मकरंद देशपांडे
मुंबईतील ‘पृथ्वी थिएटर’च्या बहुभाषिक नाटय़वर्तुळात सदासर्वकाळ वावर असलेले लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मकरंद देशपांडे यांचे आपला नाटकीय प्रवास रेखाटणारे सदर.. ‘नाटकवाला’!
रंगभूमी कोणाही रंगकर्मीला miss करत नाही आणि विसरतही नाही!
नातं एन्ट्री-एक्झिटचं आहे, तमसो मा ज्योतिर्गमय आहे, हाऊसफुल्ल प्रयोगाचं आहे, रिकाम्या खुच्र्याचं आहे, रंगलेल्या प्रयोगाचं आहे, कंटाळवाण्या शोचंपण आहे, तालमीतल्या चहा-सिगरेटचं आहे, शोनंतरच्या दारूचं आहे, रंगकर्मीचं आपापसातलं आहे. मग ते हेवा वाटतोय म्हणून आहे, राग आहे म्हणून आहे, तिरस्कार आहे म्हणून आहे, प्रेम आहे आपापसात म्हणून नातं आहे असं शक्यतो नसतंच. कारण रंगकर्मी हा प्रेमापेक्षा ध्यासामुळे रंगमंचाशी आपला संबंध जोडतो आणि जर त्याला चॅलेंज करणारा प्रतिस्पर्धी भेटला की मग तो आणखीन खुलतो. खरं तर प्रतिस्पर्धीच त्याला जिवंत ठेवतो. डॉ. अनिल बांदिवडेकरांबद्दल मी फार बोललो नाही अजून. ते खरंच डॉक्टर! बीएमसीमध्ये नोकरी; पण एकांकिका, नाटक लिहिणं, बसवणं हा त्यांचा आवडता छंद. आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांच्या इतिहासात त्यांचं नाव हे लॉर्ड्सवर शंभर करणाऱ्या बॅट्समनएवढंच गौरवास्पद आहे. त्यांनी बदलत्या काळातली हरवत चाललेली संस्कृती या आशयाची ‘कैलासवासी पाल्रे’ एकांकिका केली. जिला कधी दुसरा, तिसरा नंबर ठाऊकच नव्हता. ती प्रत्येक स्पध्रेत फक्त पहिली होती. कारण परीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचंही म्हणणं एक होतं, की ती रंगभूमीचं भूषण आहे. खरं तर तिच्यानंतरचे दोन क्रमांक रिकामे ठेवायला हवेत. असो. मुद्दा असा आहे की, ‘कैलासवासी’ महेन्द्र जोशी आणि अनिल बांदिवडेकर हे समकालीन दिग्दर्शक. महेन्द्रला अनिलचा हेवा वाटायचा आणि अनिलला महेन्द्रच्या वेगवेगळ्या फॉम्र्सच्या सादरीकरणाचा आदर. दोघांनी एकमेकांचे थिएटर फॉम्र्स आपापल्या नाटकांत वापरले. खऱ्या अर्थाने मराठी, गुजराती, हिंदी रंगभूमीला भाषेचा पडदा राहिला नव्हता. अनिलनी तर महेन्द्रच्या नावाने नंतर बक्षीससुद्धा ठेवलं. हे खरं नातं दूपर्यंत!!
मधु मंगेश कर्णिकांची प्रसिद्ध कादंबरी ‘माहीमची खाडी’चं दोन अंकी हिंदी नाटकात रूपांतरण केलं त्यांच्या मुलानं- तन्मयनं आणि रामदास जाधवनं. आणि डॉ. अनिल बांदिवडेकरांनी त्याचं दिग्दर्शन केलं. १९८९ साली पृथ्वी थिएटरमध्ये त्याचा प्रयोग झाला. आणि पृथ्वीवरच्या त्या काळच्या प्रायोगिक सादरीकरणाच्या बाहेरचं- खरंच चाकोरीबाहेरचं, आऊट ऑफ बॉक्स म्हणता येईल असं.
जर तुम्ही पृथ्वी थिएटरला गेला नसाल तर त्याबद्दल थोडं सांगतो. शशी कपूर आणि जेनिफर कपूर यांनी पृथ्वीराज कपूर- ज्यांची आपली खूप मोठी थिएटर कंपनी होती, सामाजिक बांधिलकीची, घडामोडींची नाटकं त्यांनी केली, काही नावं सांगायची झाली तर ‘पसा’, ‘दीवार’, ‘किसान’, ‘पठान’.. ‘दीवार’ तर त्यांनी पार्टशिन होण्याआधीच केलं. कदाचित पार्टशिन होणार हे त्यांना आधीच जाणवलं होतं.
