मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९५५ साली मी प्रथमच ओ. पी. नय्यर (१९२६-२००७) यांचं एक गाणं ऐकलं. (यापुढे या महान संगीतकाराचा उल्लेख त्यांच्या ‘ओपी’ या लोकप्रिय नावाने केला जाईल.) ते गाणं म्हणजे गीता दत्त यांनी ‘मंगू’ या १९५४ सालच्या सिनेमासाठी गायलेलं ‘मन मोरे गा झूम के’ हे होतं. गाण्याची चाल आणि ठेका अतिशय वेगळा होता. त्याचबरोबर हे गाणं अतिशय प्रफुल्लित करणारं आणि भुरळ पाडणारं होतं. अशा तऱ्हेचं गाणं मी यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. याचा परिणाम म्हणजे मी ओपी यांच्या गाण्यांचा आजीवन फॅन झालो. हिंदी फिल्म संगीताच्या दोन पिढय़ांतील लाखो चाहत्यांना ज्या संगीतकाराने वेड लावलं होतं त्यांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग मला येईल असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. पण तो दिवस उजाडायला अर्धशतकाचा वेळ जावा लागला. आणि अखेर तो दिवस उजाडलाच. २००२ सालातल्या एका संध्याकाळी ठाण्यातील एका मध्यमवर्गीय घरात या माझ्या अत्यंत आवडत्या संगीतकाराच्या समोर मी बसलो होतो आणि त्यांच्याशी बोलत होतो. या लेखाचा विषय त्यांच्याशी झालेली माझी ही संस्मरणीय भेट हा आहे.
ही भेट कशी शक्य झाली?
तुम्हाला जर दोन-तीन गोष्टी मी आधी सांगितल्या नाहीत तर या सुरस भेटीचा काहीच आगापिछा तुम्हाला लागणार नाही. एक म्हणजे ही भेट हिंदी फिल्मजगतातले प्रसिद्ध पोर्ट्रेट फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्यामुळे शक्य झाली. गौतम हा माझा दोस्त होता. त्यानेच मला पाश्चात्य संगीतातील ‘ऑपेरा’ या कलाप्रकाराची ओळख करून दिली होती. गौतमच्या विनंतीवरूनच ओपी मला भेटायला राजी झाले होते. दुसरं म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे संबंध तुटून खूप र्वष झाली होती आणि ते ठाण्यातील नाखवा कुटुंबाच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. आणि तिसरं म्हणजे ओपींचा सांभाळ करणं तर सोडा; त्यांच्याशी जुळवून घेणं हीसुद्धा अतिशय कठीण गोष्ट होती. पण नाखवा कुटुंबीयांनी ते अतिशय आत्मीयतेनं केलं. इतकंच नव्हे तर त्यांना स्नेह आणि प्रेम दिलं. त्यांच्या उतारवयात त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब होती. नाखवा कुटुंब हे कोणत्याही साधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबासारखंच एक होतं. ते ओपींना ‘बाबूजी’ म्हणून संबोधत असे. त्यांची एकुलती एक मुलगी राणी ही ओपींना मुलीसारखीच होती. शिवाय ती त्यांची सेकेट्ररीदेखील होती. राणीने मला फोन करून सावधगिरीच्या आगाऊ सूचना देऊन ठेवल्या होत्या. तिने मला सांगितलं की, मला यायला एक-दोन मिनिटं जरी उशीर झाला तरी ओपी मला भेटायला नकार देतील. म्हणून मी आणि माझी पत्नी वनमाला आम्ही दोघे ठाण्यातील नाखवा यांच्या घरी सुमारे पंधरा मिनिटं आधीच पोहोचलो होतो. बरोब्बर पाच वाजता राणी आम्हाला ओपींना भेटायला घेऊन गेली.
ओपी हा म्हातारा सिंह लहानशा गुहेत राहत असला तरी अखेर सिंहच होता. या सिंहाला हे वर्णन तंतोतंत लागू होत असलं तरी १० ७ १२ च्या त्या लहानशा गुहावजा खोलीत त्यांचं असणं विचित्र वाटत होतं. ते त्यांच्या नेहमीच्या प्रसिद्ध वेषात होते. शुभ्र बटण डाऊन शर्ट, पांढरी फेल्ट हॅट, पांढरे बूट. जराशा कलत्या खुर्चीतदेखील ते एकदम ताठ बसले होते. आणि ७६ वर्षांच्या माणसासाठी हे लक्षणीय होतं. ओपी एखाद्या आर्ट स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसमोर पोर्ट्रेट काढण्यासाठी बसलेल्या एखाद्या मॉडेलसारखे दिसत होते. २ फूट ७ २ फूट अशा चौरस ग्लासटॉप असलेल्या टेबलावर होमिओपॅथी औषधांच्या ४०-५० कुप्या नीट ओळीने मांडून ठेवलेल्या होत्या. आणि हेवर्ड बियरचे असंख्य रिकामे खोटे नीट रचून ठेवले होते. ओपी रोज दुपारच्या जेवणाबरोबर बियर घेत असत हे मला माहीत होतं. आम्ही जेव्हा त्यांच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासमोर साठएक वर्षांचा एक माणूस अगोदरच बसलेला होता. तो एखाद्या सांगकाम्यासारखा दिसत होता आणि ओपी त्याला पंजाबीत यथेच्छ झोडपत होते. त्या माणसाने त्याला सांगितलेलं कुठलं तरी महत्त्वाचं काम केलं नसावं. तो माणूस फिल्म जगतातील प्रसिद्ध व्यक्तींच्या अवतीभवती घोटाळणाऱ्या माणसांपैकी असावा असं वाटत होतं. आणि बिचारा ओपींचा शाब्दिक मार मुकाटय़ाने सहन करत बसला होता.
‘तुमची कविता छान आहे. पण ती महान वगैरे निश्चित नाही. पण तरी मला ती आवडली.’ (ओपींची स्तुती करणारी एक कविता मी लिहिली होती आणि ती त्यांना अगोदरच पाठवून दिली होती. त्याबद्दल ते बोलत होते. तरी मी त्यांना आधीच सांगितलं होतं की, मी ‘किंचित कवी’ किंवा ‘हौशी कवी’ आहे.) पण त्यांना ती आवडली होती याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच कोणीतरी त्यांचं नाव भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक, शांतिदायी आणि प्रेरणादायी असलेल्या ‘ओम’शी जोडलं होतं. मी ओपींवर केलेली ती कविता अशी-
मुंबई
फेब्रुवारी २८, २००२
जनाब ओ. पी. नय्यर साहेब..
आदाब.
कल जिस कविता का मैंने जिक्र किया था वो पेशे खिदमत है.
दास्तां एक खूबसूरत नामकरण की
हमने कई नयनसुखों को
सूरदास होते देखा है
चंद हरिश्चंद्रों को
जेल की सलाखों के पीछे पाया है
खरगोशों से डरनेवाले
कुछ हनुमानप्रशाद भी देखने को मिले
ओपीजी, आप के माता-पिता की
दूरंदेशी की दाद देनी होगी
जिन्हो ने अपने लाडले का नाम
ओंकारप्रशाद रखा
क्यों कि उनके सपूत ने जिंदगीभर
ॐ की इबादत तो की ही
और उसका प्रशाद भी प्यार से
बाटता चला गया
खुदा तेरा लाख लाख शुक्र
खुशनसीब है मुझ जैसे बंदे
जिन को यह प्रशाद नसीब हुआ
आपका खरमंद..
मनोहर पारनेरकर
‘प्रीतम आन मिलो’ या गाण्याच्या उत्पत्तीबद्दल गंमत म्हणून मी ओपींना प्रश्न विचारला. सरोज मोहिनी नय्यर (त्यांच्या पत्नीचे नाव) यांनी लिहिलेल्या ‘प्रीतम आन मिलो’ या कवितेबद्दल त्यांचं काय मत आहे? या गाण्याला त्यांनी १९५० च्या सुमारास चाल लावली होती आणि ते प्रथम खासगीरीत्या सी. एच. आत्मा यांनी गायलं होतं. आणि नंतर गुरुदत्त यांच्या १९५५ सालच्या ‘मिस्टर अॅन्ड मिसेस ५५’ या सिनेमासाठी गीता दत्त यांनी ते गायलं आहे. त्यांचं उत्तर अगदी तथ्याधारित होतं. ते म्हणाले की, ‘ते खूपच छान होतं असं मी म्हणेन. दोन नय्यरांचा एकत्रित प्रयत्न होता तो. त्या काळात हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं. विशेषकरून तरुण प्रेमीजनांमध्ये.’
पण या प्रश्नामुळे मी बहुधा ओपींची दुखरी नस दाबली की काय असं मला वाटलं. त्यांना काय झालं, ते मला कळलं नाही. पण अचानक ते माझ्या पत्नीकडे वळून म्हणाले, ‘‘मिसेस पार्लेकर, (महाराष्ट्रीय नसलेली माणसं क्वचितच आमचं आडनाव योग्य रीतीने उच्चारतात.) तुम्हाला माहीत आहे की नाही ते मला माहीत नाही. पण काही वर्षांपूर्वी ‘मेरी बीबी-बच्चों ने मुझे मेरे ही घर से बाहर निकाल दिया. आप विश्वास नहीं करोगी, लेकिन वो मेरा घर किसी फाइव्ह स्टार हॉटेल से कम नहीं था.’
नंतर ओपी जरा भावनाविवश झाले आणि ‘लाहोर माफिया’च्या आठवणींबद्दल बोलू लागले. फाळणीनंतर भारतात आलो आणि नंतरची काही र्वष बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीवर त्याने वर्चस्व कसं प्रस्थापित केलं याबद्दल ते भरभरून बोलत होते.
त्यावेळी मुंबईत ज्या दोन व्यक्तींशी ते संपर्कात होते त्या म्हणजे शमशाद बेगम आणि ‘सारेगम’ (झी टीव्ही) फेम गजेंद्र सिंग.
आणि अचानक काहीही कल्पना नसताना ओपी लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलू लागले.
‘लता मंगेशकर यांचा आवाज दैवी आहे.’ ते म्हणाले.
‘ओपी असं म्हणाले, असं तुम्ही प्रेसवाले लिहाल का?’ अचानक तारस्वरात त्यांनी मला प्रश्न केला. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो, की अहो, मी प्रेसवाला नाहीये. तरीही ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘नाही, तुम्ही कधीच छापणार नाही ते. कारण इट वोन्ट मेक अ गुड कॉपी.’ मग ते म्हणाले की, ‘आम्ही एकत्र काम केलं नाही याची दोन कारणं आहेत. ती म्हणजे बोथ ऑफ अस वेअर इनकॉम्पॅटिबल.. टेम्परामेंटली, स्टाईलवाइज अँड अदरवाइज.’ आणि मग शेवटी ते म्हणाले, ‘मैं लता की बहोत इज्जत करता हूँ और शायद वो भी ये बात जानती होगी.’
मी ओपींसाठी एक सुंदर भेटवस्तू नेली होती. ते एक पेंटिंग होतं. त्याचं नाव ‘The Bassoon Player’ असं होतं. अर्थात ती मूळ पेंटिंगची प्रतिकृती होती. (Bassoon हे एक सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवलं जाणारं एक वाद्य आहे.) मूळ चित्र एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध इम्प्रेशनिस्ट चित्रकार एडार्ड देगा याचं होतं. ही भेट ओपींना आवडेल असं मला वाटलं होतं. पण माझा अंदाज सपशेल चुकला. कारण त्यांनी ते पेंटिंग पाहिलं- न पाहिल्यासारखं करून क्षणाचाही विचार न करता जवळ बसलेल्या खूशमस्कऱ्याला देऊन टाकलं. या त्यांच्या कृत्याने मला वाईट वाटलं आणि खरं सांगायचं झालं तर मला रागही आला. माझं समाधान करण्यासाठी ओपी मला म्हणाले, ‘‘पार्लेकर, मी हे तुमचं पेंटिंग घेऊन काय करू? कारण मी तर सदैव साक्षात माझ्या कृष्णकन्हैय्याच्या संगतीत असतो.’’असं म्हणत त्यांनी खोलीतील समोरच्या भिंतीवर काढलेल्या एका मोठय़ा चित्राकडे बोट दाखवलं. चित्रात गडद निळ्या रंगातील बालक कृष्णकन्हैय्या मोठय़ा लोण्याच्या गोळ्यांशी खेळताना दाखवलेला होता आणि यशोदामय्या आपल्या लाडक्या बालकाकडे प्रेमाद्र्र नजरेने पाहत होती. (ते चित्र रघुवीर मूळगावकर किंवा जे. बी. सिंगल स्कूलच्या चित्रकाराने काढलेलं असावं. कारण ती कॅलेंडर आर्टची वाईट प्रतिकृती होती.)
ओपींनी नंतर त्यांच्या टेबलाचा एक खण उघडला आणि त्यातून लंगडय़ा बाळकृष्णाची पंचधातूची एक चिमुकली मूर्ती काढून मला दाखवली आणि नंतर स्वत:च्या डोक्याला लावली. ही मूर्ती आमच्या दोघांचा मित्र गौतम राजाध्यक्षने ओपींना भेट म्हणून दिली होती. सगळं वातावरण इतकं कन्हैय्यामय झालं की मीसुद्धा मनातल्या मनात ओपींचं ‘हम साया’ चित्रपटातलं ‘ओ कन्हैय्या, कन्हैय्या’ हे गीत गुणगुणायला लागलो.
(पूर्वार्ध)
शब्दांकन : आनंद थत्ते