दा. गो. काळे
जी. के. ऐनापुरे मराठी साहित्यातील समकालीन वास्तवातील सल आणि उकल करणारे महत्त्वाचे कादंबरीकार . ‘ओस निळा एकांत’ या कादंबरीने कादंबरीकार काय काम करीत असतो याचा प्रत्यय आणून दिला आहे. ही कादंबरी म्हणजे कौटुंबिक व्यवस्थेचा चौकोनी चरित्रपट नाही. व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या विचारधारणांची तौलनिक अशा पद्धतीने मांडलेली सारणी आहे. त्यात विशिष्ट अशा समाजजाणिवांचे वास्तव अधोरेखित होत असले तरी त्याच्या त्रिज्या सभोवतालच्या घटितांना छेद देऊन जातात. जेव्हा एखादा सामाजिक घटक शोषणाच्या वेगवेगळ्या अतिरचनांना ओलांडून स्वतंत्रपणे जगण्याच्या कक्षेत येतो, तेव्हा त्यांच्या अस्तित्वासाठीची लढाई महान असते. परंतु स्वतंत्र अस्तित्वासाठीचा क्रायसिस तेथेच थांबत नाही. त्यात निर्माण होणारी वर्गजाणीव आपल्या असतेपणाचा भूतकाळ विसरत जाते. स्वातंत्र्य हीच एक फसवी बाजू आहे. कारण त्याला जोडून येणाऱ्या समता आणि बंधुभावाच्या संकल्पना विसरून होणारे क्षरण पुन्हा शोषणाच्या वाटांकडे जाणारे असते. कारण कोणत्याही धर्माच्या सांस्कृतिकतेत प्रबोधनासाठी प्रलोभनांचे प्रयोजन असते ही गोष्ट विसरता येत नाही. त्या वर्गजाणिवांना कुरवाळणाऱ्या समाजस्वास्थ्याची ही उकल आहे; ती ‘ओस निळा एकांत’ या सूचक अशा शीर्षकातून समोर ठेवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा