|| गिरीश कुबेर

तेलसमृद्ध आणि तेलविहीन या दोन प्रकारांतली जगाची विभागणी तशी जुनीच. पण तिचे नवै पैलू ऊर्जातज्ज्ञ डॅनियल एर्गिन यांच्या ताज्या पुस्तकामुळे दिसतात. अमेरिकेतल्या फ्रॅकिंगचा संदर्भ ताजा. त्या अनुषंगानेएर्गिन यांचे या पुस्तकातील भाष्यही ताजे. हे भाष्य सध्या पुतिन यांच्या सौजन्याने खरे ठरत आहेच..

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
Japan plunged into political uncertainty after voters deliver dramatic defeat to longtime ruling party
जपानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल… ५० वर्षांहून अधिक काळ सत्तारूढ पक्षाची घोटाळ्यांमुळे पडझड?
difficulty of official candidates increased in constituencies of Bhandara Due to large number rebel candidate in vidhan sabha election 2024
भंडारा जिल्ह्यात बंडखोरांची मनधरणी
Iran's Khamenei gives order to prepare for an attack
US Election 2024 : अमेरिकेच्या निवडणुकांनंतर इराण इस्रायलवर हल्ला करणार; खामेनींनी आदेश दिल्याचे वृत्त
us action on 19 Indian companies
१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, युक्रेनविरोधी युद्धात रशियाला मदत आरोप
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”

खनिज तेल आणि त्याभोवतालचे राजकारण यांचा पाठपुरावा करायला लागल्यापासून एक सत्य लक्षात आले आहे- ते आहे जगाच्या विभागणीबाबत. समग्र जग फक्त दोन गटांत विभागले गेले आहे.

ऊर्जास्रोतांची मालकी वा त्यावर नियंत्रण असणारे आणि अशी मालकी वा नियंत्रण नसणारे हे ते दोन गट. बाकी ‘नाटो’ वगरे चच्रेसाठी ठीक. मूळ विभागणी या दोन गटांतलीच. आणि जो काही संघर्ष सुरू आहे तो या दोन गटांतलाच. या ऊर्जास्रोतांत वाटा द्यायचा किंवा नाही, द्यायचा असेल तर तो कशाच्या बदल्यात, आणि द्यायचा नसेल तर त्याच्या अटी-शर्ती काय, हे आणि असे मुद्देच या संघर्षांच्या मुळाशी असतात. मग हा संघर्ष कोणत्याही नावाने ओळखला जावो.

रशिया आणि युक्रेन युद्ध हेदेखील या संघर्षांचेच उपांग. सौदी अरेबियाखालोखाल प्रचंड तेल आणि नसíगक वायुसाठे असलेल्या रशियाला या इंधनविक्रीत वाटेकरी नको आहे. या इंधनविक्रीचा मार्ग जातो युक्रेनच्या भूमीतून. त्यामुळे या युक्रेनवरही रशियाला मालकी हवी आहे. त्यात युक्रेनचे प्रेम शेजारील रशियापेक्षा पलीकडच्या अमेरिकाधार्जण्यिा पाश्चात्त्य देशांशी अधिक. ही पुतिन यांच्या बाजूची युद्धकारणे! ती बरोबर उलटी केली की अमेरिका आणि ‘नाटो’ यांना पुतिन यांना का रोखायचे आहे, याचे उत्तर मिळते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातले जय-पराजय, ग्रेट ब्रिटनचा महासत्तापदाचा मुकुट अमेरिकेच्या डोक्यावर चढवला जाणे, किंवा अगदी इस्लामी दहशतवाद म्हटले जाते तो धर्माध हिंसाचार.. साऱ्यांच्या मुळाशी ऊर्जासाधनांची मालकी हा आणि हाच मुद्दा आहे.

हे सर्व नव्याने वर्तमानात समोर येत असताना पुन्हा या साऱ्याचा इतिहास इथे नव्याने मांडण्याचे प्रयोजन म्हणजे वैयक्तिक आयुष्यातला एक महत्त्वाचा योगायोग. खनिज तेल आणि त्याभोवतालच्या जागतिक घटना यावरील ‘तेल नावाचे वर्तमान’ हे चौथे पुस्तक प्रकाशित होत असताना तिकडे रशियात व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध लादले आणि त्याचा अन्वयार्थ उलगडून दाखवत असताना डॅनिएल एíगन यांचे याच विषयास वाहिलेले नवेकोरे पुस्तक हाती आले. ‘द न्यू मॅप : एनर्जी, क्लायमेट अँड द क्लॅश ऑफ नेशन्स’ हे या पुस्तकाचे नाव. माझ्या खनिज तेल आणि तद्नुषंगिक प्रेमात तपशिलांचे रंग भरणारी व्यक्ती म्हणजे एíगन. हे तपशिलांचे ठिपके कसे शोधायचे, ते जोडायचे कसे आणि त्यांचा अर्थ लावायचा कसा, हे कौशल्य शिकण्याची संधी मिळाली ती केवळ एíगन यांच्यामुळे.

संपूर्ण आयुष्यभर हा गृहस्थ ‘ऊर्जा’ या विषयाचा अभ्यास करतो आहे. पाश्चात्त्य विद्वत्जगात आयुष्यभर असे एकेका विषयात ध्यासमग्न राहूनही चरितार्थ उत्तम चालण्याची सोय आहे. त्यामुळे अनेकांचे प्रेयस हेच श्रेयस असते. म्हणून त्यांच्यावर दिवसभर बँकेत वा मंत्रालयात खर्डेघाशी करून संध्याकाळी अभिनयाची हौस पुरवत रंगभूमीची सेवा वगरे करण्याची वेळ येत नाही. जे आवडते ते शिकता येते आणि त्यातच चरितार्थही चालवता येतो. एíगन हे त्यांतील एक. गेली किमान २४ वष्रे मी त्यांच्या मागावर आहे. १९८३ साली मॅसेच्युसेट्स येथील जगविख्यात विद्यापीठात ‘केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स’ ही ऊर्जाभ्यासास वाहिलेली संस्था त्यांनी स्थापन केली. तिच्यातर्फे ऊर्जा विषयावर जगात ठिकठिकाणी परिसंवाद, अभ्याससत्रे आयोजित केली जात असतात. त्या, त्या देशांचे ऊर्जामंत्री, प्रसंगी पंतप्रधान, या क्षेत्रातल्या बडय़ा कंपन्यांचे प्रमुख असे सर्व तेथे हजेरी लावत असतात.

त्यामुळे दिल्लीत भरणाऱ्या अशा पहिल्या परिषदेत सहभागी होणार का, अशी विचारणा करणारा मेल जेव्हा एíगन यांच्या संस्थेकडून आला तेव्हा क्षणभर मेंदूचे चलनवलन बहुधा थांबले असावे. हे म्हणजे गणित शिकविणाऱ्यास साक्षात् डिऑन नॅश किंवा तत्त्वज्ञान अध्यापकास बटरड्र रसेल यांच्याकडून चच्रेचे निमंत्रण येण्यासारखे. अशावेळी नाही म्हणायचा प्रश्नच नसतो. पाच वर्षांपूर्वीची ही घटना. त्या परिषदेत डॉ. विजय केळकर आणि डॉ. किरीट पारीख यांच्यासमवेत एका चर्चासत्रात सहभागी होण्याचे हे निमंत्रण. या सर्वात आपण काय बोलणार वगरे पडणारे प्रश्न आ वासून समोर होते; तरी या परिषदेत संपूर्ण दोन दिवस एíगन हजर असणार आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे, ही शक्यता सर्व साशंकतेवर सहज मात करत होती.

त्या दोन दिवसांत एíगन यांच्याशी अपेक्षेप्रमाणे ऊर्जा क्षेत्रासंदर्भात बऱ्याच मुद्दय़ांवर बरेच काही समजून घेता आले. एक-दोनदा डॉ. केळकरही सहभागी होते. यातल्या अशा एका अनौपचारिक चच्रेत मी एíगन यांस काही तावातावाने सांगत असताना पाहून धर्मेद्र प्रधान (संबंधित खात्याचे तत्कालीन मंत्री) समोर आले आणि एíगन यांना म्हणाले, ‘‘हा आमचा एíगन! याचे एकदा काय ते समाधान करा!’’ लाजून चूर व्हावे असा हा क्षण. तो संपता संपत नाही असे वाटत असताना एíगन यांनी समोरचे त्यांचे पुस्तक ओढले आणि त्यावर ऊर्जा क्षेत्राच्या माहिती लालसेची तहान भागवण्याबाबत आपल्या किरटय़ा अक्षरांत चार ओळी लिहून, त्या अक्षरास साजेशी स्वाक्षरी करून ते पुस्तक माझ्या हाती दिले.

