मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुन्हा करून कधीच कोणाचं भलं होत नसतं, किंवा ‘Crime does not pay’ या नीतीवचनाशी आपण सर्व परिचित आहोत. पण हे वचन जर सर्वस्वी खरं असेल तर सगळ्याच गुन्हेगारांना शासन व्हायला हवं. पण आपण पाहत असलेल्या जगात असं होताना दिसतं का? ‘नेहमीच नाही’ हे कटु सत्य आहे.

‘वॉल स्ट्रीट’ नावाची १९८७ सालची हॉलीवूडची फिल्म तुमच्यापैकी अनेकांनी बघितली असेल. त्यातलं मायकेल डग्लस या अभिनेत्यानं खूप ताकदीनं रंगवलेलं गार्डन गेक्को हे पात्र अनेकांच्या लक्षात राहील असं आहे. गेक्को हा वॉल स्ट्रीटवरचा कुठलीही नैतिक भीडभाड न ठेवणारा एक स्टॉक ब्रोकर असतो. लोभ असणं ही चांगली गोष्ट आहे.. म्हणजेच ‘Greed is Good’ हे त्याच्या जीवनाचं ब्रीदवाक्य असतं. तो अनेक अफरातफरीचे गुन्हे करतो आणि शेवटी त्याला तुरुंगात जावं लागतं.. ही गोष्ट झाली सिनेमातली. आता एका खऱ्या जगातल्या गोष्टीबद्दल : असाच आयव्हान बोएस्की नावाचा एम. बी. ए. झालेला एक अमेरिकन स्टॉक ब्रोकर होता. त्याने १९८६ मध्ये बर्कले बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना- ‘‘तुम्ही लोभी असलात तरी तुम्हाला स्वत:बद्दल अभिमान बाळगायला काही हरकत नाही..’’ अशा प्रकारची शिकवण दिली होती. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत त्याला दहा करोड डॉलरचा दंड ठोठावला गेला आणि इन्सायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्यसाठी त्याची तुरुंगात रवानगी झाली. (मॅकिनसी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या भारतीय वंशाच्या रजत गुप्तांची अशाच तऱ्हेची हकीगत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.)

पण व्यावसायिक क्षेत्रातील काही उदाहरणांवरून असं दिसून येतं की, गुन्हा नुसता पैसा मिळवून देत नाही, तर अगदी ‘छप्पर फाडके’ मिळवून देतो. हा लेख अशाच एक केसबद्दल असून याचा नायक आहे मार्क रिच (१९३४- २०१३). मार्क रिच हा व्यापारजगतात ‘कमोडिटीचा बादशहा’ म्हणून ओळखला जायचा. पण वायदे बाजारात पैसा कमावलेल्या या अब्जाधीशाला फरार व्हावं  लागलं होतं. अमेरिकेतील चौसष्ठ गंभीर गुन्ह्यंच्या प्रकरणांत तो आरोपी होता आणि त्यांत फसवणूक, धाकदपटशाही करून पैसे मिळवणे, करचुकवेगिरी, देशाच्या शत्रूबरोबर व्यापार करणे असे अनेक गंभीर आरोप होते. पण याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे नीतीनियम गुंडाळून बिल क्लिंटन यांनी त्याला आपली व्हाइट हाऊसमधील मुदत संपायच्या अगोदर २००१ साली ‘अध्यक्षीय माफी’ (Presidential Pardon) मंजूर केली होती.

