अलीकडच्या काळात कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्यशीलपणे कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील महनीय व्यक्तींविषयीचा ‘चरित्र ग्रंथमाला’ हा उपक्रम प्रतिष्ठानने हाती घेतला असून त्याअंतर्गत अकरा व्यक्तींची चरित्रे प्रकाशित केली जात आहेत. प्रस्तुत पुस्तक त्यापैकीच एक. या चरित्र ग्रंथमालेचा उद्देश हा थोर पुरुषांच्या कामाचा परिचय नव्या पिढीला, त्यातही विशेषत: शालेय व महाविद्यालयीन युवकांना करून देणे हा आहे. त्यानुसारच याही चरित्राचे लेखन करण्यात आले आहे. ‘तिमिरातुनि तेजाकडे’, ‘अंतरीचे बोल’, ‘मराठीचे मॅक्झिम गॉर्की’, ‘माणूसपणाचा शोध’ आणि तब्बल आठ परिशिष्टे असे या चरित्राचे स्वरूप आहे. त्यात साहित्यिक खांडेकर, पटकथाकार आणि त्यांचे समाजचिंतन यांचा स्थूल आढावा घेतला आहे. या चरित्रातून खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू समजून घ्यायला मदत होते.
‘वि. स. खांडेकर चरित्र’ – प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, पृष्ठे – १३६, मूल्य – १०० रुपये.
खांडेकरांचे छोटेखानी चरित्र
अलीकडच्या काळात कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्यशीलपणे कार्यरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-08-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little biography of khandekar