विजय तांबे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजरोस दडपशाही चालणाऱ्या रशियात अलेक्सी नवाल्नी हा जनतेसाठी आशेचा किरण बनला. आपल्या देशातील भ्रष्टाचार नष्ट व्हावा, प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळावे, निष्पक्षपणे निवडणुका घेतल्या जाव्यात यासह सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी न्याय्य मागण्या त्याने केल्या. पुतिन राजवटीतील भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याच्यावर निर्बंध लादले गेले. अटक करून त्याला मृत्युयातना देण्यात आल्या. तरीही ‘निर्भय व्हा’ हा त्याचा संदेश जगभरातील लोकशाहीप्रेमींना प्रेरणादायक वाटला. गेल्या वर्षी याच दिवशी अलेक्सी नवाल्नी जग सोडून गेला. पण स्पष्ट हरायची लढाईदेखील का लढायची असते, याचे कारण देऊन. नवाल्नीच्या संघर्षाचे चिंतन करणारे दोन आलेख…
शियाचा माजी विरोधी पक्षनेता अलेक्सी नवाल्नी यांच्यावर २०२० मध्ये सुरक्षा दलांनी विषप्रयोग केला. त्यांना जर्मनीत एअर अॅम्बुलन्सने हलवलं. या सगळ्या खटाटोपासाठी त्यावेळच्या जर्मन चान्सलर अँगेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांना खूप काही करावं लागलं. नवाल्नींवर सहा महिने उपचार चालू होते. त्यांचा जीव वाचला. तब्येत ठीकठाक झाली. मर्केल मॅडमचा आग्रह होता की त्यांनी काही दिवस जर्मनीतच राहावं, लगेच परतू नये. अलेक्सी नवाल्नींनी ऐकलं नाही. त्यांना परत जाऊन लढाई चालू ठेवायची होती. प्रत्येक वेळी विमानतळावरून सभेला जाण्याचा नेम पाळणारे अलेक्सी यावेळी सभेला जाऊ शकले नाहीत. विमानतळावर उतरताच त्यांना अटक करून सैबेरियातील तुरुंगात पाठवले गेले.
शासनाच्या सगळ्या यंत्रणांनी दमनाची हत्यारे वापरली तरीही अलेक्सी नवाल्नींच्या सभांना गर्दी होत असे. लोकांशी थेट संवाद साधायचे अफलातून कौशल्य त्यांच्याकडे होते. लोकांना ते आपल्यापैकी एक वाटत. भ्रष्टाचार नष्ट करा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, न्यायमार्गाने निवडणुका, युद्धग्रस्तांना भरपाई, सर्वसामान्य जनतेच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावा अशा साध्यासुध्या त्यांच्या मागण्या होत्या. सगळ्या बाजूने कडक निर्बंध असताना त्यांनी समाजमाध्यमे आणि इंटरनेटचा वापर करून जनसंपर्क व्यापक केला. पुतिन राजवटीतील भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणली. जर्मनीतून रशियात कधी, कुठे आणि किती वाजता येणार हे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. त्यांच्या स्वागतासाठी सर्व अडथळे दूर करून हजारो चाहते विमानतळावर जमले. प्रचंड दमन आणि दडपण असताना सामान्य माणसं रस्त्यावर उतरतात, जेलमध्ये जायला तयार होतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अलेक्सी नवाल्नी हा रशियन जनतेचा आशेचा किरण होता. विमानतळावर उतरल्यावर त्याला अटक करण्यात आली. देशद्रोह,आतंकवादाला खतपाणी घालणे इत्यादी आरोप (यात अर्बननक्षल हा आरोप नव्हता) ठेवले गेले. अटक होताना त्याने जनतेला संदेश दिला- ‘मी भयमुक्त आहे तुम्हीसुद्धा निर्भय व्हा.’ १६ फेब्रुवारी २०२४ रोजी कुटुंब आणि आपल्या सहकाऱ्यांपासून दूर सैबेरियात त्यांना मृत्यूने गाठले. अलेक्सी नवाल्नींचे नाव नोबेल पारितोषिकाच्या नामांकनात होते. त्यांच्यावरील ‘नवाल्नी’ नावाच्या डॉक्युमेण्ट्रीला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. इतकी माहिती मिळाल्यावर ती डॉक्युमेण्ट्री बघायची तळमळ वाढली.