मार्क रिच जन्माने बेल्जियन असून एका ज्यू निर्वासित कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. न्यूयॉर्क विद्यापीठात तो शिकत होता, पण पदवी न घेताच त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. १९५४ साली फिलिप बद्र्स (फिलब्रो) या स्टॅम्फर्ड कनेक्टिकट इथे असलेल्या जगातील एका सर्वात मोठय़ा कमोडिटी व्यापार कंपनीत त्याने आपली कारकीर्द सुरू केली. तिथे त्याने १६ र्वष काम केलं आणि पिंकस ग्रीन या आपल्या सहकाऱ्याच्या साथीने त्याने फिलब्रोला खनिज तेल, धान्य आणि धातू यांच्या वायदे बाजारातील सर्वात मोठी कंपनी बनवलं. पिंकस ग्रीन पुढे रिचचा व्यावसायिक भागीदार झाला. या दोघांनी १९७० साली फिलब्रोतून राजीनामे दिले आणि ‘मार्क रिच + कंपनी’ या कमोडिटी ट्रेडिंग कंपनीची झुग- स्वित्र्झलड इथे स्थापना केली.

आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रचलित असलेल्या किमतीवरची नियंत्रणं, तेलावरील प्रतिबंध अशा सर्वमान्य गोष्टी झुगारून देत रिचने अमाप संपत्ती कमावली. १९७९-१९८१ या कालावधीत तेलसंकट (Oil crisis) आलं होतं. त्या काळात शत्रूबरोबर व्यापार करण्यास बंदी होती. तरीही त्याने या काळात इराणकडून लाखो बॅरल क्रूड खरेदी केलं होतं. याच काळात त्याने सोव्हिएत, इराक आणि इराण या देशांतील क्रूड वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेला आणि बंदी असलेल्या अनेक देशांना विकलं. चिलीचा ऑगस्टो पिनोशे, इराकचा सद्दाम हुसेन, क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो आणि अशा काही हुकूमशहांबरोबर रिचचे वैयक्तिक संबंध होते.

रिच नेहमीच म्हणत असे की, ‘‘मी बेकायदेशीर असं काहीच केलेलं नाहीये. मी लोकांना फक्त सेवा देतो. काही लोकांना मला तेल विकायचं असतं आणि काही लोकांना ते माझ्याकडून विकत घ्यायचं असतं. मी व्यावसायिक आहे.. राजकारणी नाही.’’ रिच आणि त्याच्या कंपनीवर असलेल्या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यंचे आरोप टाळण्यासाठी १९८३ साली त्याने अमेरिकेतून पलायन केलं आणि शेवटी तो स्वित्र्झलडमध्ये स्थायिक झाला.

आज रिच पुढील दोन गोष्टींचा जनक म्हणून ओळखला जातो. (१) म्हणजे ‘स्पॉट ऑइल मार्केट’ आणि (२) ‘कमोडिटी स्वॅप’- म्हणजे उदाहरणार्थ : युरेनियम देऊन क्रूड घेणे. १९८० साली त्याने अशा प्रकारचे व्यवहार दक्षिण आफ्रिका, इराण आणि सोव्हिएत युनियन यांच्याशी केले होते.

बिल क्लिंटन यांच्यावर मोनिका लेविन्स्की सेक्स स्कॅन्डल प्रकरणात महाभियोग चालवला गेला होता आणि अमेरिकी सिनेटने त्यांची त्यातून मुक्तता केली होती, हे तुम्हाला आठवत असेल. अशा या माणसाने मार्क रिचसारख्या गुन्हेगाराला ‘अध्यक्षीय माफी’ द्यावी, हे किती औपरोधिक आणि निंदनीय होतं. ते असो. पण आपली अध्यक्षीय कारकीर्द संपल्यानंतर क्लिंटन यांनी आपल्या या ‘दिलदारपणा’बद्दल ‘‘ते एक भयंकर वाईट राजकारण होतं!’’ असं म्हणून खेद व्यक्त केला होता. हे म्हणजे या शतकातलं ‘अंडरस्टेटमेंट’ असावं. नंतर असं उघडकीला आलं की या ‘दिलदार’ कृत्यामागे स्पेनचा राजा, मोसाद (इस्रायलची गुप्तचर संघटना), मार्क रिचची भूतपूर्व (पहिली) पत्नी डेनिस अशा विभिन्न, वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होता. (डेनिसने क्लिंटन यांच्या वाचनालयाला आणि वस्तुसंग्रहालयाला पाच लाख डॉलरची आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या निवडणूक निधीला दहा लाख डॉलरची देणगी दिली होती.)

आणि मला असं वाटतं की आता मी या हकीकतीला जे एक सुरेख वळण देणार आहे ते वाचकांना नक्कीच आवडेल. ज्या माणसाने मला प्रथम मार्क रिच या चित्तवेधक व्यक्तीबद्दल माहिती करून दिली त्या हॅरी नाईक या माझ्या मराठी मित्राबद्दल..

हॅरी नाईक हे मार्क रिचचे खूप मोठे फॅन असून त्याला ते बऱ्याच वेळा भेटलेही होते. मी माझ्या या मित्राला १९७० साली कोलकात्यात प्रथम आमच्या एका समान मित्राच्या घरी भेटलो. तेव्हा सगळे जण त्यांना ‘हॅरी नाईक’ म्हणूनच ओळखायचे. आमची बऱ्यापैकी मैत्री झाल्यानंतर मला जी हॅरींबद्दल माहिती मिळाली ती अशी : ‘हॅरी एक अस्सल मराठी माणूस असून, त्यांचं पूर्ण नाव हरिश्चंद्र मोरेश्वर नाईक होतं. ते मूळचे महाडचे. (आमची मैत्री झाल्यानंतरदेखील मी त्यांना ‘नाईकसाहेब’ म्हणत असे.) नाईकसाहेब हे एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय अमेरिकन ट्रेडिंग कंपनीचे मुंबईस्थित भारतीय प्रतिनिधी होते.

साधारण पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या, आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या नाईकसाहेबांचा पेहराव नेहमीच आधुनिक असे. ते पाइप ओढत असत. कम्पारी हे त्यांचं आवडतं ड्रिंक. ज्याला हिंदीभाषक ‘फर्राटेदार’ म्हणतील असं इंग्लिश ते बोलत असत. त्यांच्या इंग्लिश अ‍ॅक्सेंटचं वर्णन जर करायचं झालं तर ती क्लिंट ईस्टवूड आणि अजित वाडेकर यांच्या कुठेतरी मधली होती. (त्यांच्या पाठीमागे त्यांचे मारवाडी आणि गुजराती प्रतिस्पर्धी त्यांचा उल्लेख ‘डर्टी हॅरी’ असा करत.) कोलकात्यात त्यांचा मुक्काम नेहमी ग्रँड हॉटेलात असायचा.

