‘लोकरंग’मधील (४ फेब्रुवारी) ‘झुंडीला नेमके काय हवे असते?’ हा संकल्प गुजर यांचा लेख वाचला. राज्यव्यवस्था आणि कार्यकारी मंडळ आणि त्याचे मुख्य स्तंभ याचाच विसर आज पडत गेला आहे- तो जागतिक स्तर असो अथवा एखादा देश. जनआंदोलने ही होतच असतात. एकोणिसाव्या किंवा विसाव्या शतकात काही देशांत राज्यक्रांती घडून गेली, ती क्रांती एकविसाव्या शतकातील पिढीला माहिती आहेत का? याउलट आजची आंदोलने ही केवळ एका विशिष्ट विचारसरणीस अनुसरून होत नाहीत, तर त्यांना खतपाणी घालणााऱ्या राजकीय नेत्यांमुळे होताना दिसतात. त्यातील उदाहरण घालून द्यायचे असेल तर ट्रम्प यांचे उदाहरण नक्कीच डोळयासमोर येते. एखादा सत्ताधीश मोठमोठया बाता मारून सत्तेवर येतो, पण त्यातून काही चांगले घडले नाही. मग अशा झुंडी युवा वर्गातून निर्माण होतात. काही राज्यांत चाललेली आंदोलने ही आगामी काळातील चाहूल तर नाही ना, असा प्रश्न पडतो. पण एक मात्र खरे की, अशा झुंडशाहीला राजकीय पाठबळ असतेच आणि त्यातूनच अशी आंदोलने अथवा क्रांती घडवून आणली जाते.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा