माणसाच्या जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सायबर क्रांतीमुळे जग अधिक स्मार्ट, अधिक तरतरीत आणि तल्लख झालं असलं, तरी या सायबर नाण्याच्या दुसऱ्या घातक बाजूच्या परिणामांच्या आगीत जग वरचेवर होरपळून निघताना दिसते.

सायबरविश्वातील गुन्ह्यांची व्याप्ती किती मोठी आहे हे जागतिक आर्थिक मंचाच्या २०२३च्या जागतिक आर्थिक जोखीम अहवालात पाहायला मिळतं. सायबर गुन्हेगारीला आज आणि पुढील दहा वर्षांसाठी जगासमोर असलेल्या पहिल्या दहा मोठ्या जोखमींपैकी एक म्हणून या अहवालात स्थान देण्यात आले आहे. जर सायबर गुन्ह्यांच्या पसाऱ्याकडे एक अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं तर सायबर गुन्हेगारीविश्व हे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाईल असं हा अहवाल सांगतो! यात दिलेल्या आकडेवारीनुसार, सायबर गुन्ह्यांमुळे २०२४ मध्ये जगभरात लाखो कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

Mumbai Suburb, Mumbai Suburb Nature, Congestion ,
शांत काळोखाचे तुकडे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
butterfly
बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू
Loksatta lokrang Publisher obsessed with words
शब्द-सुरांत रमलेला प्रकाशक
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

हेही वाचा…भारतीय वास्तव; वैश्विक दृष्टी…

या पार्श्वभूमीवर राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ. संजय तुंगार आणि सुधीर साबळे लखित ‘सायबर अॅटॅक’ या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होते. या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर अशिक्षित, सुशिक्षित, मुले, मुली, वृद्ध, मध्यमवयीन यातील प्रत्येक जण रोज कोणत्या ना कोणत्या सायबर गुन्ह्यांना बळी पडत असतातच, पण याउपर मोठमोठ्या कंपन्या, संस्था आणि कधी कधी चक्क देशांची सरकारेदेखील सायबर गुन्हेगारीला बळी पडल्याची उदाहरणे आहेत. भारतात दरवर्षी लाखो सायबर गुन्हे घडतात. ‘सायबर अॅटॅक’मध्ये म्हटल्याप्रमाणे, या गुन्ह्यांचे बळी ठरण्याच्या कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण सायबर निरक्षरता असलं, तरी अनेकदा यामागे आपली फसगत कोणाला सांगण्याची लाज वाटणे, या गुन्ह्यांच्या प्रकरणात गुन्हेगारांकडून आणल्या गेलेल्या दडपणामुळे गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई होणे; हनी ट्रॅप, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन यात अडकल्याने येणारे ओशाळवाणेपण अशी कारणेही असतात. सायबर गुन्हा दाखल करण्यात झालेल्या दिरंगाईमुळे एका वर्षात भारतात सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या वीस लाखांपैकी फक्त सव्वा लाख लोकांना पैसे परत मिळाले, असं या पुस्तकात म्हटलं आहे.

सायबरविश्वाचे अपरिहार्यपणे नागरिक झालेल्या आपल्या सर्वांचे हे पुस्तक एखाद्या सुरक्षा कवचासारखे संरक्षण करू शकेल यात शंका नाही. सायबर गुन्हेगारीतील प्रकार विविध कथांच्या माध्यमातून सोप्या भाषेत लेखकांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. संगणकीय फसवणूक, आर्थिक गुन्हे-घोटाळे, सायबर सेक्स तस्करी, जाहिरात-फसवणूक, सायबर-दहशतवाद या प्रमुख गुन्ह्यांखेरीज इतर अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यांच्या कथांचा यात समावेश आहे. प्रत्येक कथेत येणाऱ्या पात्रांची सायबर-फसगत कशी होते याचे वर्णन करून हे टाळण्यासाठी काय करता येते याची सुस्पष्ट माहिती कथांच्या शेवटी सांगितली आहे.

हेही वाचा…लोभस आणि रसाळ!

हे पुस्तक वाचून होईतो आपण पूर्णपणे सायबर-साक्षर झालो नाही, तरी कोणत्याही सायबर गुन्ह्याला सहजासहजी बळी पडणार नाही इतके सायबर स्मार्ट नक्की होतो. ‘सायबर अॅटॅक’ -डॉ. संजय तुंगार आणि सुधीर साबळे, राजहंस प्रकाशन, पाने-१६३, किंमत-२९० रुपये.

Story img Loader