बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, हे तत्त्व पाळत बहुतेकजण आपली वाटचाल करत असतात. पण या बहुतेकांमध्ये एखादा जिप्सी असाही असतो, ज्याला रुळलेल्या वाटेने जायचे नसते. चारचौघे करतात ते करायचे नसते. आपल्या वाडवडिलांनी कल्पनाही केलेली नसते अशा गोष्टी करून बघायच्या असतात. अशा व्यक्तीला अज्ञाताच्या हाका सतत ऐकू येत असतात. तिला कोणतीही गोष्ट अडवू शकत नाही, कशाचाही तिला अडसर होत नाही. घरात व्यवसायाची कसलीही पार्श्वाभूमी नसताना, पर्यटनासारख्या वेगळ्या, एक प्रकारे अनिश्चिातता असलेल्या क्षेत्रात झोकून देणाऱ्या, आपल्या जिद्दीने त्यात यशस्वी होणाऱ्या, जगावेगळे अनुभव घेत आपलं आयुष्य घडवणाऱ्या अतुल मोहिले यांचं आत्मकथन ‘माझा ‘अतुल’नीय प्रवास’ या पुस्तकात वाचायला मिळतं. काहीतरी वेगळं करून बघण्याची इच्छा, सतत नव शिकण्याची जिद्द आणि ‘गेट वर्क डन’ हा दृष्टिकोन असेल तर माणूस काय काय करू शकतो, हे पुस्तक वाचून समजतं. ठिकठिकाणचं पर्यटन, तिथे पाहिलेलं जग, तिथल्या माणसांचे आणि सोबत नेलेल्या पर्यटकांचे आलेले अनुभव हे सगळे लेखकाने रंजकपणे मांडले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा