माणसाच्या खासगी किंवा सार्वजनिक जीवनात नित्यही काही घडत असतं. त्याकडे कसं बघितलं जातं आणि त्याचा अन्वय कसा लावला जातो हे त्या घटिताचा साक्षीदार असणाऱ्या व्यक्तीच्या मगदुरावर अवलंबून असतं. तो मगदूर तयार झालेला असतो त्याच्या बारीकसारीक तपशील न्याहाळण्यातून, विविधांगी अनुभव टिपण्यातून, त्याचे अर्थ लावण्यातून, चौकस वृत्तीतून, विस्तृत वाचनातून, चिंतनातून… आणि अशा समर्थ्यानिशी व्यक्त होणाऱ्या लेखकाची लेखणी सकस नसेल तरच नवल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वेगळ्या बाजाच्या ‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबऱ्या तसंच ‘अतीत कोण? मीच’ हा ललितलेखसंग्रह प्रसाद कुमठेकर यांच्या नावावर आहे. आणि आता हा नवा कोरा कथासंग्रह ‘… इत्तर गोष्टी.’ या संग्रहातील ‘क्षची गोष्ट’ आणि ‘इंसल्टेड सेल्स’ वगळता सर्व कथा मराठवाड्यातील ग्रामीण परिसरातील आहेत. बहुतेक कथन हे उदगिरी बोलीतलं असून, त्या कथांत लेखक स्वत: एक पात्र आहे. प्रथमपुरुषी एकवचनी कथन करताना कथक ‘लो प्रोफाइल’ राहतो. सामान्य व्यक्ती म्हणून वावरताना दिसतो. मात्र त्याचं मार्मिक आणि चपखल भाष्य गाफील वाचकाला दचकावतं.
हेही वाचा : झाकीरभाई…
कथानायक तरुण वयोगटातला आहे. कॉलेजातील मुली, त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी केलेली खटपट. माचो मॅन होण्याची ईर्षा- त्यासाठीची लटपट- तिचा अनपेक्षित शेवट, सिनेमामुळे विवाहासंदर्भातल्या रोमॅंटिक कल्पना आणि त्यांच्या विरोधात असणारं पारंपरिक कौटुंबिक वातावरण, या संघर्षाला तोंड देताना होणारी नायकाची ओढाताण… हे सगळं उदगिरी बोलीभाषेत वाचताना कोणतीही अडचण येत नाही. याला कारण लेखकाच्या कथनाचा वेग आणि त्याची शैली. लेखकाची बोली थोडी अपरिचित असली तरी दुर्बोध नाही. तिला एक लय आणि गोडवा आहे. कथनाचा बाज नर्मविनोदी आहे. स्वत:वर विनोद करत, प्रसंगी स्वत:कडे न्यूनत्व घेत आपल्या भोवताली घडत असलेल्या कथा फुलवण्याची लेखकाची हातोटी वेधक आहे. ‘माचो, ये तो बडा टॉइंग है!’, ‘फळ शोभन’, ‘जुते दो पैसे लो’, ‘जमवा जमव’ या कथा सिनेमा, जाहिरातींनी ग्रामीण भागातील तरुणांचं भावजीवन कसं गोंधळून टाकलं आहे याचं मार्मिक दर्शन घडवतात. लग्नसंस्था आणि कुटुंबसंस्था यांत होणारी नव्या पिढीची कुचंबणा, फिल्मी आभासी दुनियेतील वैयार्थ, तारुण्यसुलभ भावना कोळपून टाकणारं भोवतालचं बंदिस्त पारंपरिक वास्तव, मित्रांचा दबाव, भावनिक ओढाताण वर्णन करताना लेखक प्राचीन आणि आधुनिक परिभाषा, नूतन सांकेतिक संज्ञा वापरतो. दक्षिणावर्ति, वामावर्ति, पांचजन्य, पौंड्रक, अनंत विजय शंख अशा महाभारतकालीन शब्दासोबतीने महाबक्कळ, वल्लाकिच्च, कातावून असे थेट बोलीभाषेतील शब्दही वापरतो. लायटी, क्रिष्टल क्लीअर, मेंटल सपोर्ट, ट्युबा असे एतद्देशीय शब्द पेरत वाचकाला गोष्ट सांगत जातो. जनरलमधलं ज्ञान, एक नंबर फील, कोर्पोरेटीय, नर्वसपणा, बेक्कार बिझी, चिल्लपिल्लमध्येच, बाबापुता मोडवर अशा पद्धतीने देशीविदेशी शब्दांचे फ्युजनसुद्धा घडवतो. भाषेचं सोवळं झुगारून देतो. यामुळेच कथन प्रवाही होते आणि विनोदीसुद्धा. परंतु या कथानकातील विनोद संयमी आहे. ऐकीव किंवा सिनेमातील शृंगाराचे दाखले देतानाही तो वाहवत नाही. मर्यादा राखत आपलं मन मोकळं करतो. हा लेखक स्टोरीटेलरच आहे हे पदोपदी जाणवण्याएवढी त्याची भाषा बोलकी आणि वेधक आहे.
