मकरंद देशपांडे

निवडणुका आणि नाटक यात समानता आहे ती नाटय़ाची! कोणाची सरशी होईल हे सांगता यायचं नाही. दोन्हीला इतिहास आहे. दोन्ही स्पर्धात्मक आहेत. दोन्हीत प्रेक्षक आहेत आणि पात्र किंवा मुखवटा ओढलेले नट किंवा नेते आहेत. प्रत्येक नवीन नाटकासाठी आणि निवडणुकीसाठी मेंदूचे मज्जातंतू ताणावे लागतातच. दोन्हीत फरक आहे तो सादरीकरणात असलेल्या कलात्मकतेचा आणि काव्याचा!

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

निवडणुका म्हटल्या की आपल्या आधीचे आणि आपण नसलेल्या पार्टीचे सगळे किती वाईट आहेत याबद्दलची नारेबाजी, भाषणं, फलक यामुळे आपण अजून तेवढे वाईट नाही, हे सूचित करण्याकडे कल असतो. हल्ली भाषा, जात या राजकारणापेक्षा देवालाच- अगदी त्याच्या घरासकट- निवडणुकीसाठी वापरलं गेलंय. नाटकवाला याबाबतीत श्रीमंत आहे.. जरी निवडणुकांसाठी पार्टीकडे अतोनात पसा असला तरीही! कारण नाटकवाला ‘देव’ या संकल्पनेबद्दल बोलताना देवाशी नातं जोडतो किंवा तोडतो. पण नातं असल्याशिवाय ते तुटू शकत नाहीच.

खरं तर दोन्हीकडे माणूस आहे. आणि जेव्हा माणसाला समाजप्रबोधनापेक्षा समाजावर राज्य करायचं असतं तेव्हा ते राजकारण. आणि प्रबोधनात झालेल्या मनोरंजनानं होणाऱ्या बोधानं तयार होणारं नाटक- अगदी सुरुवातीला ‘ना’ असून सकारात्मकता नाटकात अधिक असते, किंवा त्यास वाव तरी असतो.

नाटककार म्हणून मला असं वाटलं की, निवडणुकीसाठी विचारात आणलेल्या योजनांमध्ये काय बरं वेगळेपण आणता येईल? ज्यात माध्यमं, पक्षाच्या राजकीय मूल्यांचं अध:पतन आणि मनुष्याच्या नैतिक मूल्यांचं पतन आणता येईल.

एका एजन्सीला एका पक्षाने पूर्ण कॅम्पेन डिझाइन करायला दिलं आहे आणि त्या एजन्सीने ठरवलंय की कॅम्पेनला ठळक मथळा हवा. त्यात देव, शहरातील युवा मंडळी आणि ग्रामीण नायक-नायिका असावी. ‘डूड, भगवान जिंदा है’ ही लाइन ठरवली जाते. आणि त्याप्रमाणे पक्षाचा युवा नेता आपल्या वडिलांच्या ग्रामीण मतदारसंघात झालेल्या भव्य शक्तिप्रदर्शनाच्या वेळी घडलेली एक घटना वापरायचं ठरवतो.

झालं होतं असं की, नेते देवाला साक्षी ठेवून सगळी आश्वासनं देत होते. पाणी, वीज, शेतकऱ्यांना अनुदान वगैरे वगैरे. अचानक मागनं हरिश्चंद्र ओरडला, ‘‘हे सगळं खोटं आहे. हे जे सांगताहेत ते कधीही होणार नाही. कारण ते देवाची साक्ष देत आहेत. खरं तर देव मेलेला असल्यानं गेल्या निवडणुकीतलंही आत्तापर्यंत काही मिळालं नाही.’’ हरिश्चंद्रच्या त्या विधानानं मेळाव्याला काहीही फरक पडला नाही. त्याचा आवाज मंचापर्यंत पोहोचलाही नाही. परंतु व्हिडीओ रेकॉìडग चालू होतं आणि नेमका कॅमेरा हरिश्चंद्रवर होता. आता युवा नेत्यानं ठरवलं की सुरुवात त्याच गावातनं करायची. त्या हरिश्चंद्रला पकडून त्याच्याकडून ‘देव जिवंत आहे’ ही लाइन म्हणवून घ्यायची!

एजन्सी त्या मतदारसंघातील गावात आपली एक छोटी टीम पाठवते. संयोगिनी ही कार्यकारी निर्माती, कॅमेरामन चक्री आणि साऊंड रेकॉर्डिस्ट अक्षय त्यांना मदत करणार असतो. पक्षकार्यकर्ता विलास दगडू पाटील.. पण तो वाटतो तेवढा सरळ नसतो. खरं तर तो रंगेल, बनेल, गंडवेल; पण खऱ्या अर्थी कामाला येणारा असतो. फक्त दारू पिण्याआधीचा आणि प्यायल्यानंतरचा तो वेगळा असतो.