असो. पण अशा या ‘मोगले आजम’च्या जलालुद्दीन अकबरच्या स्मृतीसाठी पृथ्वी थिएटर बांधलं गेलं. १९७८ साली. पण हे थिएटर पृथ्वीराज कपूरांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या सेट्सच्या अगदी विरोधाभासी होतं. म्हणजे दोनशे seats चं intimate, thrust stage, , म्हणजे आपल्या regular दीनानाथ, बालगंधर्व, शिवाजी मंदिरला आपण proscenium stage म्हणतो, म्हणजे प्रेक्षक ही चौथी भिंत. पण पृथ्वीला अगदी तीनही बाजूला प्रेक्षक बसतात. म्हणजे सायक्लोरामा स्टेजची शेवटची भिंत काय ती एकच काळोखातली. प्रेक्षक एवढय़ा जवळ की मनातले विचारही ऐकू शकतात. अशा अनौपचारिक वाटणाऱ्या वातावरणात खरं तर ‘माहीम की खाडी’चा परिसर आणि त्यातली पात्रं उभी करणं वास्तवाच्या जवळ जाणारं आणि आव्हानात्मक दोन्ही होतं. कारण माहीमच्या पाइपलाइनमध्ये राहणारी, समाजाच्या आर्थिक श्रेणींतल्या सगळ्यात खालच्या स्तराची. त्यांची भाषा, त्यांचा मृत्यूविषयीचा बेदरकारपणा, जगण्यासाठी काहीही करण्याची मन:स्थिती, बेकायदेशीर राहत असल्याने सरकारी व्यवस्थेशी सतत दोन हात. आणि या परिस्थितीत बनणारा त्या परिसराचा दादा अब्बास दादू परकार साकारताना मी वेगळ्या पद्धतीने तयारी केली. म्हणजे भाषा, बॉडी लँग्वेजवर तर काम सर्वसाधारणपणे नट करतोच; पण ती माणसं जाणून घेण्यासाठी, त्या दूषित हवेचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम करून घेण्यासाठी मी साहित्याची मदत घेतली. मी जय दीक्षित यांची ‘मुरदा घर’ ही कादंबरी वाचली आणि त्यात मला ‘अब्बास दादू परकार’ची मानसिक ओळख मिळाली आणि मग त्या पृथ्वीच्या अनौपचारिक वातावरणात एक असा अब्बास साकार झाला की शोनंतर तेव्हा पृथ्वी थिएटरची व्यवस्थापक आणि कर्तीधर्ती संजना कपूरने माझ्यासाठी बॅकस्टेजला एक चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिलं होतं की, you are amazing. आणि त्या performance मुळे ती प्रेमात पडली. एवढं intimate आहे पृथ्वी आणि त्यात प्रेक्षक आणि कलाकारांचं नातं.
समीर नाडकर्णीनी नेपथ्य म्हणून फक्त काळ्या सायक्लोवर पर्वतारोहणाला वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रस्सीने माहीमच्या skyline ची outline बनवली होती. डॉ. बांदिवडेकरांनी एका ‘खाटेनी’ खिडकी, दरवाजा, जेल आणि रेलिंग दाखवून प्रेक्षकांना economy of staging चा वेगळा, पण परिणामकारक अनुभव दिला.
पृथ्वी थिएटरच्या बाहेर प्रांगणात मी खूप पंचवीस ते पस्तीस मिनिटांच्या एकांकिका किंवा आपण त्याला short plays म्हणू शकतो, जे शनिवार-रविवार थिएटरच्या आत होणाऱ्या दोन shows च्या मध्ये व्हायच्या. १९९० साली मी खास त्या सादरीकरणासाठी Heads Together नावाचा ग्रुप बनवला. नावाप्रमाणे त्याचं काम. ज्याला काम करायचं त्यांनी आपलं डोकं आणावं आणि आपल्या कलाभिनयानी रंगमंचावर आपटावं. मुळात संजना कपूरची ही संकल्पना होती की थिएटरबाहेरही नाटकं व्हावीत. जसं west मध्ये अगदी गल्लोगल्ली किंवा कितीतरी alternate spaces मध्ये छोटी-मोठी नाटकं होत असतात. फक्त मला वाटलं की सगळ्या भाषांच्या रंगकर्मीनी एकत्र यावं.