माझा मित्र मंदार यालासुद्धा अलेक्सींबद्दल माहिती होती. पण त्याची एक तक्रार होती-
‘‘हकनाक जीव गमावला त्यांनी. जर्मनीवरून परत कशाला यायचं? रशियात प्रचार करून झाला होता. बाहेर राहून संघर्ष करता आला असता. जीव वाचला असता ना! इथेच चुकतात हे.’’
मी म्हटलं ‘‘मग भगर्तंसग शेवटी असेम्ब्लीत बॉम्ब टाकायला कशाला गेला होता?’’
‘‘ म्हणजे?’’
‘‘तिथं न जाता मुकाट गप्प राहिला असता तर म्हातारपणी पंजाबचा मुख्यमंत्री नक्कीच झाला असता.’’
‘‘चूक ते चूकच. स्पष्ट हरायची लढाई लढायचीच कशाला?’’ असं ताडकन् बोलून मंदार गप्प झाला. त्याचा अस्वस्थपणा लपत नव्हता. मी चहा करायला गेलो. मंदार सतत मोबाइल हाताळत होता, पण बघत नव्हता. समोर चहा ठेवत त्याला विचारलं, ‘र्‘ंजकायची लढाई कोणती असते?’’
त्याला उत्तर न सुचल्यानं त्याचा अस्वस्थपणा शारीरिक हालचालींतून दिसू लागला. त्या स्थितीत त्याने चहात टोस्ट बुडवला. अंदाज चुकला. भिजका भाग चहात पडला तर सुका भाग हातात. त्याचा चेहरा अजून चिडचिडा व्हायच्या आत मी त्याला हातात चमचा देत म्हटलं, ‘‘आधी शांतपणे टोस्ट खाऊन घे.’’ त्यानं ‘बरं’ म्हणण्यासाठी मान हलवली आणि तो कामाला लागला.
‘‘आपण अपेक्षित मार्कांनी पास झालो की म्हणतो र्मी ंजकलो. रस्त्यातून तुंबलेल्या ट्राफिकमधून वाट काढत वेळेवर पोचलो की हुश्श म्हणत बोलर्तो ंजकलो बुवा एकदाचे.
‘‘कदाचित विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्रभाऊ, अजितदादा आणि एकनाथराव म्हणाले असतील यस्र्! ंजकलो! … बरोबर ना?’’ मी विचारल्यावर चहाचे घोट घेत मंदारनं होकारार्थी मान हलवली. मी पुढं विचारलं, ‘‘या र्‘ंजकलो’वाल्या लढाया आणि अलेक्सींची लढाई यात काही फरक आहे ना? की लढाया म्हणजे लढाया. सगळ्या सारख्याच. असं तुला म्हणायचंय?’’
‘‘नाही. नाही. मला इतका बावळट समजू नकोस. तो विरोधी पक्षनेता झाला. लोकप्रिय व्हायला लागला. तेव्हाच मला वाटलं होतं की काहीतरी घातपात होईल. माझा मुद्दा एवढाच आहे तो परत कशाला आला? ’’
‘‘हा मुद्दा नाहीच. घातपात कुठेही करता येतो. आणि जे तुला वाटतं त्याचा अलेक्सींना अंदाज नसेल? तरीही ते असे का वागत होते? जसं गांधींच्या प्रार्थना सभेत बॉम्ब टाकल्यावरही त्यांनी सुरक्षा का नाकारली?’’
मंदारने चिडखोर आवाजात विचारलं, ‘‘तुला काय वाटतं, मी या सगळ्यांना मूर्ख समजतोय?’’
‘‘परीक्षा पास होणं ते निवडणूर्क ंजकणं ही ध्येये व्यक्तिगत आहेत. आपल्या एकूण जीवन कालावधीत पूर्ण करण्यासारखी आहेत. ज्यांची ध्येये त्यांच्या आयुष्याच्या खूप पलीकडली असतात, ते तुझी हरण्याची लढाई खेळत असतात. ते असं का करतात? हा तुला- मला बोचणारा काटा समज.’’
मंदार परत पोटतिडकीने म्हणाला, ‘‘हे सर्व ठीक रे, पण जीव वाचला असता ना!’’
‘‘जे तुला- मला कळतं ते त्यांना कधीच कळलं असणार. तरीही त्यांना असं वागण्याची प्रेरणा का होते? हा खरा प्रश्न असतो. उच्च नैतिक मूल्यांच्या आधारावर योग्य काय याचा विचार करून त्यासाठी आपलं जीवन झोकून द्याायचं ठरवलं जातं त्यावेळी परिणामांचा विचार्र ंकर्वा ंचता नसते.’’
‘‘मग या प्रेरणा येतात कुठून?’’
‘‘यांची जीवनावर अपार श्रद्धा असते. मानवी जीवन अधिक सुसंस्कृत, सभ्य, सहिष्णु आणि प्रेममय करण्याची प्रचंड तळमळ या मंडळींना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच ते मनाला हवं तसं… नको असं म्हणू, त्यांच्या अंतरात्म्याला पटेल तेच करत राहतात. व्यापकता इतकी पसरते की त्यांचा ‘स्व’ विरघळत असावा, पण त्या विरघळण्यात एक मेख आहे.’’
‘‘ती कोणती?’’
‘‘विरघळण्याच्या प्रक्रियेत तो संपूर्ण सर्व समावेशक होत जातो. आपल्यात अख्खा समाज सामावून घेतो. समाज अधिक उन्नत घडवण्याचा विचार हा त्याचा पाया असतो. म्हणूनच त्यांच्या कृतीला नैतिक आधार मिळतो. अरे, आपल्या तत्त्वासाठी जिवावर उदार होणारे दहशतवादी असतातच. मात्र त्यांच्याकडे या नैतिक भानगडी नसतात. थोडक्यात, आपल्या तत्त्वासाठी जीवन अर्पण करणे हा एकच निकष चुकीचा आहे. या मुद्द्याची स्पष्टता नसल्याने सध्या दहशतवाद्याांची पूजा होताना दिसते. तरीही सर्वसामान्य माणूस सुष्ट-दुष्ट, नैतिक-अनैतिक हे भेद जाणत असतो. हे भेद जाणणाऱ्यांपर्यंत अलेक्सीसारख्यांचे नैतिक आव्हान पोहोचते. सामान्य माणसात बदलांच्या शक्यता निर्माण होतात.’’
‘‘अलेक्सी नवाल्नीने परतायचा निर्णय कसा घेतला असेल?…
‘‘मला असं सुचलं की, जर्मनीतून निघायचे की नाही हा प्रश्न स्वत:च्या अंतरंगात डोकावून त्यांनी अंतरात्म्याला विचारला असेल. आणि होकारार्थी उत्तर हे त्याच्या शरीराच्या पलीकडचे आहे हे त्याला तेव्हाच कळले असेल.’’
‘‘तरीही त्याचं परतणं खटकतंच…’’ मंदार पुटपुटला.
मी आपोआपच वरच्या स्वरात सुरू झालो. ‘‘त्याचं काही चूक नाही. खोट आपल्यात आहे. अलेक्सी नवाल्नी रशियातला. डोळे, कान आणि डोकं उघडं ठेवून आसपास पाहिलं तर आपल्या जवळपास अनेक अलेक्सी दिसतात. त्यांच्या प्रेरणा, त्यांची नैतिकता समजून घेण्याइतके आपण संवेदनाक्षम असतो. आपल्याला परिस्थितीचं भान असतं. तरीही आपण मूग गिळून असतो. परिस्थिती शरण असतो. त्याचं दु:खसुद्धा आपल्याला होत असतं. मात्र ही नैतिक बोचणी आपण मोकळेपणाने बोलत नाही. मग सगळ्या अलेक्सींनी असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं असं बोलत राहतो.’’
मंदारने चिडून विचारलं, ‘‘मग काय करू मी?’’
‘‘सगळे अलेक्सी तुझ्या सल्ल्यानुसार वागले की त्या अलेक्सींचा मंदार होणार. आणि तू खूश होणार. तेच तर त्यांना नकोय ना !’’