त्या एíगन यांचे हे नवे पुस्तक. त्यांच्या त्यातील भाष्याचा प्रत्यय पुतिन यांच्या सौजन्याने लगेच मिळतो. या तेलप्रवासातील महत्त्वाच्या घटनांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या वाचकांस नक्कीच असेल. उदाहरणार्थ, एíगन यात फ्रॅकिंग तंत्रज्ञानाने तेल उत्खनन करीत असताना आपल्या गवारीच्या शेंगेतील द्रवाचा कसा उपयोग होतो हे लिहितात. या ‘गवारगम’वर ‘लोकसत्ता’त याआधीच सविस्तर वृत्तलेख प्रकाशित झालेला आहे. एíगन यांचे लोभस वैशिष्टय़ म्हणजे ते ऊर्जापंडिताच्या भूमिकेतून लिहीत नाहीत आणि तसे ते बोलतही नाहीत. ते गोष्ट सांगतात.. किस्से सांगतात आणि त्यातून एका अत्यंत महत्त्वाच्या, ज्वालाग्राही विषयाचा भव्य पट उलगडत जातो.

साधारण दोन वर्षांपूर्वी- २०१८ साली अमेरिका तेलाबाबत स्वयंपूर्ण बनली. जो देश दैनंदिन तेल उत्पादनातील २६ टक्के वाटा एकटय़ा आपल्या देशात ओढून घेत होता, त्या देशाला बाहेरच्या देशांतून तेल आयात करण्याची गरजच त्यानंतर वाटेनाशी झाली. हे शक्य झाले ते फ्रॅकिंग या प्रचंड भांडवलशोषी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे. या तंत्रात समांतर विहिरी कशा खणल्या जातात वगरे तपशीलही ‘लोकसत्ता’ वाचकांस सहज स्मरेल. तसेच तेलाचे चढे दर आणि हे फ्रॅकिंग तंत्र यांचा संबंध कसा आहे हेदेखील लक्षात येईल. त्यावर पुरेसे भाष्य ‘लोकसत्ता’च्या स्तंभांतून झालेले आहे. पण या तंत्राच्या विकासामुळे जगाचा ‘नवा नकाशा’ तयार करण्यात अमेरिकेचा वाटा कसा आहे, अन्य समर्थ देश यास कसे हातभार लावत आहेत यावर एíगन या पुस्तकात लिहितात.

एíगन यांच्यासारख्या लेखकांचे मोठेपण त्यांच्या मांडणीतील सहजतेत असते. त्याची दोन उदाहरणे : तेलविहिरींच्या उत्खननामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर दुष्परिणाम होत असल्याची तक्रार अमेरिकेत काही पर्यावरणवाद्यांनी केली. त्यापुष्टय़र्थ त्यांनी दाखला दिला २८ स्थलांतरित पक्षी मृत पावल्याचा. त्याची चर्चा करता करता एíगन सहज आकडेवारी देतात ती अमेरिकेतील पाळीव मांजरींकडून मारल्या जाणाऱ्या पक्ष्यांची. एकटय़ा अमेरिकेत या लाडावलेल्या मनीमाऊंमुळे वर्षांला लहान-मोठे कोटय़वधी  पक्षी मारले जातात. हे वाचल्यानंतर आपला  आ वासलेला जबडा मिटता मिटत नाही. दुसरे उदाहरण टेक्सास प्रांताचे. १९२६ साली त्या प्रांतातल्या काही खोऱ्यांत तेल आढळल्यावर अमेरिकेतून विविध भागांतून उत्साही तरुण व्यवसायार्थ आदी उद्देशाने तेथे येऊ लागले. त्यातील एका तरुणाचा हा किस्सा. हा तरुण नौदलात होता. येल विद्यापीठाचा उच्चशिक्षित होता. नुकतेच लग्न झालेले. तरुण पत्नी आणि लहानगे बाळ. पण तरी सर्व काही सोडून तो या प्रांतात आला. ‘मला अपेक्षित यश मिळाले तर सारे जग माझ्या पायाशी असेल; आणि अपयशी ठरलो तर सर्व मला पायदळी देतील..’ हे त्याचे विधान. त्या तरुणाचे नाव जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश! पत्नी बार्बरा आणि चिरंजीव जॉर्ज बुश. या कुटुंबाने पुढे तेल क्षेत्रात आणि त्यातील सामर्थ्यांवर जागतिक राजकारणातही काय धुडगूस घातला हे सारे जाणतात. त्याचा प्रारंभ हा असा होता.