१९९२ ला पृथ्वीला international theatre festival’ होतं. फार गंमत होती. एखाद्या उत्सवाचं वातावरण होतं. संजनानी आतल्या नाटकाचा ताबा घेतला होता आणि मी बाहेरच्या. पंचाईत ही होती, की आतला show housefull’’ असायचा आणि तो संपल्यावर बाहेरचा सुरू व्हायचा. तर बाहेरसुद्धा housefull’’!!
फ्रान्स, जपान, जर्मनीमधली नाटकं होती आणि बाहेर त्यावेळचे नव्या दमाचे समर्थ कलाकार. नावं द्यायची झाली तर के. के. मेनन, आशीष विद्यार्थी, गणेश यादव, मनोज जोशी, डेन्झिल स्मिथ. जवळ जवळ पाच भाषांत नाटकं झाली. मी स्वत: हिंदी, इंग्रजी आणि एक संस्कृत एकांकिका पण केली. ‘देवदूतम्’ नावानं. त्यात मनोज जोशीनी काम केलंय. मी हिंदीत लिहिलं. मनोजच्या वडिलांनी संस्कृत translation केलं. पण शोच्या दिवशी सकाळी बाहेर तालीम करताना मी improvise केलं. म्हणजे काही वाक्यं वाढवली. तेव्हा मनोज म्हणाला, ‘मॅक, आता ही वाक्यं कोण संस्कृतमध्ये करणार?’ मी एक मिनिट इथे-तिथे पाहिलं. मला G. P. देशपांडे दिसले. मला माहीत होतं की त्यांना खूप भाषा येतात. मी त्यांना म्हटलं, की काही वाक्यं संस्कृतमध्ये करून द्याल का? ते हसले आणि म्हणाले- what made you think I can do it? मी म्हटलं, ‘need. गरज. आणि त्यांनी पटकन् करून दिलं आणि मग तालीम पाहत उभे होते. त्यांना खूप गंमत वाटली की पृथ्वीच्या प्रांगणात संस्कृत एकांकिका होतायत.
मनोज जोशी- ज्यानं गुजराती रंगभूमीवर खूप छान नाटकं केली, त्याचं ‘चाणक्य’ हिंदीतही गाजलं. त्याचे संस्कृत उच्चार G. P. ना खूप आवडले. G. P. देशपांडे हे खूप महत्त्वाचे नाटककार, निबंधकार, साहित्यिक. त्यांची महत्त्वाची नाटकं- ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘अंधारयात्रा’, ‘सत्यशोधक.’ असं म्हणतात की डॉ. लागूंचा सर्वश्रेष्ठ अभिनय ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटकात एका मार्क्सवादी विचारसरणीच्या प्रोफेसरच्या भूमिकेत होता.
मी एक अफलातून प्रयोग बाहेर open air च्या नाटकात केला. १९९३ च्या सुरुवातीला Recapping म्हणजे काल झालेलं आज पुन्हा एका पाच मिनिटांच्या कॅप्सूलमध्ये दाखवायचं आणि आजचा प्रयोग करायचा. कारण बाहेर उभ्या उभ्या किंवा जमिनीवर, अगदी समोरच्या बिल्डिंगच्या बाल्कनीतून एका मार्क्सवादी विचारसरणीच्या प्रोफेसरच्या भूमिकेत होता.
मी एक अफलातून प्रयोग बाहेर open air च्या नाटकात केला. १९९३ च्या सुरुवातीला Recapping म्हणजे काल झालेलं आज पुन्हा एका पाच मिनिटांच्या कॅप्सूलमध्ये दाखवायचं आणि आजचा प्रयोग करायचा. कारण बाहेर उभ्या उभ्या किंवा जमिनीवर, अगदी समोरच्या बिल्डिंगच्या बाल्कनीतून बघणाऱ्या मंडळींना कधीही यायची-जायची परवानगी होती.
मला असं वाटतंय की हे Recapping तंत्र तेव्हा ळश् वरही सुरू झालं नव्हतं. १९९३ साली माझं पहिलं- म्हणजे मी लिहिलेलं दोन अंकी नाटक ‘Dream Man’चं प्रथम रूप होतं Platform Performance. दोन भागांतला. पहिला भाग शनिवारी आणि दुसरा रविवारी. दोन्ही बघायला तीच मंडळी उपस्थित होती असं फार कमी वेळा झालं होतं. तेव्हा रजत कपूर (Actor, Writer, Director)- ज्याने शेक्सपिअरची बरीच नाटकं जिबरीश- म्हणजे ज्या भाषेला बाराखडी नाहीच अशी भाषा- म्हणजे साधारण किशोरकुमारच्या खेळकर यॉडिलगसारखी clown- विदूषक पठडीतली. clowning म्हणजे आपण म्हणतो ना, की विदूषकी चाळे करतोय तो- त्या पठडीतली नाटकं. अगदी ‘हॅम्लेट’, ‘किंग लिअर’. पण मला आवडलेला त्यांनी बसवलेला ‘C फॉर Clown’.. त्यात खऱ्या अर्थाने Clowning Form चा अप्रतिम वापर केला गेला. ‘‘can use clowns to get into the heart of the text directly. They allow you to experience the text from a distance while totally immersing in it. The clowns can easily pass a comment about the characters they are playing themselves.. ही रजतची clown यामागची भूमिका. पण त्याने माझ्या Dream Man Platform चा पहिला भाग पाहिला होता आणि तो म्हणाला होता की, concept खूप unique आहे, concept एक भाषा आहे. आणि मी १९९२ मध्ये केलेला platform हा १९९३ सालच्या पृथ्वी फेस्टिव्हलचा भाग म्हणून पृथ्वी थिएटरमध्ये केला. रजत कपूर त्यावेळी दिल्लीच्या avant guard म्हणजे चौकटीबाहेरची नाटकं करणाऱ्या चिंगारी संस्थेचा.. त्यांच्या नाटकाचे costume, property, sets, lights हे सगळंच french theatre सारखं हे मला मी १९९६ साली फ्रान्सच्या अॅव्हेन्यू या खूपच prestigeous फेस्टिव्हलला गेल्यावर कळालं. impressions घेतली असावीत बहुतेक, का पाहिलेलं करत होते, याचा मी कधी जासुसी उलगडा करायचा प्रयत्न केला नाही. पण एक गंमत अशी झाली की १९९३ चा रजत आणि माझं नातं हे १९९९ साली जेव्हा त्याने ‘C for Clown’ केलं, त्यात नामांकित, उच्च दर्जाचे नट विनय पाठक, रणवीर शोरी, स्वत: रजत कपूर, अतुल कुमार आणि शिबा चढ्ढा- सहा वर्षांत आमच्या नात्याने थोडं नाटकीय वळण घेतलं होतं. कारण त्याला मी खूप आवडायचो. पण मी ज्या वेगानं नाटक लिहून stage वर आणायचो आणि कसलाही form न वापरता मुक्तपणे आपल्याला पाहिजे ते करायचो, हे त्याला कदाचित पचलं नसावं. कारण वर देखल्या भेटला की अतिशय friendly, पण मी असं ऐकलं की रजतसाठी मी रंगभूमीचा ‘किडा’ नाही, ‘कीड’ आहे- a disease हे ऐकून मला खूप राग आला. कारण मी मनापासून त्यांची सगळी नाटकं पाहायचो. show नंतर त्यांच्याशी चर्चा करायचो. त्यांच्या नाटकाच्या show नंतर memory साठी काढल्या जाणाऱ्या ग्रुप फोटोचा भागही व्हायचो. नाटकाचं नातं नाटकीय व्हावं, पण घृणा असू नये असं मला वाटायचं. असो !! मला ‘C For Clown’ आवडलं. मी पृथ्वी थिएटरच्या ‘पृथ्वी Notes’मध्ये ‘C for Clown’चं परीक्षण लिहिलं आणि त्यात रजतची खूप स्तुती केली. त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याने मला पृथ्वी कॅफेमध्ये कडकडून मिठी मारली आणि आपला आनंद आणि आश्चर्य व्यक्त केलं, की तू कसं माझ्या नाटकाबद्दल एवढं चांगलं लिहिलंयस? मी तेव्हा त्याला म्हटलं, ‘रजत, मी जर याआधी कधी तुझ्या नाटकाबद्दल बरं-वाईट बोललो असेन तर ते केवळ तू एक दिग्दर्शक किंवा नट म्हणून. आणि तुझा घोळ असा आहे की तू माझ्या नाटकांपेक्षा माझ्याशीच आपल्या मनात वैर करून बसलास!’ हे ऐकून तो गहिवरला आणि म्हणाला, ‘‘नाही, नाही, असं अजिबात नाहीए.’’ पण सगळं तसंच आहे हे मला माहितीये. कारण तो जिबरीशमध्ये शेक्सपिअर करतो त्याला शब्दांचं मूल्य नाही समजणार. असो. असे बरेच रंगकर्मी आहेत- जे आपल्या समकालीन रंगकर्मीची नाटक पाहत नाहीत. कारण त्यांना वाटतं की, दुसऱ्याला काही येत नाही. आणि जवळजवळ प्रत्येकाला असंच वाटतं!
mvd248@gmail.com