|| समीर गायकवाड

त्या तरुणानं बासरी ओठी लावताच जे सूर उमटले त्याला तोड नव्हती. सुदाम्यानंच नव्हे, तर बाजारातल्या एकाही माणसानं उभ्या जन्मात तशी धून ऐकली नव्हती. तो वाजवत राहिला. एकेक करत बघे गोळा होत जाताच त्यानं सुदाम्याकडं आश्वासक नजरेनं पाहिलं. डोक्यावर बासरीचा डोलारा घेऊन सुदामा त्याच्या मागं मागं फिरत राहिला. रुक्याच्या शेजाऱ्यानं त्याच्या बाकीच्या जिनसांची जिम्मेदारी घेतली. त्या तरुणानं छेडलेल्या सुरांनी सगळा बाजार हरखून गेला. अवघ्या अर्ध्या तासात सगळ्या बासऱ्या विकून सुदामा जागेवर परतला. सोबतचा तो तरुण सुदाम्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता निरखत गालातल्या गालात हसत होता. सुदाम्याला आता घरी परतण्याची ओढ लागली होती. त्यानं आवराआवरी सुरू केली. सगळी बांधाबांध पुरी झाल्यावर त्यानं मागं वळून पाहिलं तर तो तरुण निघून गेलेला होता. सुदाम्याला त्याच्या गळ्यात पडून आभार मानायचे होते, ते राहूनच गेले.

Chikhla village missing kid, missing kid neel forest,
भंडारा : ‘नील’ला नेणारा तो ‘हरा मामा’ कोण ? चार दिवसांनंतर रहस्य…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
In Shegaon taluka over 50 people in three villages are rapidly losing hair
काय सांगता! शेगावात टक्कल पडण्याची साथ! अचानक केस गळती होऊन…
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
child found safe under tree , child dense forest,
चमत्कारच! चार वर्षांचा चिमुकला घनदाट जंगलात झाडाखाली सुखरूप सापडला; तीन दिवसांपूर्वी…
minor boy murder , boy Chandrapur murder ,
चंद्रपूर : क्रौर्याची परिसीमा… क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या
Wardha River , Chandrapur , Maurya,
वर्धा नदीच्या काठावर मौर्यकालीन अवशेष…
tarkteerth Lakshman Shastri Joshi
तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस

त्याला वाईट वाटलं. पण पुढच्याच क्षणी कलत्या सूर्याची जाणीव होताच तो पुन्हा पेठेच्या दिशेनं निघाला. छकुलीचा मोबाइल त्याच्या हाती आला तेव्हा सकाळपासूनचा शिणवटा निघून गेला. डोळ्यांत आनंदाश्रू, ओठावर हसू घेऊन ओस झालेल्या बाजारातून तो निघाला तेव्हा बऱ्यापैकी अंधारून आलं होतं. काळजात धस्स झालं. शेवटची एसटी सहाला असते, ती बहुधा चुकलीच असणार या विचारानंच तो अस्वस्थ झाला. झपाझप पावलं उचलत एसटी स्टँडवर गेला, पण गाडी निघून गेली होती. आता टमटमनं जावं लागणार होतं आणि सोबतचं गबाळ तिथं मावणारं नव्हतं. बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर एका टमटमवाल्यानं त्याला घेतलं, पण र्अध अंतर कापल्यावर त्याची गाडी पंक्चर झाली. भरीस भर म्हणजे स्टेपनी नव्हती. शेवटी सुदामाचा अपवाद वगळता त्यातले सर्व प्रवासी मिळेल त्या वाहनानं निघून गेले.

एव्हाना रात्र किर्र झाली होती. गर्द अंधार पडला होता. थकलाभागला सुदामा आपला बोऱ्याबिस्तरा घेऊन चालत निघाला. त्या निर्मनुष्य रस्त्यावर जवळपास तासभर तो चालत होता. एखाद् दुसरी दुचाकी अधूनमधून जायची, पण त्याच्यासाठी कुणी थांबत नव्हतं. पुनवेचा उजेड आणि परिचयाचा रस्ता याचंच समाधान होतं. दिवसभरच्या श्रमानं त्याचं सगळं अंग ठणकत होतं. पाय जड झाले होते. पण घराच्या ओढीनं वाटचाल सुखद वाटत होती. निम्मं अंतर कापून झाल्यावर त्याला मागून येणारा मोठा प्रकाशझोत आवाजासह जाणवला. तो वाटंच्या बाजूला झाला आणि गाडी पुढं जावी म्हणून थांबला. पण ती गाडी त्याच्याच जवळ येऊन थांबली. आतून ओळखीचा आवाज आला, ‘‘नाग्याचा सुदामा ना रे तू? पाटलाच्या वस्तीवरचा ना? गाडी चुकली जणू! वस्तीपाशी सोडू का तुला?’’

सुदाम्याला साक्षात् देव भेटल्याचा आनंद झाला. बंडा पवाराची गाडी होती ती. गावातली तालेवार असामी होती ती. त्यांच्या घरी अधूनमधून सूप-दुरडय़ा देण्यासाठी सुदामाचं जाणं-येणं असल्यानं त्यांनी अचूक ओळखलं होतं. सुदामा गाडीत मागं बसला. मागं छकुलीच्या वयाचा पवारांचा नातू मोहन हा एकटाच होता. त्यामुळं सुदामाचं सगळं बिऱ्हाड त्यात मावलं. सुदामानं त्या पोराच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. अंगाचं मुटकुळं करून कोपऱ्यात अंग चोरून बसला. गाडीत जुजबी संवाद झडत राहिले. बोलणं सरेपर्यंत पाटलांची वस्ती जवळ आलीदेखील. आपला पसारा हाती घेत सुदामा गाडीतून उतरला. त्यानं बंडातात्याला हात जोडले, तसं त्यांनी त्याचे हात अडवले आणि क्षणात धूळ उडवत त्यांची गाडी पुढे गावाच्या दिशेनं निघून गेली.

गाडीचा आवाज रात्रीच्या अंधारात विरून गेला. थोडय़ाशा विश्रांतीनं सुदामा ताजातवाना झाला होता. मोठय़ा खुशीनं तो घराच्या दिशेनं निघाला. त्याच्या आवाजानं सावध झालेले मोत्या, चिल्या त्याच्या दिशेनं ढेकळातून वेगानं धावत आले. शेपूट हलवत त्याचे हातपाय चाटू लागले. ‘कूऽऽकूऽऽ’ आवाज करत पायात घुटमळू लागले. सुदाम्यानं त्यांना गोंजारल्यावरच ते शांत झाले. त्यांच्या आवाजाने चांगुणा बाहेर आली. पुढं होत तिनं सुदाम्याच्या दोन्ही खांद्यांवरची गाठोडी खाली ठेवली आणि प्रश्न केला, ‘‘मोबाइल का काय, ते मिळाला नव्हं? पोरगी झोपी जाईस्तोवर घोकत होती!’’ ‘‘अगं, बस कर, दम लागंल! मला जरा टेकू तरी दे..’’ सुदामा उत्तरला. चांगुणा आत गेली. लख्ख पितळी तांब्यात पाणी आणलं. गटागटा आवाज करत सुदामा पाणी प्यायला. मिशीवर ताव देत म्हणाला, ‘‘मोब्बाइल आणला आणि सगळ्या बासऱ्या दिकून विकल्या!’’ त्याच्या उत्तरानं चांगुणा भांबावल्यागत बघत राहिली.

बराच वेळ ते दोघं गप्पा मारत बसले. पिठलं- भाकरीचं ताट तिनं पुढय़ात ठेवताच त्यानं मनसोक्त ताव मारला. जेवण झाल्यावर चांगुणेनं त्याचे हातपाय चेपून दिले. गरम पाण्यानं तळवे शेकले. एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून ते दोघं बराच वेळ नि:शब्द बसले होते, तेव्हा चंद्राला भुललेलं चांदणं त्यांच्या बाजंभोवताली कडं करून भरल्या डोळ्यानं त्यांना न्याहाळत होतं. बराच वेळ शांततेत गेल्यावर चांगुणेनं मोबाइल बघण्याची इच्छा व्यक्त केली. सुदामा घरात गेला. झोपलेल्या छकुलीच्या गालावरून त्यानं आधी मायेनं हात फिरवला. मग रिकाम्या दुरडय़ा ठेवलेलं गाठोडं त्यानं सोडलं आणि त्याला भोवळच यायची उरली. जमा झालेले पैसे, मोबाइलचा बॉक्स सगळं गायब होतं. दुरडय़ा पालथ्या करून बघितल्या, तर ज्या धोतराच्या कापडानं गाठोडं बांधलं होतं ते हातभर फाटलेलं होतं.