‘आडगावचे पांडे’ कथेतील पात्र म्हणतं, ‘आपण सोशल जरी म्हणत असलो तरी कुटुंबसंस्था ही पॉलिटिकल संस्था. इकनॉमिक्स त्याचा बॅकबोन. आणि फक्त याच एका मुद्द्यावर इथे युत्या होतात आणि तुटतातसुद्धा.’’ किंवा ‘‘माणसं माणसासारखी. काळी, गोरी, निमगोरी. घाण, छान. सगळ्याच कला आत मनामधी घेऊन बसलेली. कोणत्याही माणसाला पूर्ण पकडताच येत नाही. कवा कुणाचा अंधारवाला भाग समोर तर कवा उजेडवाला. माणसं अशी एकदम मुठीत घेताच येत नाहीत. त्यांना तसंच कलाकलानं घ्यावं लागतंय… चंद्रासारखं.’’
गावापुरता पैस असलेली ‘हॅमर्शिया’ ही कथा. एका सामूहिक बलात्काराच्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या तरुण, कोवळ्या वयातील वार्ताहराच्या निरागस नजरेतून सामोरी येत जाते. जागृत देवस्थान असणाऱ्या परिसरातच ही घटना घडून येते. आणि मग घटनेचे धागे जोडताना त्याला जाणवत गेलेला सामाजिक -आर्थिक ताणाबाण्याचा गुंता, त्यात अडकून हताशा आलेला तरुणवर्ग, बलात्काराचा गुन्हा, त्यामुळे बदललेली गावाची स्थिती आणि मानसिकता, त्याची होणारी घालमेल या सर्वांतून मूढ करून सोडणारी हताशा वाचताना वाचक तीच अनुभूती घेतो. कथानकाच्या उपरोधाची काटेरी टोकं वाचकाला अस्वस्थ करतात.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
गोष्ट म्हटली की तिचा पैस मर्यादित असणं अपेक्षित असतं. तो पैस विशिष्ट स्थळकाळ, विशिष्ट व्यक्ती आणि घटना यांना वेढून असणारा असतो. पण या मर्यादा प्रसाद कुमठेकर मानत नाहीत. त्यांच्या कथांचा पैस ऐसपैस आहे. स्थानिक ते वैश्विक म्हणावा असा. या कथासंग्रहातली पहिलीच कथा ‘क्ष’ची गोष्ट. क्ष म्हणजे कोण तर एक चेहरामोहरा नसलेला, कोणाला दाद दखल नसलेला एक सामान्य माणूस. माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात तो सर्वत्र आहे, पण कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित. अगदीच नगण्य. मरणारा/ मारला जाणारा, कोणाच्या हिशेबीही नसलेला असा. ‘‘‘क्ष’सारखी कॉमन माणसं अशीच मरतात… फुकटफाकट… स्वत:च्या मरणात स्वत: कसलाही हातभार न लावता.’’ मात्र त्याच्या कुचंबणेची, वेळोवेळी झालेल्या हत्येची साक्षीदार आहे एक स्त्री. तिचं कथन प्रथम पुरुषी आहे. लेखकाचं कथन कौशल्य हे की, कथक एक स्त्री आहे हे कथेच्या अगदी शेवटी वाचकाच्या लक्षात येतं. विलक्षण ताकदीने लिहिलेली आणि व्यापक पैस असलेली ही कथा वाचकाला अंतर्मुख करून सोडते.
या कथासंग्रहाला एकनाथ पगारांची प्रस्तावना आहे, मात्र ती पुस्तकाच्या अखेरीस. विस्तृत आणि वाचनीय अशी ही प्रस्तावना वाचकाला समृद्ध करणारी आणि म्हणून महत्त्वाची. चित्रकार श्रीबा यांचे मुखपृष्ठ समर्पक. ग्रंथरूप संकल्पन भूषण कोलते यांचे असून, मांडणी केतन बंगाल यांची. पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपात पपायरस प्रकाशनने प्रकाशित केलं आहे.
कुमठेकर अर्पणपत्रिकेत म्हणतात, ‘‘… यापेक्षा कितीतरी सरस पण पकडता न आलेल्या अचाट अनंत अद्भुत गोष्टी अजून तिथेच आहेत कुणी उचलण्याची वाट बघत…’’ त्या गोष्टी प्रसाद कुमठेकरांना लवकरच सापडोत, उचलता-पकडता-मांडता येवोत. ‘… इत्तर गोष्टी’, प्रसाद कुमठेकर, पपायरस प्रकाशन, पाने-१८८, किंमत- ३४०
veena.gavankar@gmail.com