प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
Horror Movies On OTT (1)
हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार, त्यांच्या कलाकृती, त्यांनी निर्माण केलेलं हास्य, त्यांनी केलेलं राजकीय, सामाजिक किंवा जीवनविषयक भाष्य आणि त्यासंदर्भातील काही अद्भुत, मजेशीर गोष्टी कथन करणारं सदर..

प्रचंड पाऊस पडणार आहे, जगबुडी होणार आहे. तेव्हा नोआ एक महाकाय गलबत बांधतो. सर्व प्राण्यांच्या जोडय़ा त्यातून प्रवास करतात. महापुरात तरतात. कालांतरानं पाऊस थांबतो. इंद्रधनुष्य दिसतं. सर्व प्राणी सुखरूपपणे जमिनीवर उतरतात आणि सृष्टीचं जीवनचक्र सुरळीतपणे सुरू राहतं. अशी एक पाश्चिमात्य पुराणकथा आपण यापूर्वी केव्हा ना केव्हा ऐकली असेलच. आता या कथेत विशेष असं काय आहे? खरंच काही नाही. खूपच सपक आणि अतक्र्य समजुतीने भरलेली ही कथा. त्यात प्रचंड काहीतरी दडलेलं आहे असं वाटत नसल्याने आपण ती बाजूला सारतो. विस्मृतीत, अडगळीत टाकून देतो. पण व्यंगचित्रकारांचं तसं होत नाही. ते शोधत असतात नित्य नवनवीन कल्पना आणि त्यासाठी लागणारी साधनसामुग्री. या असल्या सपक कथेतून ते अनेक चमचमीत, चविष्ट पदार्थ व्यंगचित्रांच्या रूपाने तयार करतात. आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात आणि विचारही करायला लावतात.

नोआच्या या गलबतावर आणि प्रवासावर अक्षरश: शेकडो व्यंगचित्रं जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यातल्या काही कल्पना जरी आपण समजून घेतल्या तरी आपल्या लक्षात येईल की व्यंगचित्रकार कशा रीतीनं विचार करतात. उदाहरणार्थ, युनिकॉर्न हा एकशिंगी अश्व पुराणात होता असं म्हणतात. तर तो सध्या अस्तित्वात का नाही, याचं उत्तर व्यंगचित्रकारांनी दिलंय. एका चित्रात खुद्द नोआच या युनिकॉर्नना ‘‘सॉरी.. जागा नाही,’’ म्हणून गलबतात प्रवेश नाकारतो. साहजिकच त्यांचं अस्तित्व त्याचवेळी संपुष्टात आलं. दुसऱ्या एका चित्रात मानवाचा लबाड स्वभाव दाखवलाय. खऱ्या युनिकॉर्नचे हात-पाय बांधून ठेवलेत आणि दोन माणसांच्या जोडय़ा युनिकॉर्नसारखी वेशभूषा करून जहाजावर प्रवेश मिळवतात! म्हणजे जणू खोटा पासपोर्टच की! पण याहीपेक्षा धमाल भाष्य एका व्यंगचित्रकारानं ‘न्यूयॉर्कर’च्या अंकात केलंय. युनिकॉर्न अस्तंगत का झाले याबद्दलचं ते अगदी टिपिकल अमेरिकन भाष्य म्हणता येईल. नोआचा सहकारी त्याला सांगतोय, ‘‘ बॅड न्यूज. युनिकॉर्न ‘गे’ आहेत.’’

एका व्यंगचित्रकाराने नोआला गलबताचं तिकीट स्वस्तात विकताना दाखवलंय. म्हणजे एका तिकिटात दोन जण प्रवास करू शकतात, वगैरे वगैरे. (टिपिकल अमेरिकन बिझनेस!) दुसऱ्या एका चित्रात नोआची बायको त्याला म्हणते, ‘‘आणखीन एकदा जरा कन्फर्म करून घे.. खरंच एवढा पाऊस पडणार आहे का? कारण  वेधशाळेनं तर दुपारी रिमझिम पाऊस पडेल असं सांगितलंय.’’ नोआचं गलबत म्हणजे जणू काही एक प्रकारची ‘क्रूझ टूर’ आहे अशी समजूत काही प्राण्यांनी करून घेतली आहे. त्यामुळे मिसेस गोरिला मिस्टर गोरिलांना म्हणताहेत, ‘‘खरंच खूप मज्जा येईल. आपण दोघं.. क्रूझचा प्रवास.. छान सुट्टी.. फक्त पाऊस पडता कामा नये!’’ दुसऱ्या एका चित्रात- ‘‘आपण या क्रूझवर इतके दिवस आहोत. पण या कॅप्टनने कधीही आपल्याला जेवायलासुद्धा बोलावलं नाही!’’ अशा तक्रारी काही प्राणी करताना दाखवले आहेत. गलबतावर रांगेने चढणारे प्राणी पाहून जमिनीवर निवांत बसलेले सिंह आणि सिंहीण म्हणताहेत, ‘‘क्रूझवर डिनरचीही सोय आहे हे माहिती नव्हतं!’’

‘‘छोटे कीटक रात्री खूप आवाज करतात. त्यामुळे झोप येत नाही,’’ अशी लेखी तक्रार क्रूझवरचे प्राणी करतात असंही एका व्यंगचित्रात दाखवलंय.

युनिकॉर्नप्रमाणेच डायनासोर्सही काही टिकले नाहीत. याबाबत काही व्यंगचित्रकारांनी झकास कल्पनाविलास केलाय. दोन डायनासोर्स लांबवर जाणारे नोआचे गलबत पाहून हळहळत म्हणतात, ‘‘अरे बापरे, हे आजच निघणार होतं का?’’ एका व्यंगचित्रकाराने तर नोआचं हे गलबतच बुडताना दाखवलं आहे. त्यावर नोआचं वाक्य आहे- ‘‘आपण त्या सुतारपक्ष्याला घेऊन खरं तर चूकच केली.’’ एका चित्रात नौकेवर प्रवेश करताना एकटाच ससा- खरं तर मिसेस ससा दाखवलाय. आणि ती प्रवेश देणारी म्हणतेय, ‘‘अगं, तुझा नवरा मगाशीच त्याच्या पहिल्या बायकोला घेऊन गेलासुद्धा!’’ ससा या प्राण्याची प्रजा उत्पन्न करण्याची क्षमता आणि वेग प्रचंड आहे. यावर एका व्यंगचित्रकाराने मिष्कील भाष्य केलंय. चाळीस दिवसांनंतर पाऊस थांबला. इंद्रधनुष्य दिसलं आणि मुख्य म्हणजे जमीन दिसल्यावर गलबतातून सर्वात प्रथम शेकडो ससे बाहेर पडताना त्याने दाखवले आहेत.

काही मांसाहारी प्राण्यांनी जहाजावरच युनिकॉर्नची शिकार केल्यामुळे शेवटी मांसाहारी प्राण्यांची वेगळ्या डेकवर व्यवस्था केल्याचं नोआ जाहीर करतो अशी कल्पनाही एकाने चितारली आहे. संकटकाळातसुद्धा लबाड माणसं आपले शत्रू, शत्रुत्व, स्वार्थ विसरत नाहीत. त्यामुळे गॅरी लार्सन या अमेरिकन व्यंगचित्रकाराने एका चित्रात अशा माणसांचा स्वभाव प्राण्यांच्या रूपाने प्रकट केला आहे. दोन कुत्री आधीच जहाजावर पोहोचली आहेत आणि त्यानंतर आता  मांजरांची जोडी प्रवेश करणार आहे. त्यावेळी एक कुत्रा नोआला सावध करतो, ‘‘बघा, त्यांना प्रवेश देताय तुम्ही; पण त्यांची कागदपत्रं बनावट असण्याची शक्यता आहे. शिवाय ते फर्निचरवर ओरखडेही काढतात!’’

पण नोआ खरोखरच एवढा दयाळू होता का, याबद्दल एका व्यंगचित्रकाराच्या मनात शंका आहे. त्याचंच (भयंकर) चित्र त्याने रेखाटलं आहे. (‘पंच’ संग्रह. व्यंगचित्रकार एली) नौकेवर अल्फाबेटिकली प्रवेश देणार असं नोआने जाहीर केल्यावर झेब्य्राचा होणारा तिळपापड चित्रकार गॅरी लार्सन यांनी मस्त रेखाटला आहे. (‘दी कम्प्लीट फार साइड’ संग्रह) नोआ आणि त्याचे गलबत यावरच्या या असंख्य चित्रांतलं सर्वात अप्रतिम व्यंगचित्र म्हणजे नोआची बायको त्याला म्हणते, ‘‘तुला खरंच काय वाटतं, की हा पाऊस देवाने पाडलाय की ग्लोबल वॉìमगमुळे पडलाय?’’ यातून अगदी सपक वाटणाऱ्या कथेवरून व्यंगचित्रकार किती मार्मिक आणि प्रभावी भाष्य करू शकतो याची कल्पना येते.

पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचा संहार व्हायला खरं तर जगबुडीच व्हायला पाहिजे असं काही नाही. महावणवासुद्धा पुरेसा ठरू शकतो, हे ऑस्ट्रेलियात नुकत्याच लागलेल्या भयंकर आगीने दाखवून दिलं आहे. त्यात जवळपास शंभर कोटी प्राणी, कीटक, पक्षी वगैरे नष्ट झाल्याची बातमी आहे. त्यावरचं हे सोबतचं व्यंगचित्र!