परत मार्क रिचकडे वळू या. सुरुवातीस रिच ज्या फिलब्रो या अमेरिकन कंपनीत काम करत होता, त्या कंपनीचं मुख्य ऑफिस स्टॅम्फर्ड कनेक्टिकटमध्ये होतं. आणि योगायोगानं नाईकसाहेबांच्या कंपनीचं ऑफिस रिचच्या ऑफिसला लागूनच होतं. त्या काळात त्यांच्या वर्षांतून पाच-सहा तरी अमेरिकन वाऱ्या होत असत. आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं म्हणजे- ‘‘Rich and me used to often bump into and say Hi to each other. A few times we also used to trade business gossip.’’ मार्क रिच हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते नाईकसाहेबांकडून. जेव्हा जेव्हा कोलकात्यात किंवा मुंबईत आम्ही भेटायचो तेव्हा मार्क रिच आणि त्याचे आंतरराष्ट्रीय व्यापारी जगातील पराक्रम हा नाईकसाहेबांचा जिव्हाळ्याचा विषय असायचा. नाईकसाहेब १९९९ मध्ये निवर्तले. त्यामुळे त्यांच्या हीरोच्या नंतरच्या कारकीर्दीबद्दल त्यांनी कशा प्रकारचं भाष्य केलं असतं हे सांगणं कठीण आहे.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला नाईकसाहेबांनी मला त्यांच्या कारमायकल रोडवरील तीन बेडरूम्सच्या आलिशान घरी सत्यनारायणाच्या पूजेला आणि स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलं होतं. हा प्रसंग दोन कारणांमुळे माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे. एक म्हणजे आमच्या यजमानांनी सोवळं नेसून केलेली सत्यनारायणाची पूजा.. ती करताना त्यांचं सतत प्रेमाने आणि अभिमानाने आपलं जानवं कुरवाळणं. (त्यानंतर झालेली अत्यंत गोंगाटी, असांगीतिक आरती मी कधीही विसरणार नाही.) नेहमी थ्री-पीस सुट-बुटात वावरणाऱ्या नाईकसाहेबांना मी त्या दिवशी प्रथमच आणि शेवटचं सोवळं नेसलेलं बघितलं. आणि दुसरं म्हणजे- माझ्या दीर्घ आयुष्यात ही अशी एकमेव सत्यनारायणाची पूजा मी अनुभवली- की जिची सांगता ‘थ्री मार्टिनी लंच’ने झाली. (मला जी मार्टिनी दिली होती ती बॉम्बे सफायर जिन आणि रॉसी एक्स्ट्रा ड्राय व्हर्मूथपासून बनवली होती असं मला नाईकसाहेबांनी आवर्जून सांगितलं.) का कुणास ठाऊक, पण लहानपणी अत्यंत सनातनी कुटुंबात वाढत असताना मी एक श्लोक अनेकदा ऐकला होता आणि त्या उत्कृष्ट पेयाचे घुटके घेत असताना मला तो सतत आठवत होता. तो श्लोक असा :

‘हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या

हरी वाढितो ब्राह्मणां वेळ वेळा

असे ब्राह्मण जेवूनी तृप्त झाले

विडा दक्षिणा देऊनि बोळविले’

माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा ‘हरीच्या शेवया तूप-पोळ्या’पासून ‘हॅरीच्या थ्री मार्टिन’पर्यंतचा प्रवास  जवळजवळ दोन तपांचा होता. तर ते असो.

..मार्क रिच मरणसमयी अत्यंत भग्नावस्थेत होता. मरणाच्या अगोदर काही महिने त्याने एका मुलाखतकाराला सांगितलं होतं, ‘‘ज्या गोष्टी माझ्यासाठी मूल्यवान होत्या, त्यामध्ये मी सपशेल पराभूत झालो.’’ का कुणास ठाऊक, आपल्यापैकी बऱ्याच जणांचे अखेरचे शब्ददेखील काहीसे रिचसारखेच असू शकतील. त्यात फक्त एकच महत्त्वाचा फरक असेल. आपण आपल्या आयुष्याच्या शेवटी काही फार पैसा ठेवून जाणार नाही. पण मार्क रिच मात्र आपल्या मागे तीन बिलियन डॉलरचं डबोलं ठेवून गेला. त्यात सेंट मॉरित्झ (स्वित्र्झलड) येथील आलिशान घर, ९.५ मिलियन डॉलरचा स्विमिंग पूल, पिकासो आणि बरोक आर्टची दुर्मीळ चित्रं यांचा समावेश होता.

जाता जाता एक विचार..

या लेखाचा ड्राफ्ट वाचल्यानंतर माझा जुना मित्र सोपानची प्रतिक्रिया अतिशय गांभीर्यपूर्ण होती. तो म्हणाला, ‘‘एक वेळ सुईच्या नेढय़ातून उंट आत जाऊ शकेल, पण एखाद्या अतिश्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणं कठीण आहे.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘कदाचित हे बोधवचन लिहिताना तुझ्या या लेखाचा नायक मार्क रिच हा बायबल लेखकाच्या डोळ्यासमोर असेल.’’

शब्दांकन : आनंद थत्ते