कपाळावर हात मारत सुदामा बाहेर आला. घडल्या आक्रिताने चांगुणाही सरभर झाली. बासरीच्या कच्च्या मालाचं देणं कसं द्यायचं, याचा प्रश्न सुदाम्याच्या मनात उभा ठाकला. सकाळी उठल्यावर छकुलीला काय उत्तर द्यायचं, हे दोघांनाही सुचेनासं झालं. जिवाचा पालापाचोळा झाला. सगळा पसारा चार वेळा उलथापालथा करून बघितला, पण हाती काहीच आलं नाही. गुडघ्यात डोकं खुपसून हताशपणे बाजेला टेकून बसलेल्या सुदाम्याच्या मांडीवर चांगुणेनं डोकं ठेवलं तेव्हा त्याच्या डोळ्यांतले अश्रू तिच्या कपाळावर ठिबकत होते. दूर आकाशातून श्वास रोखून हे दृश्य बघणारी शुक्राची चांदणी रात्रभर घायाळ होत राहिली. पहाटेच्या सुमारास दोघांचा डोळा लागला.

बांधाजवळ वाजणाऱ्या हॉर्नच्या आवाजाने आणि ‘‘सुदामाव ऐ सुदामाऽऽ’’ या हाळीनं सुदाम्याला जाग आली आणि तो त्या दिशेने धावतच निघाला. चांगुणाही पाठोपाठ गेली. ती गाडी तर बंडा पवारांची होती. गाडीचं दार उघडून शाळेच्या गणवेशातला अजित खाली उतरला. त्यानं मोबाइलचा बॉक्स आणि पैसे एकत्र ठेवलेली एक पिशवी सुदामाच्या हाती देत म्हणाला, ‘‘रात्री तुम्ही गाठोडी गाडीत ठेवली आणि कोपऱ्यात बसलासा. सीटच्या बुडाला असलेल्या खिळ्यानं काम केलं! गाठोडं उभं फाटलं. वाटंनं खड्डे खुड्डे लागल्यावर आतल्या जिनसा बाजूला पडल्या. बहुतेक मोठाल्या दुरडय़ा आत होत्या, त्या मात्र आत अडकून बसल्या!’’ इतकं बोलून तो गाडीत बसला. बंडातात्यांचा हात हलला आणि गाडी निघून गेलीदेखील!

सुदामा आणि चांगुणा इतके हरखून गेले होते, की त्यांना काहीच सुचत नव्हतं. भानावर येताच दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागले. त्यांच्या गलक्यानं जागी झालेली छकुली डोळे पुसत बाहेर आली. बाबाच्या हातातल्या पिशवीतला मोबाइल तिला खुणवत होता. पण तिनं आधी त्या दोघांना मिठी मारली. हे बघताच जुंधळ्याच्या टपोऱ्या दाण्यांवर हसू उमटलं. शेतशिवार खुलून उठलं. फुलपाखरं भिर्र्र झाली. पारव्यांना पंख फुटले. गव्हाच्या लोंब्या लाजून चूर झाल्या. आणि उसाच्या फडात वाऱ्याने झिम्मा धरला!

पिशवीतला मोबाइल काढून सुदाम्यानं छकुलीच्या हाती ठेवला, तसं दिवसाढवळ्या अख्खं तारांगण तिच्या डोळ्यांत उतरलं. गालावर मस्त खळी उमटली! पैसे मोजून बघितले तर ते बरोबर निघाले. पिशवीच्या तळाशी आणखी काहीतरी होतं. पिशवी पालथी केली तेव्हा आतून ती निळी बासरी खाली पडली. सुदाम्याला लक्षात येत नव्हतं, की त्या तरुणाला आपण बासरी दिली की त्याच्याकडून परत घेतली? गोंधळलेल्या चेहऱ्यानं तो चांगुणेकडं बघत होता. तर चांगुणेचं चित्त लेकीच्या मुखावरल्या प्रसन्नतेत गुरफटलं होतं. दूर गावातनं विठ्ठल मंदिरावरून येणारे ‘नको वाजवू श्रीहरी मुरली..’चे जादूई स्वर कोवळ्या केशरी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या आसमंताला भारून टाकत होते!

sameerbapu@gmail.com

Story img Loader