‘लोकरंग’ (४ ऑगस्ट) मध्ये दासू वैद्य यांनी ‘एकनिष्ठ वाङ्मय अभ्यासक’ या लेखात ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे रेखाटलेले शब्दचित्र वाचले. रसाळ सरांची आशयघन व्याख्याने, त्यामध्ये जाणवणारा व्यासंग, संदर्भबहुलता, मुद्देसूदपणा, विश्लेषण पद्धत हे मी इतिहासाचा विद्यार्थी असलो तरी प्रत्यक्ष त्यांच्या तासाला उपस्थित राहून अनुभवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्या विषयावर अध्यापन करताना अथवा बोलताना तर्कशुद्ध व संतुलित मांडणी करणे, त्या संदर्भात सर्व शक्यता समोर ठेवणे, एखाद्या मतप्रवाहाच्या अहारी न जाणे, आपल्या मताचा दुराग्रह न धरणे, कोणताही आविर्भाव नसणे, उच्चार व विचार यामधील ठामपणा या रसाळसरांच्या बाबतीत विद्यार्थी असलेल्या लेखकाने केलेल्या नोंदीआजच्या ‘झटपट प्रोफेसर’ पिढीला अत्यंत मार्गदर्शक आहेत.
रसाळसरांचा वर्ग म्हणजे एक प्रकारचा सत्संग असायचा. त्यांच्या बरोबर विद्यार्थी म्हणून जोडलं जाणं हे भागधेय होय, भेट झाली तर आत्मीयतेने बोलत, सरांचे बोलणे म्हणजे समीकरण मांडल्यासारखे, तसेच एखाद्या धार्मिक माणसाने ईशचिंतन करताना जपमाळ ओढावी त्याच आस्थेने रसाळसर वाङ्मय चिंतन करीत; हे चपखल वर्णन खूप आवडले. अशा वाङ्मय अभ्यासक असलेल्या बहुश्रुत अध्यापकाचे त्यांच्याच कवी-विद्यार्थी- प्राध्यापक असलेल्या लेखकाने तितक्याच रसाळपणे केलेले ‘रसाळ शब्दचित्र’ मनाला भावले. -प्रा. श्रीनिवास सातभाई, अमरावती</strong>
विज्ञान साक्षरतेसाठी उपयुक्त कथा
‘लोकरंग’मधील ‘बालमैफल’ सदरातील ‘अपोफिस’ ही कथा वाचली. अशा कथा मुलांमध्ये कुतूहल जागृत करून विज्ञान विषयाची गोडी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा कथांमुळे प्रौढांमध्येही विज्ञान साक्षरता येते. ‘अपोफिस’ हे नाव प्राचीन इजिप्तच्या पौराणिक कथेतील राक्षसी सर्पावरून ठेवण्यात आले आहे. हा सर्प सूर्याचा शत्रू आहे अशी त्यात कल्पना केली आहे. अपोफिसचा शोध लावला तेव्हा पृथ्वीसाठी धोकादायक लघुग्रहांत त्याची गणना करण्यात आली होती. परंतु नंतरच्या निरीक्षण अभ्यासात तो पुढच्या शंभर वर्षांत तरी पृथ्वीवर काही परिणाम करण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आले. १३ एप्रिल २०२९ ला अपोफिस पृथ्वीपासून ३१८६० किलोमीटर इतक्या जवळून जाणार आहे. त्या वेळी युरोप, अफ्रिका व पश्चिम अशियाच्या काही भागांतून दुर्बिणीशिवाय तो पाहता येऊ शकेल. -नरेंद्र दाभाडे
व्यंगचित्रकलेचे भवितव्य कठीण
‘लोकरंग’ (२८ जुलै)च्या अंकातील ‘फडणीसांची सुंदर ती दुसरी दुनिया’ हा शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रकलेवरील प्रशांत कुलकर्णी यांच्या लेखाच्या अनुरोधाने ही कला बहरत का नाही आणि नवे आश्वासक व्यंगचित्रकार हल्ली दिसत का नाहीत, याची पुढील कारणे सहज आणि स्पष्ट दिसतात.
१ ) या कलेत फक्त छंद जोपासला जातो, पैसा नाही म्हणूनच भवितव्य नाही. आजच्या पिढीला आयटी क्षेत्राने इतका पैसा दाखविला आहे की तरुण पिढी लाखाच्या घरात पगार असेल असेच क्षेत्र निवडते. त्यामुळे व्यंगचित्र या क्षेत्रात करिअर होऊ शकत नाही.
२) व्यंगचित्र काढण्यासाठी उत्तम नव्हे तर निदान बऱ्यापैकी चित्र काढता येणे आवश्यक आहे. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे मिश्कील चष्म्यातून बघण्याची दृष्टी हवी.
३) सध्या समाज इतका संवेदनशील झाला आहे की, एखादे अतिशय इनोसंट चित्र किंवा कल्पनेने कोणाच्या भावना दुखावल्या जातील याचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे मार खाण्यापेक्षा व्यंगचित्रांच्या नादी न लागणे उत्तम असा विचार चित्रकार करतो. त्यात चूक नाही.
४) इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जवळपास सर्वांची मुले जात असल्याने त्यांचे मराठी वाचन नाही. त्यामुळे व्यंगचित्रांचा जो मोठा आधार म्हणजे दिवाळी अंक तो पाहिलाच जात नाही. ते वर्तमानपत्रही क्वचितच वाचतात, त्यामुळे नवीन पिढीला व्यंगचित्र ही कलाच पाहायला मिळत नाही. आपल्याला पुन्हा शि. द. फडणीस, वसंत सरवटे, प्रभाकर ठोकळ, श्याम जोशी, ज्ञानेश सोनार इत्यादींचा जमाना यावा असे वाटत असेल तर ३०/४० वर्षांपूर्वीचे वातावरण येणे आवश्यक आहे- जे अशक्य आहे. सबब व्यंगचित्रकलेचे भवितव्य कठीण आहे. -दीपक ओढेकर, नाशिक
सुंदर व सात्त्विक दुनिया
‘लोकरंग’मधील (२८ जुलै) प्रशांत कुलकर्णी यांचा ‘फडणीसांची सुंदर ती दुसरी दुनिया’ हा लेख वाचला. समोरचं समाधानकारक नसलेलं वास्तव आणि त्याचा फार त्रागा न करणाऱ्या समाज-शिनवटयांस आपल्या रेखीय-स्मितकारीने नमवून सामान्यांची मने जिंकणारा कलाकार अशी शि. द. फडणीसांची ओळख आपणा सर्वांना आहे. कधी देवळात गेल्यावर हमखास वहाणा जाण्याची खात्री असलेल्या फडणीस-भक्ताने परमेश्वरांस उंबऱ्यातूनच साष्टांग घालताना त्या पायांतच राहतील याची घेतलेली सृजन-काळजी असो. किंवा अशा अनेक प्रसंगांत सामान्यजनांनी तल्लीनतेची वरची पातळी गाठल्यावर शिदंच्या रेखांनी हास्यसागराचा तळ गाठून शोधलेले विस्मयमोती असोत, त्यातील सोपेपणा कधीच आटला नाही. चित्रांमधून बोलणं या एकाच अटींवर धावत्या -दगदगी जीवन वाटेवर, शॉक-ऑब्सव्र्हरचं काम करणाऱ्या शिदंच्या चिंत्रांनी ‘प्रवास सुखाचा होवो’ अशी साथसंगत नेहमीच केली. आता ही हातातल्या जादूगिरीने साधलेली किमया? म्हणावं तर ते अगदीच उथळ होईल. कारण हा उथळपणा करण्यास हल्लीची ( अक) कत्रिम बुद्धिमत्ता बाह्या सरसावून उभी आहेच. भोवतालच्या पसाऱ्यातून नेमके मर्म टिपणारी उच्चकोटीची संवेदनशील-तल्लखता असल्याशिवाय फडणीसांची ती दुसरी दुनिया अधिक सुंदर व सात्त्विक झालीच नसती! -विजय भोसले, नवी मुंबई.
विज्ञानकथेचा पैस अधिक विस्तारावा
‘लोकरंग’मधील (१४ जुलै) सुबोध जावडेकर यांचा ‘मराठी विज्ञानकथेचा पैस’ हा चर्चात्मक लेख वाचला. या लेखातून विज्ञानकथेचा इतिहास आणि वर्तमानातली रंजक माहिती मिळाली. मराठी साहित्यात नवीन प्रयोगांना दिवाळी अंकांचे उत्तम व्यासपीठ आहे. दरवर्षीच्या दिवाळी अंकातील विज्ञानकथांचे पॅटर्न पाहिल्यावर सर्वसामान्य वाचकांनाही वर्षभरात विज्ञान क्षेत्रातील नवीन घडामोडींची तोंडओळख होते. अशा कथांद्वारे कृत्रिम प्रज्ञा, जेनेटिक्स, पर्यावरण, सोशल मीडिया अवतार वगैरे नवीन घडामोडी विज्ञान क्षेत्रात घडत असल्या तरी त्यांचा व्यक्ती किंवा समाजावर काय परिणाम होईल, सार्वजनिक जीवनात काय बदल घडू शकतील यांचाही ऊहापोह केलेला असतो. म्हणूनच पाठयपुस्तकांत किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात विज्ञानकथांचाही अधिकाधिक समावेश व्हायला हवा. विज्ञानाची गोळी साखरेचे कोटिंग लावून देणे किंवा विज्ञानाच्या संकल्पनांवर काल्पनिक कलानिर्मिती यापलीकडे जाऊन विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या प्रसारामुळे काय बरेवाईट परिणाम झाले किंवा होऊ शकतील यावर भर दिला, तर तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांना सामोरे जायला मदत होईलच. विज्ञानाच्या अंगाने जात असलेल्या गूढकथा हासुद्धा एक स्वतंत्र विषय आहे. हा पैस अधिक वाढवण्यासाठी मराठी विज्ञानकथांवर चित्रपट किंवा वेबसीरिज निर्मिती झाली तर अधिक मोठया वर्गापर्यंत पोहोचवता येईल असेही वाटते. -नकुल संजय चुरी, विरार