जेम्स बॉन्डचं नाव घेतलं की त्याच्या एन्ट्रीच्या वेळेस वाजणारं गिटारवरचं म्युझिक आपसूक आपल्या कानात रुंजी घालू लागतं. ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’ किंवा ‘द गुड, द बॅड अॅण्ड द अग्ली’ या चित्रपटांची नावं घेताच जुन्या पिढीतल्या लोकांच्या डोक्यात त्यात वाजणारी शिट्टी घुमू लागते. गब्बरसिंग म्हटलं की त्याच्या मागे वाजणाऱ्या गूढ ध्वनीची आठवण सगळ्याच ‘शोले’करांना होते. आत्ताच्या पिढीला ‘डी. डी. एल. जे’मधलं मँडोलिन किंवा ‘कभी खुशी कभी गम’चं (चित्रपटाच्या पाश्र्वसंगीतात साधारण पाच कोटी वेळा वाजलेलं!) टायटल साँग आठवतं. या चित्रपटांची किंवा व्यक्तिरेखांची नावं घेतली की त्यांच्या आठवणींबरोबर त्यांच्याशी निगडित सूर आपल्या मनात का उमटतात? आजी आपल्याला लहानपणी झोपवताना जी अंगाई गायची, त्याचे सूर आजही कानावर पडल्यानंतर आजीच्या हातांच्या सुरकुतलेल्या मायाळू स्पर्शाची आठवण प्रकर्षांनं का बरं होते? सनईचे सूर कानावर पडताक्षणी मंगलमय वातावरणाची अनुभूती होण्याचं कारण काय असावं? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे- ‘श्रवणसंस्कार!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा