दीनानाथ दलालांचं ‘फॉरेस्ट’ नावाचं जलरंगामधलं एक चित्र मी पाहतो आहे. दोन मोठ्ठाले झाडांचे तपकिरी-लाल बुंधे. त्या वृक्षांच्या वरचा शाखा-पानांचा पसारा चित्रात मावत नाही इतके अवाढव्य बुंधे आणि
गिटारसोबत ऐकू येतो तो ड्रम्सचा कडकडाट. तबल्याहून तो कडक आहे आणि पुष्कळदा रॉकमध्ये तर तो अतीजलद गतीनं वाजल्यानं अजूनच कडक वाटू शकतो. (प्रत्यक्षामध्ये असा ताल निर्मिण्यासाठी लवचीक बोटांची आवश्यकता असते.) मग- मागाहून ऐकायचं असतं खुद्द गाणं. त्याचे शब्द हे सहसा अपशब्दच असतात आणि जगाशी भांडण करतानाचा त्या शब्दांना वास असतो. ती गायनशैली कधी विव्हळल्यासारखी असते, कधी आक्रमक. पण बव्हंशी रॉक गायक दणकटपणे गातात. शिव्या उच्चारताना त्या गळय़ांना विशेषसं स्फुरणं येतं. आणि मग हे सारं एकेकटं अनुभवून एकवटायचं असतं मनात. वरती खर्जामधली गिटार त्यावर लपेटायची असते आणि मग रॉक गाणं ऐकल्याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. (आवड-निवड- नावड त्याच्यापुढची!)
खेरीज रॉकची वळणं, फाटे ठाऊक असतील तर त्या आस्वादाला ती सहाय्यक ठरते. पहिला फाटा साठीच्या दशकातल्या अस्वस्थेचा. मग अवतरलं ‘आर्ट रॉक’ किंवा ‘प्रोग्रेसिव्ह रॉक’. पिंक फ्लॉइडची गाणी आपल्या इथे पुष्कळजण ऐकतात. प्रोग्रेसिव्ह रॉकचा तो एक प्रणेताच! नावाला जगणारं ते ‘प्रोग्रेसिव्ह रॉक’ नवे प्रयोग करणारं होतं. त्याच्या कविता या कधी फँटसीला जवळ जाणाऱ्या असत, तर कधी पुरेशा अॅबस्ट्रॅक्ट! त्याच सुमारास बहुधा ‘हार्ड रॉक’ आणि ‘सॉफ्ट रॉक’ अशी स्थूल विभागणी झालेली असणार. मेलडीवर भर असणार सॉफ्ट रॉकमध्ये आणि आक्रस्ताळ्या ठेक्याचं हार्ड रॉक! मग कधी रॉकचा एखादा फाटा जॅझच्या दिशेनं गेला, कधी फोक्च्या आणि ‘फोक-रॉक’, ‘जॅझ-रॉक’ असे प्रकार तयार झाले.
तिसरा महत्त्वाचा टप्पा आला सत्तरीत ‘मेटल’ रॉकचा! मेटल हे वेगळंच रसायन आहे आणि दोन आठवडय़ांनी आपण भेटू तेव्हा पुऱ्या तयारीत राहा- मी हिंसेचं थैमान मांडणारं ‘मेटल’ तुमच्या भेटीला आणणार आहे. ‘पंक-रॉक’ हे खास ब्रिटिश अपत्य त्याच सुमाराचं. ‘सेक्स पिस्तोल’, ‘क्लॅश’ यांसारख्या नावांमधूनही त्या कंपूचं गाणं किती अलंकरणविरहित असेल हे ध्यानी येतं. रॉकचा पाचवा फाटा होता ‘स्टेडिअम् रॉक’चा. मोठाली मैदानं भरून रसिक गोळा होत होते आणि गन्स अँड रोजेझ्सारखे उग्र रॉक बँड्स मैफल डोक्यावर घ्यायचे. रॉकचा अजून एक फाटा १९९०च्या आसपास फुटला- खरं म्हणजे नावारूपाला आला, तो ‘अल्टरनेटिव्ह रॉक’चा! हे रॉक DIY- Do it Yourself तत्त्वावर घरोघरी गॅरेजेसमध्ये तयार झालं होतं. या कंपूंचा भांडवलशाही रेकॉर्ड कंपन्यांशी छत्तीसचा आकडा होता. स्वत: अल्बम निर्मून, लोकांपर्यंत पोचवून, गाजवूनही दाखवले या मंडळींनी. ‘निर्वाना’ या बँडचा ‘नेव्हर माइंड’ हा अल्बम असाच गाजला. पारंपरिक विपणनला त्या कंपूनं विरोध दाखवला आणि तरी त्यांची कला गाजली. पबमध्ये फुलणारं ‘इंडी रॉक’ तयार झालं आणि त्या अरण्यात अजून एक फाटा निघालेला दिसला.
मी मघाशी सांगितलं का, त्या दलालांच्या आशयघन चित्रामध्ये अरण्याच्या द्वारापाशी एक खोपटं किंवा देऊळही आहे. आणि निळय़ा रंगामधली काही माणसंही तिथे आहेत. रॉकच्या अरण्याचा विस्तार बघून आपणही असेच द्वाराशी स्तिमित होऊन उभे आहोत. मध्येच ‘गन्स अॅन्ड रोजेझ्‘चे सूर येताहेत.
kImmigrants and fagots; They make no sense to me…
Like start some Mini- Iran or spread some fucking disease.k
‘निर्वासित अन् समलिंगी यांचं आपल्याला काही कळत नाही..
वसतात इथे मिनी-इराण; पसरवतात साले भलते रोग; नाही?’
सम्यक विचाराचा अभाव असलेलं हे गाणं अमेरिकेची उदार प्रतिमा आपसूक तोडतं. निदान पुष्कळ अमेरिकनांना काय वाटतं, हे उघडपणे सांगत आहे आणि अरण्याच्या दाराशी थांबलेलं आपलं निळं मन एकाच वेळी धास्तावत आहे आणि कुतूहलानं भारून जातं आहे!
‘पसरवतात साले भलते रोग..’
दीनानाथ दलालांचं ‘फॉरेस्ट’ नावाचं जलरंगामधलं एक चित्र मी पाहतो आहे. दोन मोठ्ठाले झाडांचे तपकिरी-लाल बुंधे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-02-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music rock music classical music