मीना गुर्जर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोनिका गजेंद्रगडकर यांचे ‘भूप’, ‘आर्त’, ‘शिल्प’ असे कथासंग्रह आणि ‘त्रिपर्ण’ हा दीर्घ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. चिरंतन मूल्यांचा शोध घेणाऱ्या कथा आणि माणसाच्या मनाचा तळ निरखणारी, धर्माचा मानवता म्हणून अर्थ लावणारी ‘उगम’ ही कादंबरी लिहून त्यांनी महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे.
अलीकडेच त्यांचा ‘शब्दांचा झुला’ हा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘‘ही छोटय़ा अवकाशातली शब्दचित्रं आहेत. माझ्या मनाचे जसे हिंदूोळे. यांना अनुभवाची, चिंतनाची क्षणचित्रंही म्हणता येतील.’’ या लेखांना एकाच गटवारीत बसवता येणार नाही. जसा अनुभव आला तसतशा त्या व्यक्त झाल्या आहेत. मग तो अनुभव निसर्गाचा असेल, परदेशातील सामाजिक – सांस्कृतिक जीवनाचा असेल. कधी कलेबद्दल तर कधी कलावंतांबद्दलचा असेल. या लेखांमधून कधी नात्यांची निरीक्षणं येतात, तर कधी श्रद्धा, अध्यात्म, संस्कृती याबद्दल गंभीर चिंतन येते. या सर्व गोष्टींबरोबरच अगदी वैयक्तिक अनुभव – घटना येतात आणि त्यावरचे भाष्यही येते. एक छोटासा प्रसंगही काही तरी सांगू पाहतो आणि तो त्यांनी चिमटीत पकडला आहे आणि त्यातून एक समृद्ध अर्थ सामोरा आणला आहे.

एका लेखात ‘वसंतराव देशपांडे’ यांचे गायक म्हणून, व्यक्ती म्हणून सुंदर चित्रण केले आहे. त्या वेळची ‘पुण्याची आपलेपणा असलेली वाडा संस्कृती’, कलावंताचे अघळपघळ वागणे, वडील-मुलीच्या नात्याची भावपूर्ण वीण आहे. त्याचबरोबर त्यांनी गायलेल्या गाण्याचे रसग्रहणही आहे.
असेच व्यक्तिचित्रण आईचे आणि आजीचेही येते. आजीच्या बोलण्यातला फटकळपणा, पण समोरच्याला त्यातूनही जाणवणारी अपार माया! ‘‘माणसांना बांधत जाणं ही तिची जीवनधारणा आणि हेच तिचे अध्यात्म!’’ असं एका वाक्यात आजीचं सगळं आयुष्य त्या उभं करतात.

तर कधी मोलाने काम करणाऱ्या बायकांनी आपल्या कठीण काळात बोलून वा कृतीतून दिलेला आधार, त्यांच्याशी जुळलेलं वेदनेचं नातं यांचे त्या कृतज्ञतापूर्वक स्मरण करतात. कधी व्हिएतनामचं निसर्गवर्णन येतं, तर कधी पॅगोडा – चर्च बघून ‘डॅफोडिल्स’, ‘औदुंबर’ वा नलेर पाटलांची कविता त्यांना आठवते. तर कधी शेक्सपियरचं वाक्य मनात उमटतं, तर कधी आत्म्याला स्पर्श करणाऱ्या शांततेमुळे त्यांना गीताश्लोक आठवतो.कलांबद्दलची त्यांची ओढ आणि कलावंताची नजर आणि समजही दिसून येते. चंगळवादी झगमगाटात दिसणारा, लखलखत्या नजरा खेचून घेणाऱ्या हिऱ्यांचा डौलदार राजहंस आणि तिथेच या वातावरणाशी संबंधच नसल्यासारखा आत्मनंदात मग्न होऊन मनस्वीपणे वाजणारा पियानोवादक पाहून त्यांना तो मूर्त-अमूर्त कलांचा संगम वाटतो.

‘प्युरटो रिको’ इथले मुलाला पाजणाऱ्या आईचे शिल्प जरा ओबडधोबडच, काळय़ा ग्रॅनाइटमधले, पण नजर खिळवून ठेवणारे. त्यावरून त्यांना मायकेल अँजेलोच्या ‘पिएटा’ शिल्पाची आठवण येते. पिएटाचं अत्यंत सुंदर वर्णन त्या करतात- वैश्विक मातृत्वाची कलाकृती. एकात आपण आपल्या मुलाची वेदना घेऊ शकत नसल्याचं कारुण्य आहे, तर दुसरीमध्ये वात्सल्याची संपृक्त तृप्ती.

