मनोहर पारनेरकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
samdhun12@gmail.com
बहुतेक भारतीयांना मोझार्टची जी थोडीफार ओळख आहे ती हॉलीवूडच्या १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अॅंमेडीयस’ या चित्रपटामुळे. एका महान जर्मन जिनिअस रचनाकाराच्या अद्भुत जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट् तर झालाच; शिवाय त्याने एक नाही, दोन नाही, तर एकूण आठ ऑस्कर पुरस्कार पटकावले. मिलॉस फॉरमनने दिग्दर्शित केलेल्या या सुंदर कलाकृतीत आपल्याला मोझार्टच्या अफलातून जीवनप्रवासाचं दर्शन घडतं. अगदी एक अलौकिक प्रतिभाशाली बालबृहस्पतीपासून ते विशीत प्रवेश करण्यापूर्वीच पाश्चात्त्य अभिजात संगीताचा एक अजरामर रचनाकार बनेपर्यंतच्या प्रवासाचं!
१४ वर्षांच्या मोझार्टने १४ व्या क्लेमेंट पोपचा एक अनमोल ठेवा- एक अत्यंत पवित्र प्रार्थना- व्हॅटिकनच्या बाहेर स्मगिलग करून नेली. चर्चच्या नियमाप्रमाणे हा एक अत्यंत घोर अपराध होता. पण त्याला शिक्षा करण्याऐवजी पोपने त्याचा व्हॅटिकनचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला, त्याची ही एक अद्भुत कथा..
बाख (१६८५-१७५०), मोझार्ट (१७५६-१७९१) आणि बीथोव्हन या तीन संगीतकारांना पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातले ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं म्हटलं जातं. या त्रयीतील विष्णू म्हणजेच मोझार्ट. (उद्या त्याची २६३ वी जयंती आहे.) या अजरामर प्रतिभावंताच्या लहानपणीची एक अत्यंत आश्चर्यकारक, पण अस्सल घटना मी इथे सांगणार आहे.
असामान्य प्रतिभेच्या मोझार्टने अगदी लहान वयातच त्याच्याबद्दलच्या अपेक्षा नेत्रदीपकरीत्या पूर्ण केल्या. मोझार्टचं वयाच्या ३५ व्या वर्षी अकाली निधन झालं. चार-पाच वर्षांचा असतानाच त्याच्यातली प्रतिभा दिसायला लागली होती. पुढे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील असामान्य प्रतिभा असणारा हा लहान मुलगा ‘वंडर बॉय’ म्हणून प्रसिद्धीस आला. मानवी इतिहासात मोझार्टइतकी असामान्य प्रतिभा आणि प्रसिद्धी लाभलेलं दुसरं मूल अजून जन्माला आलेलं नसावं.
मोझार्टला अनेक अलौकिक क्षमतांची देणगी प्राप्त झाली होती. केशवसुतांना ‘शब्दांनो, मागुते या’ अशी शब्दांची आर्जवं जशी करावी लागत, तशी मोझार्टला स्वरांची आर्जवं कधीच करावी लागली नाहीत. स्वर त्याच्या सेवेसाठी जणू काही हात जोडून नेहमी उभेच असत. म्हणूनच मोझार्ट थक्क करणाऱ्या वेगाने, उत्स्फूर्तपणे, विपुल प्रमाणात संगीत लिहू शकायचा. बहुतेक सर्जनशील कलावंतांना आपल्या आयुष्यात प्रतिभा कुंठित झाल्याचा अनुभव कधी ना कधी तरी येतोच. (ज्याला इंग्रजीत ‘रायटर्स ब्लॉक’ म्हणतात.) रचनाकाराला- मग तो कितीही प्रतिभावान असो- कित्येक वेळा काही सुचतच नाही. पण मोझार्टला त्याच्या आयुष्यात अशा परिस्थितीला कधीच सामोरं जावं लागलं नाही. याला कारण मोझार्टची विलक्षण स्मरणशक्ती आणि त्याचा एकपाठीपणा. संगीताचा एखादा तुकडा एकदा जरी ऐकला तरी तो ते कधीच विसरत नसे.
मोझार्टच्या अलौकिक सांगीतिक देणगीबद्दल अनेक आख्यायिका आणि किस्से प्रसिद्ध आहेत. परंतु अडचण अशी की, यातल्या बहुतेक गोष्टी या वस्तुस्थिती, अर्धसत्य आणि कल्पित कहाण्या यांचं मिश्रण आहेत. परंतु मोझार्टबद्दल जी गोष्ट मी सांगणार आहे तिचे सर्वसमावेशी दस्तावेज आजही उपलब्ध आहेत. त्यामुळेच ती पूर्णपणे सत्य आहे. या गोष्टीने त्याकाळच्या चर्च आणि संगीताच्या विश्वात एकच खळबळ माजवली होती. आणि तेव्हापासूनच ही मोझार्टची सर्वात प्रसिद्ध अशी दंतकथा ठरली आहे.
मोझार्टने आपल्या ३५ वर्षांच्या अल्पायुष्यातील जवळजवळ एक-तृतियांश काळ फिरस्ता संगीत कलाकार म्हणून व्यतीत केला. संगीत कार्यक्रम सादर करण्यासाठी मोझार्ट युरोपातील अनेक देशांतून फिरला. या फिरस्तीमध्ये त्याने किमान दहाएक देशांत आपले कार्यक्रम सादर केले. ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक रिपब्लिक, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलॅण्ड, स्लोव्हाकिया आणि स्वित्र्झलड या नावांनी ते देश आज ओळखले जातात. या दौऱ्यामुळे त्यांला दोन महत्त्वाचे फायदे झाले. एक- त्या काळच्या संगीतजगतातील प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्याला संवाद साधता आला. आणि दोन- राजघराण्यातील, खानदानी कुटुंबांतील, चर्चमधील मान्यवर, राजदूत आणि तत्सम अनेक ख्यातनाम व्यक्तींचा सहवास या दौऱ्यांतून त्याला लाभला. मोझार्टने ज्या सुप्रसिद्ध व्यक्तींसमोर आपली कला सादर केली, त्यांत होली रोमन एम्पायरची व्हिएन्नास्थित सम्राज्ञी मारिया थेरेसा, ऑस्ट्रियाची राजकन्या आणि फ्रान्सची भावी राणी मेरी अॅन्टोनिएट, व्हर्सायमध्ये १२ वे किंग लुईस, पॅरिसमध्ये १५ वे किंग लुडविग आणि त्यांची प्रेयसी माक्विझ पॉम्पॅदोर आणि लंडनमध्ये तिसरे किंग जॉर्ज आदींचा समावेश होता. थोडक्यात, हे दौरे मोझार्टसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायद्याचे ठरले. कारण त्याचं बरंचसं संगीत शिक्षण या दौऱ्यांमुळेच शक्य झालं. शिवाय त्याच्या सांगीतिक आणि मानवी व्यक्तिमत्त्वाला त्यामुळे उत्तम आकार मिळाला.. ते बहरलं.
मोझार्टने १७६९ते १७७३ या काळात आपले वडील लिओपोल्ड मोझार्ट यांच्याबरोबर तीन वेळा इटलीचा दौरा केला. ज्या घटनेबद्दल मी सांगणार आहे ती त्यांच्या इटलीच्या पहिल्या दौऱ्यात घडली. हा दौरा जवळजवळ १५-१६ महिन्यांचा होता. नेमकं सांगायचं तर डिसेंबर १७६९ ते मार्च १७७१ दरम्यान हा दौरा झाला.
एप्रिल १७७० च्या दुसऱ्या आठवडय़ात मोझार्ट पिता-पुत्रांनी रोमला भेट दिली. एप्रिल महिन्यातील दुसरा आठवडा हा ‘पवित्र आठवडा’ (होली वीक) मानला जातो. व्हॅटिकनमध्ये असताना त्यांना सिस्टीन चॅपलला भेट देण्याची संधी मिळाली. या चॅपलमध्ये त्यांना अत्यंत प्रसिद्ध आणि अद्वितीय मानलं जाणार ‘मिसेरेरी’ हे पवित्र संगीत (एक प्रकारची प्रार्थना) ऐकायला मिळालं. (या संगीतरचनेचं पूर्ण नाव- ‘मिसेरेरी मेई डय़ूस’ असं आहे. त्याचा अर्थ- ‘परमेश्वरा, आमच्यावर दया कर’ असा आहे.) इटालियन रचनाकार आणि चर्चमधील गायक ग्रेगोरियो अॅल्लेग्री (१५८२-१६५२) याची ही रचना आहे. १२-१४ मिनिटं चालणारी ही प्रार्थना दोन क्वायर्ससाठी (गीतसमूहांसाठी) लिहिली आहे. एक- पाच जणांचा आणि दुसरं- चार जणांचा!
आजच्या जमान्यातील संगीतप्रेमींपर्यंत अनेक शतकांतून चालत आलेली ही प्रार्थना नि:संशय सुंदर आहे. पण तिला अद्वितीय म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे तिच्याभोवती असलेलं गूढतेचं आणि गोपनीयतेचं वलय. आणि हे वलय पुढील गोष्टींमुळे निर्माण झालेलं आहे. १७७० सालापर्यंत या संगीताच्या फक्त तीनच प्रती उपलब्ध होत्या. त्यातली एक स्वत: पोप यांच्याकडे होती. (ही प्रत सिस्टीन चॅपलमध्ये कडीकुलपात बंद करून कडेकोट बंदोबस्तात ठेवलेली होती.) उरलेल्या दोन प्रती पोप यांनीच खास भेट म्हणून दिल्या होत्या. एक प्रत होली रोमन साम्राज्याचा व्हिएन्नातील सम्राट पहिला लिओपोल्ड याला आणि दुसरी प्रत पोर्तुगीजच्या राजाला. एखाद्या अत्यंत मौल्यवान ठेवीसारखी व्हॅटिकनने ‘मिसेरेरी’ जतन करून ठेवली होती. हे संगीत गायला, वाजवायला आणि त्याच्या प्रती बनवायला कलाकारांना पूर्णपणे बंदी होती. तसंच हे संगीत सिस्टीन चॅपलच्या बाहेर घेऊन जायलादेखील मनाई होती. आणि तसं करायचा जर कोणी प्रयत्न केलाच, तर त्यासाठी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घातला जाण्याची, वाळीत टाकलं जाण्याची शिक्षा होती. परंपरेप्रमाणे ही प्रार्थना सिस्टीन चॅपलमध्ये फक्त पोप यांचा खासगी क्वायरच गात/ वाजवीत असे. तेही वर्षांतून फक्त एकदाच.. पवित्र आठवडय़ात (होली वीक)!
याच बाबतीत मोझार्टचा एक चक्रावून टाकणारा अनुभव प्रसिद्ध आहे. एका बुधवारी सिस्टीन चॅपलमध्ये मोझार्टने ही मिसेरेरी प्रार्थना ऐकली. तीही फक्त एकदाच. ज्या हॉटेलात तो आपल्या वडलांबरोबर उतरला होता तिथे तो परतला आणि त्या प्रार्थनेचं संपूर्ण संगीत त्याने केवळ स्मरणातून लिहून काढलं. ११ एप्रिलला (गुड फ्रायडेच्या दिवशी) मिसेरेरी ही प्रार्थना पुन्हा एकदा सादर केली गेली. स्वत: लिहिलेली मिसेरेरीच्या संगीताची ती संहिता हॅटखाली लपवून मोझार्टने आपल्याबरोबर आणली होती. ती प्रार्थना पुन्हा एकदा ऐकताना मोझार्टने त्या संहितेत किरकोळ स्वरूपाच्या सुधारणा/ दुरुस्त्या गुप्तपणे केल्या. अशा तऱ्हेने १४ वर्षांच्या या जर्मन मुलाकडे त्या संगीताची चौथी, पण अनधिकृत प्रत आली!
मोझार्टने हे अनमोल संगीत व्हॅटिकनबाहेर लपवून नेलं आणि ‘मिसेरेरी’ ही प्रार्थना सार्वजनिक झाली. संगीताचा ब्रिटिश इतिहासकार आणि प्रवासी डॉ. चार्ल्स बर्नी (१७२६-१८१४) याने या संगीताची एक प्रत मोझार्टकडून इटलीमध्येच मिळवली. ती त्याने लंडनला नेली आणि १७७१ साली प्रकाशित केली. अशा प्रकारे या निषिद्ध असलेल्या संगीताच्या प्रती फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमध्ये सहज मिळू लागल्या.
१४ व्या पोप क्लेमंटने मोझार्टला बोलावून घेतलं. पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा सामाजिक बहिष्कार टाकण्याऐवजी त्यांनी ‘ऑर्डर ऑफ द गोल्डन स्पर’ हा व्हॅटिकनचा सर्वोच्च किताब बहाल करून त्याचा गौरव केला. मोझार्टने हे चौर्यकर्म केलं नसतं तर मिसेरेरीवर आजही केवळ पोपचा मालकी हक्क राहिला असता. मिसेरेरी आज ख्रिश्चन- जगतातली सर्वाधिक आवडती आणि सर्वात जास्त सादर केली जाणारी पवित्र रचना आहे. यासाठी ख्रिश्चन बांधवांनी मोझार्टचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
२०१२ साली मोझार्टला मिळालेला ‘ऑर्डर ऑफ द गोल्डन स्पर’ हा किताब रोमन म्युझियममध्ये लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
चर्चची स्थापना झाली त्या आठव्या शतकापासूनची सर्व ऐतिहासिक कागदपत्रं जतन करून ठेवण्यात आली आहेत. पण ती पद्धतशीरपणे भांडारात ठेवण्याची सुरुवात मात्र १६१२ सालापासून झाली. या संस्थेच्या ४०० व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने व्हॅटिकनच्या या गोपनीय संग्रहातील ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या दस्तावेजांचं प्रदर्शन रोमच्या कॅपिटोलाइन म्युझियममध्ये फेब्रुवारी २०१२ ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत भरवण्यात आलं होतं. यानिमित्ताने ऐतिहासिक महत्त्वाची ही कागदपत्रं/ दस्तावेज पहिल्यांदाच व्हॅटिकन शहराबाहेर नेण्यात आले होते. या दस्तावेजांमध्ये मोझार्टला जो किताब मिळाला होता तो मूळ अस्सल ‘लॅम्बस्कीनपार्चमेंट’देखील (कोकराच्या कातडीचं चर्मपत्र) या प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. त्यावर ‘४ जुलै १७७०’ ही तारीख आहे. कोळी असलेले सेंट पीटर जाळं टाकत आहेत असं चित्र असलेला पोप यांचा अधिकृत शिक्का त्यावर मारलेला आहे. पोपने मोझार्टची suavissimo cymbali sonitu’ या शब्दांत स्तुती केली आहे. ज्याचा अर्थ ‘कुमार वयापासूनचा झांजांचा सुमधुर नाद’ असा आहे.
शब्दांकन : आनंद थत्ते