संयोगिनी आणि टीम कॅमेरा लावून तयार असते, पण हरिश्चंद्रला घेऊन विलास आलेला नसतो. अक्षय निसर्गातील न ऐकलेल्या ध्वनींचं रेकॉìडग करण्यात हरवतो, तर कॅमेरामन चक्री आपल्या डोळ्यांत निसर्ग सामावून घेत असतो. चक्री स्वभावाने कुजका, पण खरा आर्टिस्ट प्रकृतीचा. अक्षय मात्र साधारण बरोबर वागणूक करणाऱ्यांपैकी. संयोगिनी मात्र अतिशय फोकस्ड, कडक आणि तापट स्वभावाची बाई. जेव्हा रंगेल विलास आपल्या कलरफुल मोटरसायकलवरून टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकत येतो तेव्हा तिचा पारा चढतो. कारण विलास हरिश्चंद्रशिवाय आलेला असतो. त्याचं म्हणणं पडतं की, जरी तुमच्यासाठी हे पाच मिनिटांचं काम असलं (म्हणजे हरिश्चंद्रला बोलावून त्याच्याकडून एक ओळ म्हणून घ्यायची.), साधं वाटत असलं तरी त्यासाठी तुम्हाला एक-दोन दिवस, कदाचित आठवडाही थांबावं लागेल. त्यावर संयोगिनी विलासवर बरसते. विलासला स्त्रियांकडून झालेला अपमान नवीन असतो. त्याला त्याचं कौतुक वाटतं आणि तो मदत करायला तयार होतो. पण वेळ का लागणार याचं खरं कारण सांगतो.. हरिश्चंद्र हा आता गावात नाही तर डोंगरात राहतो. आणि देव मेलेला आहे हे फक्त तो त्या सभेत बोलला नव्हता, तर त्यानंतर देवळात आरती चालली असेल तर हा मागून ओरडायचा की, ‘कोणाची आरती करताय? देव मेलेला आहे.’ कधी कधी सणावारी भोपू घेऊन जोरजोरात बोलायचा. एक दिवस गावकऱ्यांनी त्याला पिटाळून लावलं. खरं तर जिवंत जाळायचा प्रयत्न केला. पण विलासनेच त्याला वाचवलेलं असतं आणि जंगलाचा मार्ग दाखवलेला असतो.

विलासचा सिद्धांत असतो की, जंगल सुरक्षित आहे. गावात आणि शहरात मात्र मारामार आहे. संयोगिनीचा विलासवर विश्वास नसतो. ती विलासशी भांडते. विलास चिडून निघून जातो. अक्षय घाबरतो आणि तिथून तात्काळ निघून जावं असा सल्ला तो संयोगिनीला देतो. चक्रीला मात्र विलासनं सांगितलेल्या हरिश्चंद्रच्या भीषण स्थितीचा त्रास होतो. संयोगिनीला कसंही करून ‘देव जिवंत आहे’ हे वाक्य हरिश्चंद्रकडून वदवून घ्यायचं असतं. त्या रात्री ते तिघं धर्मशाळेत राहतात.

दुसऱ्या दिवशी विलास हरिश्चंद्रला घेऊन येतो. त्याला एका मोठय़ा दोरखंडाने बांधलेलं असतं. विलासच्या हातात पिस्तूल असतं. आता अगदी आदिमानवासारख्या दिसणाऱ्या हरिश्चंद्रकडून ते वाक्य वदवून घेणं हे अशक्यप्राय असतं.

संयोगिनीत अजिबात माणुसकी नाही असं चक्रीला वाटतं. अक्षय मात्र संयोगिनीच्या बाजूनं असतो. चक्रीला त्या दोघांचा खूप राग येतो. विलास दारूची बाटली काढून काही अंतरावरून यांचा फार्स पाहत असतो. संयोगिनी आणि अक्षय बरेच प्रयत्न करतात, पण हरिश्चंद्र काही बोलत नाही. तो जमिनीवर निपचित पडून असतो. मधेच फक्त तो जनावराप्रमाणे आवाज करतो. शेवटी संयोगिनी विलासला मदत करायची विनवणी करते. पण विलास काही ऐकत नाही. कारण त्याचं काम फक्त हरिश्चंद्रला आणण्याचं असतं.. जे त्याने पूर्ण केलेलं असतं.

आता चक्री आणि संयोगिनीमध्ये मोठ्ठं भांडण होतं- ज्यात ते प्राण्यांप्रमाणे हातापायीवर येतात. दारू प्यायलेला विलास मधे पडतो आणि हरिश्चंद्रबद्दल काही माहिती देतो. हरिश्चंद्र हा पायातले जोडे अप्रतिम बनवायचा. आसपासच्या गावात असं बोललं जायचं की, हरिश्चंद्रने बनवलेले जोडे घातले की पायगुण चांगला होतो. लग्नात त्यानं बनवलेले जोडे आहेर म्हणून दिले जायचे. मनानं कलाकार हरिश्चंद्र आता मात्र एखाद्या जनावरासारखा झालाय. ही गोष्ट ऐकून चक्रीला आता हरिश्चंद्रचं कॅमेऱ्यानं चित्रण करायचं नसतं. त्याला वाटतं, हरिश्चंद्रची भीषण स्थिती आजच्या हरवत चाललेल्या माणुसकीचं प्रतीक आहे. संयोगिनीवर चिडून तो विलासबरोबर दारू प्यायला बसतो. अक्षयला काहीच कळत नाही.

