‘बोलिले जे..’ हे अतुल देऊळगावकरांनी माझ्या घेतलेल्या मुलाखतीचे पुस्तक मनोविकास प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. त्यात मी तपशिलाची एक मोठी चूक केलेली आहे. त्यात माझ्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचे फ्रेंच भाषांतर आनेट लिडे यांनी केले असून माधुरी पुरंदरेंनी त्यांना भाषांतरात मदत केली असे मी म्हटले आहे. हा माझ्या स्पूनरिझमने केलेला गोंधळ आहे. भाषांतर माधुरी पुरंदरे यांनी केले आहे व त्यांना मदत आनेटने केली असे ते पाहिजे. मुळात या भाषांतराची सुरुवात प्रख्यात फ्रेंच- संस्कृत पंडित गेर्दी गेर्सहायमर यांनी माधुरी पुरंदरेंच्या मदतीने केलेली होती. त्यांचेच काम पुरंदरेंनी पूर्ण केले. ही सुधारणा दुसऱ्या आवृत्तीत केली जाईलच, पण आतापर्यंत ज्या वाचकांनी पुस्तक घेतले किंवा घेणार आहेत, त्यांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे पत्र. झाल्या चुकीला मीच पूर्णत: जबाबदार असून त्यात प्रकाशन किंवा अतुल देऊळगावकर यांच्याकडून काहीही चूक झालेली नाही. यामुळे संबंधितांना मन:स्ताप होऊ शकतो. त्यांची मी क्षमा मागतो. दुसरी मोठी चूक म्हणजे प्रख्यात हार्मोनियम- वादक यांचे नाव ‘सुयोग’ असे हवे, ते मी चुकून ‘अभय’ असे लिहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा