स्वत:च आहोत असं समजणारे स्त्री-पुरुष फिल्ममेकर्स शोधत असताना मला ऑस्ट्रेलियन जेनी थॉर्नलीच्या ‘मेमोरी फिल्म’चा उल्लेख सापडला. त्या फिल्मच्या ट्रेलरमधली ओळ ‘फेरवेल फिल्म पोएम टू लाइफ’ ही मला मजेशीर वाटली, जणू काही या स्त्री फिल्ममेकरची फिल्म ही तिच्यासाठी आपण जिवंत आहोत याची ग्वाही आहे.

आपल्या आयुष्याच्या खाणाखुणा समाज आपल्या मुलांमध्ये आणि पुढच्या पिढीमध्ये बघू पाहतो. याउलट या कल्पनांना छेद देत मार्गारेट टेट, जेनी थॉर्नली, अ‍ॅन शार्लेट रॉबर्टसन, अशा व्हॅनगार्ड (vanguard – नवीन विचार असलेल्या) स्त्री माहितीपटकार आपल्या जिवंत असण्याचे अवशेष या फिल्मधून दाखवू पाहतात. डायरी फिल्म्स बनवणारे अमेरिकन फिल्ममेकर जोनास मेकासही यात आहेत. एका विलक्षण एकटेपणामधून आपलं अस्तित्व थेट नोंदवायच्या आणि व्यक्त होण्याच्या तीव्र इच्छेत या कामाचं मूळ असावं असं मला वाटतं. आपल्या परिस्थितीबद्दल बोलता येणं, व्यक्त होणं हे जर त्या व्यक्तींना सक्षम करत असेल तर अशा स्वत:च्या आवाजात स्वत:चे अनुभव सांगणाऱ्या फिल्म्स राजकीयही असतात आणि कलात्मकही. फिल्मच्या सुरुवातीच्या इतिहासात नवीन तंत्रज्ञान म्हणून फोटोग्राफिक इमेजकडे लोक संशयानं बघत. विचारवंत रोलँड बार्थस( Roland Barthes) या संशयाचं कारण असं सांगतो की आपल्याच डोळय़ासमोर आपण फोटोग्राफमधल्या क्षणात कैद झालेले लोकांना दिसतो. (‘‘that instant, however brief, in which a real thing happened to be motionless in front of the eye’’) ही भीती एका पृष्ठभागावर, काळाला स्तब्ध करण्याच्या फोटोग्राफीच्या किमयेशी निगडित आहे. स्तब्धता म्हणजे मृत्यू आणि हालचाल म्हणजे जीवन असे म्हणता येईल. मृत्यूला हरवण्यासाठीच जणू काही आपली सततची चाललेली झटपट असते. या धडपडीत चाललेलं दैनंदिन जीवन moving image वर रेकॉर्ड करणं आणि त्यातून आपल्या जगण्याची नोंद करणं हे काम त्या त्या काळाची बखरच बनवण्याचे आहे.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वास्तव नावाची जादू

भारतीय वाङ्मयात महादेवी अक्का, तसेच थेरीगाथामध्ये आपल्या मार्गातला स्वत:शी चाललेला संघर्ष उघडपणे सांगणाऱ्या बौद्ध भिक्खुणी, बहिणाबाई यांच्या आणि अशासारख्या कवितांमध्ये हे पडसाद सापडतात. अलीकडे हिंदी डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकर राजुला शाहची ‘चालो सखा इस देश में’ नावाची फिल्म बघितली. ही फिल्म दहा वर्ष आषाढातल्या वारीचे एका स्वतंत्र शैलीत मांडलेले दर्शन घडवते आणि वारकरी जीवनपद्धतीबरोबरच त्यांच्यासमोर असलेले आत्मचिंतनात्मक प्रश्न प्रस्तुत करते. ‘मेनी मन्थ्स इन मिऱ्या’ ही माझी एकमेव खऱ्या अर्थाने असलेली डायरी फिल्म. त्यानंतर दूरदर्शन आणि पी.एस.बी.टी.साठी मी एक तासाची ‘मोड भांग’ नावाची पावसाळय़ात, मिऱ्यागावाच्या खाडीत होत असलेली छोटी मासेमारी अशा विषयावर साधी सरळ फिल्म बनवली. ही जरी डायरी फिल्म नसली तरी तिच्यामध्ये माझ्या व्यक्तिगत विशिष्ट शैलीला स्थान होते. गावातल्या खाडीत छोटी मासेमारी करणारा समाज, या समाजाच्या नवीन पिढीचे प्रश्न हे या फिल्ममध्ये मी मांडले आहेत. ‘मेनी मन्थ्स इन मिऱ्या’ आणि ‘मोड भांग’ या फिल्म्स मी टाटा इन्स्टिटय़ूट आणि दूरदर्शनच्या फिल्ममेकिंग ग्रँट्समधून बनवल्या.

