‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर)मधील डॉ. राधिका विंझे यांचा ‘विज्ञानव्रती’ हा लेख वाचला. डॉ. रोहिणी गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी ‘मौज’मध्ये ‘मूलकण’ याविषयी लिहिलं होतं आणि अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं होतं; तेव्हापासून त्यांच्याबद्दल कुतूहल होतं.– शशिकांत सावंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मर्मस्पर्शी लेख
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर) मधील डॉ. राधिका विंझे यांचा ‘विज्ञानव्रती’ हा लेख वाचला. डॉ. रोहिणी गोडबोले यांच्यावरचा मर्मस्पर्शी लेख वाचून आनंद झाला. अशा प्रकारचे शिक्षक, संशोधक, मार्गदर्शक मिळणे हल्ली दुरापास्तच झाले आहे.-डॉ. सिद्धार्थ वाकणकर, वडोदरा.
आदरभाव वाटावा असं व्यक्तिमत्त्व
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर)मधील डॉ. राधिका विंझे यांचा ‘विज्ञानव्रती’ हा लेख वाचला. या लेखातून लेखिकेने एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली आहे. मी विद्यापीठाचे दोन रिफ्रेशर कोर्स केले हेाते. दोन्ही वेळेस त्यांना व्याख्यात्या म्हणून आमंत्रित केले होते. त्यांना बघताक्षणी त्यांच्याबद्दल ‘आदरभाव’ वाटला होता. त्यावेळेस त्यांचा विषयाचा आवाका, त्यावरील हुकुमत, शिकवतानाची शिक्षकी तळमळ या सर्वांचे दर्शन घडले. अशा व्यक्तींबद्दल नेहमी आदरभावाबरोबरच अचंबा, कृतज्ञता मनात कायम घर करून राहते. त्यांच्या व्याख्यानाने समोरची व्यक्ती भारावून जाई.– विश्वास अनंत जोशी, ठाणे.
उत्तम लेख
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर) मधील डॉ. राधिका विंझे यांचा ‘विज्ञानव्रती’ हा लेख वाचला. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ पद्माश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे संशोधनकार्य आणि व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा लेख वाचताना त्यांनी संशोधन क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी, तसेच महिलांनी या क्षेत्रात यावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांची दखल घेतली गेली हे महत्त्वाचे. संशोधन क्षेत्रात महिलांची संख्या कमी असून या लेखात दिलेली कारणे योग्यच आहेत. आपल्याकडे महिलांकडून नोकरी व मुलांचे संगोपन याच अपेक्षा असतात. परंतु महिला घरात तसेच कार्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करीत असतात हे विसरले जाते. त्यांची कल्पनाशक्ती, मेहनत करण्याची तयारी, संयम, प्रयत्न, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा या गोष्टी संशोधन क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत.– उमा हाडके, कोचीन.
पर्यावरणाचा ऱ्हास
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर)मधील ‘विळखा काजळमायेचा’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक पर्यावरणहानीला प्रगत देशांना जबाबदार धरून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. मात्र तसे करताना देशांतर्गत पर्यावरणाची आपण किती हानी केली आहे याचा लेखाजोखादेखील मांडण्याचीही गरज आहे.