तो घाबरलेला असतो. हरिश्चंद्रकडून ‘देव जिवंत आहे’ असं वदवून घेणं आता जवळजवळ अशक्य झालेलं असतं.

अशा परिस्थितीत संयोगिनी आपला राग बाहेर काढण्यासाठी आणि या दोन पुरुषांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यासारखीच दारू पिते आणि मग आदिमानवासारख्या दिसणाऱ्या हरिश्चंद्रसमोर एक नाटय़ घडत जातं; ज्यात संयोगिनीकडे विलासचं पिस्तूल येतं आणि ती चक्रीला गोळी मारते. विलासवर पिस्तूल रोखते. हरिश्चंद्र ओरडतो – भगवान जिंदा है- देव जिवंत आहे. संयोगिनीला आता हरिश्चंद्रत इंटरेस्ट उरलेला नसतो. ती मूच्र्छितावस्थेत पडते. हरिश्चंद्र पिस्तूल हातात घेतो आणि जंगलाकडे निघून जातो. विलास ओरडतो, ‘देव जंगलात जिवंत आहे!’

हे नाटक लिहिताना वास्तववादी प्रवेश आणि लोकनाटय़ातला सूत्रधार हे घटक वापरले. चक्री गळ्यात मफलर घातला की सूत्रधार. मग तो अक्षयला मफलर देतो आणि मग अक्षय प्रेक्षकातल्या कुणा एकाला देतो. मुद्दा हा होता की, सूत्रधार झाल्यावर घडणारं नाटय़ भीषण असलं, तरी ते पाहता येतं आणि सांगता येतं. पण त्यातून सुटका नाही.

टेडी मौर्यानं नाटकाचं नेपथ्य खूपच विचारपूर्वक केलं. त्यानं पांढऱ्या लायक्राचं (ताणलं जाणारं कापड) झाड बनवलं. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय. खाली बुंध्याला एक लोखंडी प्लेट ठेवून त्याच्याभोवती उभं केलं मोठ्ठं झाड. खेचलेल्या कापडाच्या लांब पसरलेल्या फांद्या आणि त्यावर प्रकाश पडला की सकाळ, संध्याकाळ, रात्र व्हायची. झाडाचा सायक्लो झाला. विंगच्या एका बाजूला डोंगरातनं बाहेर येण्याचा भास होण्यासाठी भुयाराच्या आकाराची मोठ्ठी चप्पल बनवली. प्रतीकात्मकरीत्या त्यातनं येणाऱ्या एन्ट्री, एक्झिट्स नाटकाला वेगळं परिमाण देऊन गेल्या.

स्वप्नील नाचणे हा एक अतिशय गुणी कलाकार आणि अस्वस्थ संगीतकार. खूप चांगली ब्रास फ्लूट वाजवायचा. आज तो या मर्त्य जगात नाही, पण त्याचं अस्तित्व नक्कीच त्या जंगलात असेल. कारण या नाटकाचं संगीत करताना तो जंगलात हरवला होताच. हा लेख त्याच्या आठवणीसाठी. लवकर गेला म्हणून राग आहे पण थांबून राहण्यातला तो नव्हताच!

निवेदिता भट्टाचार्यने संयोगिनी खूपच ताकदीनं उभी केली. तिच्यातली राक्षसी वृत्ती दाखवताना तिनं स्त्रीपात्राला पुरुष पात्रापेक्षा जास्त बीभत्स केलं. एका नटीसाठी हे खूप मोठं आव्हान. टेडी मौर्यानं हरिश्चंद्र वठवला असं म्हणता येईल. तो मध्यंतरात पंधरा मिनिटं तसाच पडून असायचा रंगमंचावर आणि प्रेक्षक पहिल्यांदा मध्यंतराच्या वेळात हळू आवाजात बोलायचे. त्यानं मनुष्य पुन्हा प्राणी होतो, हे पाहून आपण अचंबित होऊ अशा पद्धतीनं दाखवलं. इम्रान रशीदने चक्री करताना कमालीचा बेदरकारपणा, पण त्यातील कलाकार जागा केला. पवननं अक्षय करताना एक घाबरलेला, पण राक्षसी वृत्तीला साक्ष ठरणारा सूत्रधार सहज उभा केला.

मी विलास दगडू पाटील खूपच एन्जॉय केला. आता  मी माझ्या अभिनयाबद्दल लिहिणार नाही. ‘डय़ूड, भगवानजिंदा है’चं पोस्टर डिझाइन केलं मनीष मानसिंग या हुशार फोटोग्राफरने. माझं आवडतं डिझाइन. बिजॉन मंडलनं बंगाली थिएटरची जाण ठेवत भीषणता दाखवणारी प्रकाशयोजना केली.

जय स्वप्नील! जय हरिश्चंद्र!

जय निवडणुका! जय नाटक!

mvd248@gmail.com

Story img Loader