पॉल हा ड्रायव्हर, पण आपली प्रेयसी सारामध्ये तो आई पाहतो, तर सारा पॉलमध्ये एक मूल शोधते. कुठल्याही चौकटीतल्या नात्यांचं बंधन नाही. अपार विश्वास आणि एकमेकांकडे सहजगत्या माणूस म्हणून पाहणं, असं एक अनोखं मैत्र दोघांत. लग्न केलं तर कदाचित मी ‘नवरा’ बनेन. आमचं आत्ताचं निखळ, निरोगी नातं राहणार नाही म्हणून ते लग्न करत नाहीत. त्याच वेळी सुरेश मात्र आपल्याला झालेल्या एच.आय.व्ही.ची देणगी आपल्या पत्नीला देतो आणि ‘‘मी या रोगाने मरणार असेन तर तीही मरेल. माझी बायकोच आहे. माझ्याबरोबर मरणं हे तिचं भाग्य आहे,’’असं म्हणतो. विशेष म्हणजे सुरेशच्या पत्नीलाही ‘‘हे माझे भोग आहेत. त्याच्याबरोबर मरणं हे देवानेच लिहिलंय.’’ असं वाटतं. खरं तर पॉल आणि सुरेशमधले बरेच मुद्दे समान आहेत. ड्रायव्हर हा पेशा, शिक्षण कमी, सारखंच वय, पण विचार करण्याच्या पद्धतीत मोठा फरक आणि यावरून त्या संस्कृती, तिची खोलवर गेलेली पाळंमुळं, सामाजिक- कौटुंबिक जडणघडण, वेगळे पर्यावरण, पुरुषी मानसिकता इ.वर आपले विचार मांडतात.

गाडीतली फेरीवाली अशिक्षित बाई, आत्मविश्वासाने ठाम उभी राहून वेळप्रसंगी जगासमोर तलवार उपसून संसार पेलणारी, दारुडय़ा नाकर्त्यां नवऱ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मुलींना शिक्षण द्यायचेच म्हणून निर्धार केलेली. तर दुसरी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय, पण आई- वडील, समाज काय म्हणेल या संस्कारांच्या ओझ्याखाली दबलेली- दडपलेली, बाहेर पडून एकटीने आयुष्य पेलण्याची धमक नसलेली, नवऱ्याचा मार खात जीवन नरक बनवून घेतलेली आणि आपल्या नाकर्तेपणाचं दुबळं समर्थन करणारी अशी परस्परविरोधी उदाहरणे त्या समोर मांडतात.

रानटी प्रवृत्तीच्या नवऱ्याला सोडून नवीन सुखी जीवन शोधलं तर समाजाबरोबरच आई-वडीलही बदनामीचं शस्त्र उगारतात. त्यातून त्या करकचून बांधलं जाणं म्हणजे लग्न- संस्कार का? असा प्रश्न उपस्थित करतात. पुढल्या पिढीला आदली पिढी सतत दोष देत असताना त्या मुलांचीही भूमिका मांडतात. कधी आयांचे ‘पॅटर्न्स’ दाखवून देतात. कधी आई म्हणून, पालक म्हणून, तर कधी श्रद्धा, नातीगोती, तर कधी स्त्री म्हणून त्यांना पडलेले प्रश्न त्या आपल्यासमोर ठेवतात.

आपली जडणघडण शेवटी कशावर अवलंबून असते? सांस्कृतिक पर्यावरणावर, कौटुंबिक संस्कारांवर की आपल्या आत खोलवर नि तटस्थपणे आपल्याला किती अन् कसं डोकावून पाहता येतं नि स्वत:चं आत्मपरीक्षण करता येतं? यावर वरवर पाहता हे प्रश्न वाटले तरी यातच त्यांना सापडलेलं उत्तर आहे. यातूनच त्या एक छान विचार देतात. ‘‘स्त्री विरुद्ध पुरुष असा लढा नसून निखळ माणूस म्हणून जगण्याचे आणि इतरांना जगवण्याचे सर्वव्यापी भान हवे आहे. त्यासाठी आपणच आपल्याभोवती उभारलेले स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचे भक्कम तुरुंग उद्ध्वस्त करायला हवेत.’’ या सर्व लेखांतून दिसतं ते मोनिका गजेंद्रगडकर यांचं लोभस व्यक्तिमत्त्व! त्यांचं सतारीचं शिक्षण, संगीत आणि इतर कलांवरही असणारं प्रेम, त्याबद्दलची सौंदर्यदृष्टी, देशपरदेशातून केलेली भटकंती, त्यातून मिळालेलं संचित, वैश्विक पातळीवर स्त्रीचं स्थान तपासून पाहण्याचा त्यांचा भगिनीभाव, स्वत:च्या मनाचा तळ शोधून पाहण्याचं धाडस, प्रश्नांची उकल करताना मिळालेली उत्तरं आणि त्या उत्तरांना आणखीही एक पैलू आहे हे लक्षात आल्यावर ते मान्य करण्याचा प्रांजलपणा त्यांच्याकडे आहे.

वेगवेगळय़ा ठिकाणी असणारे त्यांचे श्रृतयोजन लक्षणीय आहे. कधी इंदिरा संत, कधी दुर्गाबाई, तर कधी गुरुनाथ धुरी, गुलजार, खलील जिब्रान, सआदत मंटो, रवींद्रनाथ, सॉक्रेटिस, शेक्सपियर, मदर तेरेसा, जे. कृष्णमूर्ती, ज्ञानेश्वरी असे अनेकानेक संदर्भ आणि त्या उद्धृतांचे नेमके, समर्पक उपयोजन यामुळे त्यांच्या वाचनाची समृद्धी कळते आणि लेखांना श्रीमंती लाभते! शीर्षकाला साजेसं देखणं मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचे आहे.
‘शब्दांचा झुला’

मोनिका गजेंद्रगडकर, ग्रंथाली प्रकाशन,
पाने- १५९, किंमत – २०० रुपये.