भाग्यश्री रोडे-रानवळकर
‘लोकरंग’मधील (१८ ऑगस्ट) मधील ‘बालमैफल’ विभागातील ‘सोनाराने कान टोचले’ ही ‘भारती महाजन रायबागकर’ यांची कथा म्हणजे लहानपणापासूनच स्वावलंबनाचे धडे शिकवणारी आहे. स्वावलंबन म्हणजे स्वत:ची कामे स्वत: करणे. कोणाच्या मदतीशिवाय आपले काम करता येणे खूप गरजेचे आहे. लाडाकोडात वाढलेली एकुलती एक मुले यांना पालक स्वत: कोणती कामे सांगत नाहीत, त्यामुळे मुलांना घरकामाची फारशी सवय नसते. पण आपण जर घरकामात लहान मुलांना मदतीला घेऊन त्यांना बाजारहाटाची ओळख करून देऊ शकतो.
कोणत्या ऋतूत कोणत्या भाज्या मिळतात, त्यांचे भाव काय, त्या भाजीचे शरीराला होणारे फायदे इत्यादी. तसेच घरातील वस्तू जागच्या जागी ठेवणे या सवयी अंगीकारले तर नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास होतो. मुलांना स्वावलंबनातून व्यवहारज्ञानाचे धडेदेखील आपोआप गिरवले जातील.
भाग्यश्री रोडे-रानवळकर, पुणे</strong>
© The Indian Express (P) Ltd