‘लोकरंग’ (२१ जानेवारी) मधील ‘आठवणींचा सराफा’ या सदरातील स्वानंद किरकिरे यांचा ‘बास.. बाबा गोरे’ हा लेख वाचला. या लेखात अतिशय सुंदर असे व्यक्तिचित्रण वाचायला मिळाले. बाबा गोरेंच्या लकबी, त्यांची ‘बास’ म्हणण्याची पद्धत, तसेच बाबाच्या हातातल्या वेगवेगळय़ा डिझाइन्सच्या लायटर विषयींचे उल्लेख या लेखात मजेशीरपणे आलेले आहेत. इन्दौरमध्ये रात्री दुकानाबाहेर मोठमोठय़ा कढया अजूनही लागतात, अन् लोक ग्लास दर ग्लास गरम दूध पिऊन जगतात. हे वाक्य खरोखरच इन्दौरच्या लोकांची खासियत आहे. हा लेख वाचताना पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील पात्रे जशी जिवंत होऊन आपल्या समोर उभी राहतात, तसेच स्वानंद किरकिरे यांनी बाबा गोरे जिवंत केला आहे. – विजय गजानन साळुंखे, मुंबई.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा