अन्वय सई निखिल
घोकडा : ‘‘चल ना रे बोक्या, कंटाळा आलाय.’’
बोक्या : ‘‘आपण विज्ञानाचे प्रयोग करायचे का?’’
घोकडा : ‘‘हो चल, तेल, केमिकल-२, पेस्ट- कोलगेट हे सगळे साहित्य टाकू या.’’
बोक्या : ‘‘ती पेजपण टाकू या.
घोकडा : ‘‘सगळे साहित्य टाकलं.’’
बोक्या : ‘‘हे काय होतंय?’’
घोकडा : ‘‘बाप रे हे काय बनतंय?’’
बोक्या : ‘‘अरे पळ घोकडा.’’
घोकडा : ‘‘थांब, बघू या.’’
बोक्या : ‘‘तर काय करायचं?’’
घोकडा : ‘‘डोळ्यांना त्रास होतोय.’’
बोक्या : ‘‘पापड त्याच्यात टाकून बघू या?’’
घोकडा : ‘‘ओक्के टाकतो.’’
बोक्या : ‘‘बाप रे, पापडाचं भूत.’’
घोकडा : ‘‘चल पळ भूऽऽऽत.’’
बोक्या : ‘‘मला चक्कर येतेय.’’
घोकडा : ‘‘काहीपण खोटारड्या.’’
बोक्या : ‘‘पण पापडाचं भूत बघ.’’
घोकडा : ‘‘अरे किती भीती वाटतेय.’’
बोक्या : ‘‘हो ना रे.’’
इयत्ता- चौथी, डोसीबाई जीजीभॉय प्रथमिक शाळा, गोरेगाव,
जामखेडची सफर
मी काल रानात गेलो होतो. माझ्या सोबत आबा आज्जी, प्रतीक काका, वरदकाका होता. मी कैऱ्या गोळा केल्या. मी रानात खूप उड्या मारल्या. मज्जा केली. नंतर आम्ही नाना काकाच्या घरी गेलो. तिथे चहा घेतला, मग थोडी मॅच बघितली आणि मोटारसायकलवरून घरी गेलो. मला रान खूप आवडलं. मी दरवर्षी सुट्टीत जामखेडला येणार असं मी मनोमन ठरवलं आहे. रानातून घरी आल्यावर मी रात्री दूध पोळी खाल्ली. आईने वडापाव खाल्ला. मी पुर्षूला स्ट्रॉबेरी स्लाईस आणि चॉकलेट दिलं. पुर्षूच्या पायाला टेबल लागलं होतं म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो. नंतर मी मॅच पाहिली व झोपलो.