‘सो गुड दे कान्ट इग्नोर यू’ हे कॅल न्यूपोर्ट यांचं पुस्तक अलीकडेच मराठीत प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद संयोगिता ढमढेरे यांनी केला आहे. दुर्मीळ आणि मूल्यप्रधान कौशल्येच तुम्हाला महान बनवतात, या आशयाला धरून असलेलं हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडील कौशल्यांना अथक परिश्रमाची जोड दिली तर अधिकाधिक संधींची दारे खुली होतात आणि त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो.

या पुस्तकात लेखकाने यशाचे काही मंत्र सांगितले आहेत. जसे की- ध्यासाचा पाठपुरावा सोडून द्या, कोणीही नाकारणार नाही इतके निपुण व्हा, बढती नाकारा, विचार कमी, कृती मोठी..

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करताना आपण आपल्यातील नैपुण्याला काहीच महत्त्व देत नाही असं निरीक्षण लेखकानं नोंदवलं आहे. हे पटवून देताना त्यानं अनेक उदाहरणं दिली आहेत. अवघड कामात तरबेज होण्यासाठी सराव महत्त्वाचा ठरतो. आयुष्यात सरावाला खूप महत्त्व असल्याचं लेखक नमूद करतो. तसंच आपण जे काम करतो त्यावर कसं नियंत्रण ठेवायचं हे सांगताना आपल्याला आवडेल ते काम करणं महत्त्वाचं असं लेखक  आवर्जून सांगतो.

लेखक यशस्वितेच्या अनेक पारंपरिक गृहीतकांना बाजूला सारून आधुनिक गोष्टींचा विचार करून स्वत:ची नवीन गृहीतकं मांडतो आणि खात्रीपूर्वक यशस्वी कारकीर्द घडविणारे अनेक पर्याय वाचकासमोर ठेवतो. काही तरी अर्थपूर्ण निर्मिती करून ती जागाला अर्पण करा हाच मंत्र लेखक या पुस्तकाद्वारे देतो.

‘सो गुड दे कान्ट इग्नोर यू’, – कॅल न्यूपोर्ट, अनुवाद- संयोगिता ढमढेरे, मनोविकास प्रकाशन, पाने -१८८, किंमत- २५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review so good they cant ignore you cal newport translate by sanyogita dhamdhere zws
Show comments