सिनेमाला इंडस्ट्रियल व्यवस्थेतून बाहेर काढून एक कलात्मक आणि राजकीय साधन म्हणून गेल्या शंभरेक वर्षांत बऱ्याच फिल्ममेकर्सनी बघितले आहे. एकीकडे दबलेल्या आणि विषमतेने गप्प केलेल्या समाजाच्या अभिव्यक्तीचे हत्यार म्हणून आणि दुसरीकडे कला, कौशल्य या चौकटीतून सिनेमाचा वापर करणे अशा विचारातून प्रायोगिक, छोटय़ा तत्त्वावर बनलेल्या माहितीपटांचा जन्म झालेला दिसतो. समाजव्याख्यांच्या परिघाच्या बाहेर फेकली गेलेली माणसं मुख्य प्रवाहाच्या माध्यमांमध्ये जवळजवळ अदृश्य असतात. त्यातून ती दिसत असली तर काही तरी नवीन आणि अपरिचित म्हणून अशा सामाजिक परिस्थितींकडे आणि त्यांच्यातून जगणाऱ्या माणसांकडे बघितलं जातं. कॅमेरा हातात असलेले आम्ही, बहुतांश मुख्य प्रवाहात जगणारे, उच्च-मध्यम जात-वर्गातले असतो. याचमुळे आपल्या डॉक्युमेण्ट्री फिल्म्समधली माणसं आणि आपण यांच्यातील वैयक्तिक आणि सामाजिक परस्परसंवादाला त्या फिल्म्समध्ये स्थान असावं असं मला वाटतं. म्हणून त्यानंतर मी व्यक्तिगत फिल्ममेकिंग/ पर्सनल डॉक्युमेण्ट्रीची प्रॅक्टिस सुरू केली.

हेही वाचा : आठवणींचा सराफा : मी मराठी.. माळव्याचा!

फिल्ममध्ये मी मेकर म्हणून हजर असणं हे आपण शूट करत असलेल्या लोकांसोबत स्वत:लाही त्या कॅमेऱ्यासमोरच्या असुरक्षित जागी ठेवणं आहे. नॉनफिक्शन फिल्म ही इथेही फिल्ममेकरच्या असण्याची आणि त्या काळाची नोंद बनते. ‘मेनी मन्थ्स इन मिऱ्या’ ही चार तासांची फिल्म होती. तिला केरळ येथील साइन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट डॉक्युमेण्ट्री २०१७ हा अवॉर्ड देताना फिल्म समीक्षक अमृत गांगर म्हणाले की, आजच्या सोशल मीडिया, वेगवेगळय़ा ऑनलाइन फलाटांमुळे डॉक्युमेण्ट्रीकडे केवळ माहितीपट म्हणून बघणं अधिकाधिक गैरलागू होत चाललं आहे.
२०२० मध्ये करोना महासाथीच्या वेगवेगळय़ा पैलूंवर फिल्म बनवण्यासाठी आशियातून काही फिल्ममेकर्सची निवड झाली. त्यात मी एका कुश बधवार नावाच्या भारतीय-ऑस्ट्रेलियन आर्टिस्टबरोबर काम केले. आम्ही आपापल्या घरी बसून काम करत होतो. ‘क्रांतिवीर’ या फिल्मच्या शेवटच्या दृश्यामध्ये प्रख्यात नट नाना पाटेकर यांच्या देशप्रेम आणि संघर्ष यांवरील मोनोलॉगवर निघालेल्या वेगवेगळय़ा करोना मीम्सवर आम्ही काम केले. मी ‘सोशल डिस्टन्स’च्या काळात अशी कल्पना केली की, त्या दृश्यामधील गर्दीत लहान असताना मीसुद्धा उभी आहे आणि शूटिंग पाहाते आहे. करोना साथीमध्ये आजूबाजूला रिकाम्या झालेल्या जगाकडे बघताना, गर्दी आणि आपलं शरीर यांचा काय संबंध असू शकतो याचा शोध मी त्या फिल्ममध्ये घेतला. आमची फिल्म बाहेरचं वास्तव, फिल्ममधला सीन, त्या सीनमधलं कधी एके काळी झालेलं शूटिंग, त्या सीनचं ‘करोना पँडेमिक मीम’ होऊन सोशल मीडियामध्ये प्रसारित होणं अशा बऱ्याच माहिती आणि कल्पनेच्या पदरांच्या आतबाहेर करत होती.

‘ऑनलाइन मीम्स’ आणि ‘टिकटॉक व्हिडीओज्’सुद्धा एका अर्थाने वास्तवातली दृश्यं दाखवतात. ऑनलाइन आणि ओटीटी फलाटांच्या, सोशल मीडियाच्या जमान्यात जिथे सतत आपण एखाद्या ट्रूमन शोमध्ये जगत असल्यासारखं इंस्टाग्रामवर स्वत:चे वास्तव आणि अस्तित्व नोंदवत असतो तिथे माहितीपटांची विशेष जबाबदारी आहे असा मला वाटतं. वास्तव आणि त्याच्या पलीकडच्या सत्याकडे बघण्याची ही जबाबदारी आहे.

हेही वाचा : रंजक बालकथा

२०२१ मध्ये इंडिया फौंडेशन फॉर थ आर्ट्सच्या आर्ट्स प्रॅक्टिस फेलोशिपअंतर्गत मी ‘बागीचा और परदेश’ ही फिल्म बनवली. रत्नागिरीमधल्या आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांबरोबर कोविडच्या काळात सातत्याने शूटिंग करून हे फिल्म डॉक्युमेंटेशन मी बनवले. त्यात कामगारांची रोजची परिस्थिती तर होतीच, पण या कालावधीत आमच्यातला उलगडत जाणारा वेगवेगळय़ा जात वर्गातला, स्त्री-पुरुष म्हणून परस्परसंवादही होता. या फिल्ममध्येही मी स्क्रिप्टवर आधारित शूटिंग न करता, आम्हा सगळय़ा माणसांच्या परस्परसंबंधांवर लक्ष केंद्रित केलं. अशा विशिष्ट शूटिंग आणि एडिटिंगमुळे आमच्या परस्पर वागण्यातल्या सूक्ष्म छटा आणि त्यामुळे सामाजिक सत्तेच्या संरचना आणि व्यवस्थेबद्दल बरेच काही उघड झाले.

डॉक्युमेण्ट्रीमध्ये आता डळळ मुळे एक मुख्य प्रवाहही सुरू झाला आहे. प्रवासवर्णनं, प्राण्यांचे जीवन दाखवणाऱ्या डॉक्युमेण्ट्रीज केबल टी.व्ही.च्या चॅनलवर यायच्या. आता डळळ वर ट्रू – क्राइम, खून प्रकरणं यावर ठरावीक साच्यात, ठरलेल्या मांडणीत मनोरंजनासाठी बनवलेल्या डॉक्युमेण्ट्रीचंही रूप दिसतं. अशा पद्धतीचं मनोरंजनही असू शकते. फिल्म जशी कला, कौशल्य आहे तसा तो व्यवसाय आहे, करिअरपण आहे. त्याचप्रमाणे फिल्म हे पैसे कमवायचे साधनसुद्धा आहे. हे सगळेच आपापल्या जागी बरोबर आहेत; परंतु माझा आणि माझ्यासारख्या इतर डॉक्युमेण्ट्री बनवणाऱ्या फिल्ममेकर्सच्या फिल्म्स छोटय़ा पातळीवर आणि प्रायोगिक असल्यामुळे कमर्शिअल फलाटांवर खूपच वेळा येऊ शकत नाहीत.

हेही वाचा : पडसाद : हा तर राजकीय उद्देशाचा दीपोत्सव

आपण आत्तापर्यन्त ज्या फिल्म्स बनवल्या, त्या बनवण्याची पद्धत आणि पुढच्या वाटचालीचा विचार करताना, वेगळे आणि सर्वसामान्य दोन्ही प्रकारचे निर्णय घेताना मला एक गोष्ट आठवते – लहानपणी वाचलेली रादुगा पब्लिकेशन्सची देनिसची गोष्ट. आईची वाट पाहत असताना, संध्याकाळच्या थोडय़ा उदास वेळी, देनीस आपल्या खेळण्यातला नवा कोरा ट्रक, आपल्या मित्राला एका काडेपेटीतल्या काजव्याच्या बदल्यात देऊन टाकतो. आई परत आल्यावर त्याला विचारते की, नवीन ट्रक होता, मग का या काडेपेटीसाठी देऊन टाकला? देनिसचं उत्तर आठवून मला प्रयोग या संकल्पना आणि जीवनपद्धतीबद्दल जे वाटतं ते मनात येतं. पेटीतल्या काजव्याकडे बघून देनिस केव्हाच नवीन कोरा ट्रक विसरलाय आणि म्हणतोय, ‘‘तो जिवंत आहे! आणि चमकतोयसुद्धा!’’
पत्रकारितेत काही काळ नोकरी करून सिनेशिक्षणाच्या दिशेने पाऊल. ‘ऐरावत’ या लघुपटाला २०१२ मध्ये तर ‘आरण्यक’ या लघुपटाला २०१५ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार. ‘मेनी मन्थस इन मिऱ्या’ या डॉक्युमेंट्रीचे विविध देशांमध्ये प्रदर्शन आणि कौतुक. ‘ब्रिटिश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स’तर्फे (बाफ्टा) ‘ब्रेकथ्रू इंडिया-२०२१’ या कार्यक्रमाअंतर्गत निवड.

renusavant@protonmail.com
मोड-भांग आणि डार्करूम या डॉक्युमेण्ट्रीज येथे पाहा..
https:// www. youtube. com/ watch? v=22 vsid3 tw2 A
https:// vimeo. com/120230259

Story img Loader