विकासाच्या नावाखाली भारतातील शहरांची चहू दिशांनी अमिबाप्रमाणे होणारी अनियंत्रित वाढ हानिकारक ठरली आहे. नगरनियोजन हा विषय आपण ‘ऑप्शन’ला टाकल्याचा हा परिणाम आहे. केवळ गगनाला भिडणाऱ्या उंचच उंच इमारती बांधल्या जात आहेत. मात्र नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावत चालला आहे. IQAir, Switzerland या संस्थेच्या WHO चे निकष वापरून केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील ३५ शहरे आहेत याची आपण जराही खंत बाळगत नाही. त्यात देशाची राजधानी दिल्ली पहिल्या पाचांतील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. देशातील अनिर्बंध आणि बेलगाम विकास प्रकल्प पर्यावरणाच्या हानीला आमंत्रण देणारे ठरले आहेत. किमान १५ राज्यांमध्ये आलटूनपालटून भूस्खलन होऊन गावे, माणसे गाडली जातात आणि मोठी जीवित-वित्तहानी होते. आपण तात्पुरते मलमपट्टीसारखे उपाय करून मोकळे होतो, पण कायमस्वरूपी धोरणे आखून उपाययोजना करत नाही. नदीला आपण मातेसमान पूजतो (गंगा मैया, नर्मदा मैया) मात्र याच नद्या आपण प्रचंड प्रमाणात प्रदूषित करताना जराही तमा बाळगत नाही. खळाळणाऱ्या नद्यांचे आपण दुर्गंधीयुक्त ओढे आणि नाले करून टाकले आहेत. शासन, लोकप्रतिनिधी, नागरिक प्रदूषणाबाबत गंभीर नाहीत. एकूणच देशाअंतर्गत पर्यावरण रक्षणात आपण चक्क नापास झालो आहोत. २०४७ मध्ये प्रगतिशील, पण प्रदूषित भारत पुढारलेला आणि प्रगत देश कसा होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.– डॉ. वि. हे, इनामदार
आपण कधी जागे होणार?
‘लोकरंग’ (१० नोव्हेंबर) मधील ‘विळखा काजळमायेचा’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. पण खरा मुद्दा हा आहे की आपण कधी जागे होतो हा! समस्त प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवप्राण्यांत विचार करण्याची अनन्यसाधारण अशी निसर्गदत्त शक्ती – क्षमता आहे हे मानवजातीचे एक वेगळे वैशिष्ट्य असले तरी काहीही केल्यास विचार करण्यास तयार नसणे, हेदेखील या मानवप्राण्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) या जागतिक हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने एका अहवालाद्वारे तापमानवाढीतून होणाऱ्या हवामान बदलाचा निर्वाणीचा इशारा जगाला आणि धोरणकर्त्यांना दिला आहे.
नुकतेच जगाच्या लोकसंख्येने ८०० कोटी म्हणजेच ८ अब्जांचा जागतिक लोकसंख्येचा नवा उच्चांक नोंदवला आहे. येत्या तीस वर्षांत जगाची लोकसंख्या किमान साडेनऊ अब्ज होईल आणि तेवढ्या खाणाऱ्या तोंडांना पोटभर अन्नधान्य मिळण्यासाठी शेतमालाच्या उत्पादनात किमान साठ टक्क्यांनी वाढ करावी लागेल असा इशारा जागतिक अन्न व कृषी संस्थेने दिला आहे. तर दुसरीकडे तापमानवाढ आणि हवामान बदल ‘ग्लोबल वार्मिंग’ या घटकामुळे शेतीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असल्यावर जगभरातील सर्वच शास्त्रज्ञांचे आता एकमत झाले आहे.
सुमारे २९ वर्षापूर्वी म्हणजेच १९९२ साली विज्ञान क्षेत्रातील अनेक नोबेल पारितोषिक विजेते व युनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्टस यांनी संयुक्तरित्या मानवाला उद्देशून एक पत्र लिहिले की, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर अतिशय गंभीर परिणाम होत आहे, त्यामुळे हवामानबदल, तापमान वाढ व जैवविविधता धोक्यात आली असून स्थानिक ते जागतिक अशा सर्वच धोरणकर्त्यांनी यातून योग्य तो बोध घेऊन पर्यावरण रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. तर २०१७ मध्ये जगभरातील तब्बल पंधरा हजार शास्त्रज्ञांनी, मानवाचे पृथ्वीवरील भवितव्य अथवा अस्तित्व अवलंबून असल्याच्या ज्या काही नऊ मर्यादा आहेत, त्यापैकी तीन मर्यादा तर २००९ सालीच ओलांडल्या आहेत. हवेतील कर्ब उत्सर्जन वाढीमुळे पृथ्वीचे हरितछत्र व वातावरणातील ओझोनछत्र विरळ होत आहे. परिणामी तापमानात वाढ होत आहे आणि ती अशीच होत राहिली तर लवकरच पृथ्वी हा शुक्र ग्रहासारखा उष्ण ग्रह होऊन पृथ्वीवरील तापमान वाढीची परिणती अखेर पृथ्वीवरील जीवसृष्टी कायमची नष्ट होण्यात होईल.– बाळकृष्ण शिंदे, पुणे