‘लोकरंग’ (११ ऑगस्ट) मधील ‘झाकून गेलेलं’ हा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख आवडला. सहलीच्या एका फेरीत स्वित्झर्लंड जसे दिसले तसे त्यांनी ते लिहिले आहे, असे सहजपणे जाणवते. स्वित्झर्लंडच्या स्वर्गीय सौंदर्यांबद्दल अनेकांनी लिहिले आहे. खासगी कंपन्यांतून सैर करून येणारे प्रवासी तर भारावून जाऊन अमाप स्तुती करतात. पण स्वतंत्रपणे सहलीला गेलेल्या जावडेकरांनी निसर्ग पाहिला तसेच माणसांची संस्कृतीही त्यांच्याकडून आपोआप टिपली. त्या अनुषंगाने हा लेख लिहिला, हे फार महत्त्वाचे आहे. उगीच खोल निरीक्षणाचा किंवा अभ्यासाचा आव आणलेला नाही. स्वदेश आणि या परदेशाची आवेशाने तुलनाही केली नाही. त्यामुळे हा लेख वाचकांना जरा विचारप्रवृत्त करणारा, अंतर्मुख करणारा आहे. प्रगत युरोपमधल्या प्रगत स्वित्झर्लंडमधल्या स्विस स्त्रियांना १९७१मध्ये मताधिकार मिळाला हे वाचून मी थक्क झाले. -विनया खडपेकर, पुणे

पर्यटनाच्या दोन्ही बाजू मांडल्या

‘लोकरंग’ (११ ऑगस्ट) मधील ‘झाकून गेलेलं’ हा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख वाचला. लेखकाने गप्प न बसता आणि कुठलाही न्यूनगंड न बाळगता स्वत:चे अनुभव मांडले आहेत. कारण नेहमी आम्हाला युरोपबद्दल चांगलेच वाचायला मिळते. पण या लेखामुळे पर्यटक सावध होतील. कारण प्रत्येकाला लेखकासारखी संयत प्रतिक्रिया देणे जमेलच असे नाही. कारण कोणालाही कुटुंबासमोर झालेला आपमान सहन होत नाही. पण भारतीयांनीदेखील परदेशात फिरताना आपण आपल्या देशाचे आणि संपूर्ण भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत आहोत याचे भान बाळगले पाहिजे, अन्यथा इतरांच्या बेशिस्त वर्तनाने आपल्यानंतर येणाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपला देश सगळ्याच बाबतीत उत्तम प्रगती करत नाही तोपर्यंत इतरांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे सोपे नाही. पर्यटनाच्या दोन्ही बाजू लेखकाने मांडल्यामुळे लेखकाचे आभार. -सिद्धार्थ पाथरे

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Navri Mile Hitlarla
“दोघांचं भांडण…”, अनोळखी मन्याच्या ‘त्या’ कृतीमुळे लीला-एजेमध्ये येणार दुरावा? नेटकरी म्हणाले, “ट्विस्ट छान आहेत; पण…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

बरेवाईट अनुभव येतातच

‘लोकरंग’ (११ ऑगस्ट) मधील ‘झाकून गेलेलं’ हा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख वाचला. लेखकाचे प्रामाणिक मत कळले आणि त्याचा शेवटपण एकदम छान वाटला. मी दीर्घकाळ भारताबाहेर होते. अनेक देशांचा प्रवास केला. कुठेही गेलो तरी बरेवाईट अनुभव येत असतातच! यालाच जीवन ऐसे नाव! खरं तर असे अनुभव घेण्यातही एक मजा आहे. तरीसुद्धा एक प्रामाणिकपणे माझे मत मांडते, भारतीय जनतेत बेशिस्त, अप्रामाणिकपणा, बेजबाबदारी, वेळेचे बंधन नसणे, मोठ्या आवाजात बोलणे या गोष्टी प्रकर्षाने अनुभवास येतात. पण अनेक चांगले गुणही आहेत. त्याबद्दल आवर्जून उल्लेख करायची गरज नाही. पण लेखाची मांडणी आणि भाषा छान आहे. -अनिता बिनीवाले

त्या प्रसंगाची आता खूण पटली

‘लोकरंग’ (११ ऑगस्ट) मधील ‘झाकून गेलेलं’ हा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख वाचला. लेखकाचा पर्यटनाचा अनुभव वाचून एक आठवण झाली. मी २०१५ साली एका टुरिस्ट कंपनीबरोबर पॅरिस व झुरिक पाहण्यासाठी गेलो होतो. स्विसमधील एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. एक मदतनीस बाई लिफ्टमधून आमचे सामान वरच्या मजल्यावर नेत होत्या. मी मिलिटरीच्या सवयीप्रमाणे त्यांना म्हणालो, ‘माझे सामान मी नेतो.’ पण त्या बाई चक्क माझ्यावर खेकसल्या आणि ‘हे माझे काम आहे’ असे म्हणाल्या. पण हा लेख वाचून त्या बाई माझ्यावर का खेकसल्या हे कळलं. माझे एक मित्र नुकतेच कॅनडाहूप आले. ते एका बस स्टॉपवर रांगेत उभे होते. तिथल्या एक बाई मागून येऊन सरळ त्यांच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या. अर्थात त्याचे हेच कारण होते. -भरत केतकर

मुलांना निसर्गाचा आनंद घेऊ द्या

‘लोकरंग’ (११ ऑगस्ट) मधील ‘बालमैफल’ सदरातील ‘शेताची सफर’ ही गोष्ट वाचली. अशा कथा बालकांना एका वास्तववादी आयुष्यात नेण्यात मदत करतात. पावसाळा आला की निसर्ग हिरवागार होतो. नद्या, ओढे भरून वाहतात. पक्षी मधुर किलबिलाट करतात. पण या पावसाळ्यात दोन लहान मुलांसाठी हा काळ खूप वेगळा होता. आजच्या काळात मुले मोबाइल आणि टीव्हीच्या दुनियेत खूप बुडून गेलेली आहेत. त्यांना नैसर्गिक सौंदर्य आणि शेतीची मज्जा काय असते हे कळत नाही. पण रोहन आणि चिंगीच्या बाबांनी त्यांना ही मज्जा घेण्याची संधी दिली. यामुळे त्यांना निसर्गाबद्दल प्रेम निर्माण झाले. शिवाय शेतीच्या कामात हातभार लावून त्यांना स्वत:च्या हाताची मेहनत कशी असते हे समजले. आजच्या धकाधकीच्या जगात आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यांच्यासोबत खेळायला जाऊ शकत नाही. पण या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की, आपल्या मुलांना आपल्यासोबत थोडा वेळ घालवायला काढला तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठं समाधान दिसून येईल. आपल्या मुलांना निसर्ग आणि शेतीशी जोडून आपण त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो. शेवटी एवढेच म्हणायचे आहे की, आपल्या मुलांना निसर्गात घेऊन जाऊ या. त्यांना शेतीचा किंवा निसर्गाचा आनंद घेऊ देऊ या. कारण निसर्ग हाच आपल्या मुलांचा खरा मित्र आहे. -अजित लक्ष्मणराव तरवटे, परभणी.

Story img Loader