अलीकडे भारताची तुलना चीनशी करण्याचा छंद बऱ्याच जणांस जडल्याचे आढळते. यातील बरेचसे पंडित हे सरकारी बुगुबुगुवर माना डोलवणारे नंदीबल असतात हे सांगण्याची गरज नसावी. अशांनी हे पुस्तक वाचणे अगत्याचे. अशांच्या अवलोकनार्थ काही मुद्दे : संपूर्ण विसाव्या शतकात अमेरिकेने जितके सिमेंट काँक्रिट वापरले, त्यापेक्षा अधिक सिमेंट काँक्रिट चीनने २०११ ते २०१३ या फक्त दोन वर्षांत वापरले. (‘साम्यवाद्यांस काँक्रिटचे फार प्रेम..’ – इति एíगन) चीन हा वर्षांला आठ इतक्या प्रचंड गतीने विमानतळ बांधत असून, सध्या तो जगात क्रमांक एकचा ऊर्जा-ग्राहक आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हा की, त्या ऊर्जेतील साठ टक्के ऊर्जा ही कोळसा वा खनिज तेलाच्या ज्वलनातून येते. म्हणजे कसले पर्यावरणरक्षण आणि कसले काय! या पार्श्वभूमीवर आपल्या ‘नेट झीरो’ उत्सर्जनाच्या घोषणा तटस्थांनी आठवून पाहाव्यात.

अमेरिका, रशिया, चीन आणि सौदी अरेबिया यांच्या तेलांगाचा सर्वागीण आढावा अशा पद्धतीने हे पुस्तक घेते. हा सर्व विषयच इतका रम्य आहे की त्याबाबत शब्दांची मर्यादा घालणे अवघड. त्याची गरजही वाटत नाही. जगातील गेल्या जवळपास दीडशे वर्षांतल्या घटनांमागे हे खनिज तेल आहे, हे २००६ साली प्रकाशित पहिल्या पुस्तकापासून माझ्यासारखा परात्पर लेखकदेखील सांगत आला आहे. तेव्हा या विषयास वाहून घेतलेले एíगन यांच्यासारखे अभ्यासक हे नमूद करत असतील तर ते या मांडणीला पुष्टी देणारे ठरते.

पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्य लयास गेले. त्यातून कुवेत, जॉर्डन आदी देश तयार झाले. त्यानंतरच्या ‘लाल रेषा करारा’ने (रेड लाईन अ‍ॅग्रीमेंट) या देशांची महासत्तांत वाटणी झाली. १९३० च्या दशकात सौदी वाळूत तेल आढळल्यानंतर या वाटणीस वेगळेच परिमाण आणि गती आली. हा सारा ‘तेल नावाचा इतिहास’! त्यातून जगाचा नकाशा पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणावर बदलला. आता चीन भारत आणि दक्षिणी सुमुद्रात घुसखोरी करू पाहतो, आणि तशाच मानसिकतेने चालवला जात असलेला रशिया हा आधी क्रीमिया आणि आता युक्रेन यांचा घास घेऊ पाहतो. यामागे जे आहे ते ‘तेल नावाचे वर्तमान’!

ते समजून घेताना डॅनियल एíगनसारखे लेखक भविष्याचा जो वेध घेऊ पाहतात तो मनोज्ञ, महत्त्वाचा आणि म्हणूनच दखलपात्र ठरतो.

या बदलत्या नकाशात आपल्यालाही स्थान असते तर ते आनंददायी ठरले असते.

‘द न्यू मॅप : एनर्जी, क्लायमेट अँड द क्लॅश ऑफ नेशन्स’- डॅनिएल एíगन, प्रकाशक : अ‍ॅलन लेन : पेंग्विन रँडम हाऊस, पृष्ठे : ४९२, किंमत : १४९९ रुपये.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber