अरुंधती देवस्थळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फ्रेंच पोस्ट-इम्प्रेशनिस्ट चित्रकारांच्या पिढीत महत्त्वाचं नाव असलेल्या पॉल गोगांची चित्रं म्हणजे मातीससारखाच गडद रंगांचा जल्लोष, विरोधी रंगांचा वापर आणि व्यवस्थित साधलेला समतोल; पण आकृतीचं प्रमाणाबाहेर मोठं असणं ही त्यांची पहेचान. पेरूत बालपण गेल्याने तिथल्या वातावरणातल्या प्रतिमा त्यांच्या चित्रांत कायम डोकावत राहिल्या. ब्रिटनीमधल्या वास्तव्यानं ब्रेतोंच्या आदिवासींचे रंग त्यांना येऊन मिळाले. पॉलिनेशियाच्या त्यांच्या वास्तव्यानंतर त्यात आदिम रांगडेपण येऊन मिसळलं. वेगवेगळ्या निसर्गरूपांनी दिलेली समृद्धी तुम्हा-आम्हासाठी गोगांनी सुंदर चित्रांतून पोहोचती केली. पण या मनस्वी कलाकाराचं चीज झालेलं त्यांना हयातीत अनुभवायला मिळू नये, हे दुर्दैव!
जन्मापासूनच गोगांना (१८४८-१९०३) प्रतिकूलतेशी झगडावं लागलं. तो काळ फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या सरकारविरुद्ध जनतेच्या रक्तरंजित चकमकींचा होता. आजूबाजूच्या िहसक दहशतीचा परिणाम त्यांच्या बालमनावर होणं अपरिहार्य होतं. त्यात वडील निर्भयपणे संघर्षांत उतरलेले पत्रकार आणि आईही स्वातंत्र्याची पुरस्कर्ती. त्यामुळे हे कुटुंब कायम अस्थिरतेच्या सावटाखाली. आईचं माहेर पेरूचं. कुलीन श्रीमंतीचं. तिचे वडील सैन्यात अधिकारी. त्यामुळे दोन्ही संस्कृतींचे संस्कार त्यांच्या संवेदनशीलतेवर झाले होते. ‘मी मिश्रवर्णीय आहे,’ असं ते अभिमानाने सांगत. कुटुंब लिमाला हलतानाच वडील वारले. आईच्या माहेरी एक वेगळंच आयुष्य होतं. तबियतीने लिमा आज आहे त्यापेक्षा वेगळं नसावं. तीच श्रीमंत आणि गरीबांतली तफावत आणि विभिन्न संस्कृतींची भेसळ आणि तिथले रंगीबेरंगी मस्तीखोर जोषाचे कार्निव्हल्स! तिथला निळाशार समुद्र, उग्र सुवासाची फुलं आणि रापलेले डोंगर त्यांच्या चित्रांचे अंग बनून राहणार होते. फ्रान्स जरा शांत होताच हे कुटुंब पॅरिसला परतलं.
शालेय शिक्षणानंतर गोगा जलसेनेत भरती झाले. काही वर्षांनी परतून पॅरिसच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये ब्रोकरची नोकरी सुरू केली, पण त्यात मन रमेना. वेळ मोकळा मिळताच ते चित्रं काढत, रंगवत बसत. ती अस्वस्थता चित्रकलेसाठीची होती. आपला आनंद चित्रं काढण्यातच आहे हे एव्हाना त्यांना उमगायला लागलं होतं. लग्न केलं, पण संसारात मन रमेना. काही कलाकारांशी मैत्री, लूव्र आणि पॅलेस दू लक्झेम्बर्ग पाहिल्यानंतर आपण आयुष्याची दिशा बदलून कलाप्रांतात जायला हवं, हे त्यांनी ठरवलं. सुरुवातीला संगमरवरात शिल्प करायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. मॉडेल होती मूळची डॅनिश असलेली बायको- मेत्ते. चित्रकला विषय आवडीचा असल्याने ते पाहत पाहत शिकत गेले. आधीच्या पिढीतल्या मॅने वगैरे इम्प्रेशनिस्ट मंडळींचं काम त्यांना आवडायचं. पण आपली दृष्टी आणि अभिव्यक्ती वेगळ्या दिशेने जाणाऱ्या आहेत हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. आपण चांगली नोकरी सोडून चित्रं काढणार असं त्यांनी जाहीर केलं तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना वेडय़ातच काढून त्यांच्याशी संबंध तोडले. चाळिशीत पोहोचलेल्या, पाच मुलांचा बाप असलेल्या गोगांना कलेच्या क्षेत्रात प्रवेशाला उशीरच झाला होता. त्यातून मॅने, सेझाँसारख्यांची चित्रं विकत घेण्याच्या त्यांच्या महागडय़ा छंदामुळे आर्थिक ताळमेळ जमणं कठीणच. गोगांची ‘न्यूड स्टडी’ (ऑइल ऑन कॅनव्हास ११४ ७ ८० सें. मी.- १८८०) आदी काही चित्रं पाहून मॅने, देगा, पिसारो, रेन्वा आणि सेझाँ या इम्प्रेशनिस्टस् कोंडाळ्यात त्यांची ऊठबस सुरू झाली होती. तो काळ पॅरिसमध्ये नव्या प्रतिभांचा आणि त्यांच्या आपसातल्या आणि समीक्षकांच्या भांडणांचा होता. गोगांवर स्वत:च्या कामापेक्षा अनुकरणाचे आरोप झाले.. तेसुद्धा त्यांच्या लाडक्या सेझाँकडून. त्यांची मुलालाच मॉडेल बनवून केलेली ‘स्लीिपग चाइल्ड’ (ऑइल ऑन कॅनव्हास ४६ ७ ५६ सें मी.- १८८४) सारखी चित्रं अधूनमधून आस्वादात्मक चर्चेचा विषय बनत होती. निद्रिस्त, निष्पाप चेहऱ्यावरचा प्रकाशाचा खेळ, झोपेची निळाई, त्यात अर्धा मासा, अर्धा पक्षी आणि चित्राला वेढून उरणारी रंगांची उत्कटता वगैरे. पण चित्रं विकत नव्हती आणि संसाराची घडी विस्कटली होती.
गोगांनी पॉन्ट आवेन या नदीकाठी असलेल्या रम्य खेडय़ाबद्दल चित्रकार मित्रांकडून ऐकलं होतं. काव्यमयता इतकी, की तिथे बौ द आमूर (प्रेमाचं वन) नावाचं भलंथोरलं, पायवाटांनी भरलेलं जंगल होतं. गोगांना इथे चित्रं काढण्यासाठी जे मानसिक स्थैर्य हवं होतं ते मिळालं. इथलं साधंसं लोकजीवन आणि लोककला त्यांच्या स्वभावाशी मिळत्याजुळत्या. ‘दी यलो ख्राइस्ट’ हे त्यांचं अतिशय नावाजलं गेलेलं तैलचित्र (९१ ७ ७३ सें. मी.- १८८९) याच काळातलं. पीतवर्णीय ख्रिस्ताचं उघडय़ावर केलेलं क्रूसिफिकेशन, गहिरे रंग. सुटे, समांतर फटकारे. पिवळे-हिरवे माळ, लाल झाडं, सावळ्याशा, पारंपरिक वेशातल्या बॉनेटधारी खेडवळ बायका, मागे निळं, पांढरं स्वच्छ आभाळ. इम्प्रेशनिस्ट शैलीचा जाणवणारा प्रभाव. ब्रेतोंच्या साधेपणाला साजेशी रचना, सपाट प्लेन्स, गडद व थेट बोलणारे रंग यांतून साधलेला परिणाम म्हणजे हे चित्र. अंतर राखून पकडलेला/ रंगवलेला क्षण नव्हे; ते एक प्रतीक आहे साध्याभोळ्या श्रद्धेचं! ‘पिवळसर ख्रिस्ताचं काय प्रयोजन?’ असा प्रश्न पूर्वीही विचारला गेलाय. जवळच्या अनेक छोटय़ा चर्चेसपैकी काहींमध्ये संतांच्या रंगीत लाकडी प्रतिमा पाहून गोगांनी हा रंग निवडला असावा. तो पुढे काही ताहितीच्या मनुष्याकृतींतही भेटतो.. अगदी तसाच. आता हे चित्र बफेलोच्या कलासंग्रहालयात आहे.
गोगां इथे वारंवार येत राहिले. त्या काळात चित्रकार वेगवेगळ्या निसर्गसुंदर ठिकाणी जाऊन राहत व चित्रे काढत. नंतर गोगां पनामाहून मार्टिनिकला गेले. तिथे कॅरीबिअनच्या चमचमत्या हिरव्या, निळ्या किनाऱ्याने आणि संत्री आणि िलबांच्या बागांनी गोगांच्या पॅलेटमध्ये रसरशीत रंग भरले, ते आयुष्यभरासाठी! ‘मार्टिनिक लँडस्केप’(किमग्ज अँड गोइंग्ज) हे सुंदर हिरवंगार चित्र (७३ ७ ९२ सें. मी. ऑइल ऑन कॅनव्हास- १८८७) इथलंच. बागांमध्ये काम करणाऱ्या गावरान बायका, शेतीभोवती फिरणारं जीवन, त्यात बकऱ्या-मेंढय़ांचा आनंदी संचार! पण इथे गोगां आजारी पडले. कसेबसे पॅरिसला परतले. तोवर आवां-गार्द चित्रकार म्हणून त्यांचं नाव होऊ लागलं होतं. कॅफे दू तांबोरीनमधल्या कलाकारांच्या घोळक्यात वान गॉगशी मैत्र जमलं. दोघेही कफल्लक. अव्यवहारी. कलेवर जीव ओवाळून टाकणारे. आणि समोर जे सौंदर्य दिसतंय त्यावर न थांबता त्याच्याभोवतालच्या भावना आणि कल्पनांचा वेध घेणारे. दोघांनी काही काळ वान गॉगच्या आल्झमध्ये एकत्र राहून निसर्ग आणि एकमेकांची चित्रं काढली होती. वान गॉग सरळ निसर्गाकडे पाहत रंगवणारे, तर गोगां घरी बसून आठवेल तसं (तेच) चित्र काढणारे आणि त्यामुळे इतर फापटपसाऱ्यापासून मुक्त! दोघांवरही वेडेपणाची मोहर लागलेली. उदासी व संतापाच्या भरात वान गॉगने स्वत:चा कान कापण्याचा प्रसंग याच काळातला.
१८९१ मध्ये गोगांचं प्रदर्शन यशस्वी ठरलं. आर्थिक चणचण संपली. म्हणून आता ताहितीला जावं असं त्यांच्या मनाने घेतलं. पत्नीला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘‘या बेटावरच्या जंगलात मला हरवून जायचंय. शांत आनंदात निसर्गाजवळ राहून फक्त कलेसाठी जगायचंय. कदाचित नवं कुटुंबही. पण त्यात युरोपिअन संसारात असते तशी पैशांसाठी सतत भांडणं नसतील.’’ ताहिती म्हणजे फर्नची मैदानं, प्रवाळांचा समुद्रकिनारा, केळी-नारळीच्या बागा, मुख्य म्हणजे पीतवर्णीय अकृत्रिम आदिवासी, लज्जारक्षणापुरते रंगीबेरंगी कपडे घालणारे, काळ्या केसांचे. इथे त्यांनी निसर्गाची, दैवतांची, आदिवासी बायका-मुलांची अगणित चित्रं काढली. खऱ्याखुऱ्या, बाहेरचं वारं न लागलेल्या आदिवासी सखीच्या शोधात इथे त्यांची अनेक प्रेमप्रकरणंही झाली. त्यांच्या माघारी त्यांची ही पॉलिनेशिअन निसर्ग आणि आदिवासींची चित्रं जगभरात प्रसिद्ध झाली, त्यांची किंमत करोडोंमध्ये गेली. ताहितीतल्या प्रशांत रात्रींचंही गोगांना अप्रूप वाटे. ज्याच्या असोशीने ते ताहितीला आले होते ते निसर्गातलं रानटी पशूसारखं अनिर्बंध आयुष्य त्यांनी पुरेपूर भोगलं असावं. दोन वर्षांनी पैसे संपले तेव्हा ते कमवायला आणि आपल्या नावाचा लोकांना विसर पडू नये म्हणून ते पॅरिसला परतले. पण तेव्हा ते कलावर्तुळातलं मित्रांचं पाठबळ आणि बाजारातली पत दोन्ही गमावून बसले होते. चित्रं विकेनात म्हणून पॅरिसमध्ये निराशेत जगण्यापेक्षा ते ताहितीला परतले. या काळातल्या त्यांच्या सेल्फ पोट्र्रेटमध्ये आपण अन्यायाने आणि लोकांच्या अज्ञानामुळे ख्रिस्तासारखेच बळी ठरलो आहोत, ही मनात कायम असलेली भावना प्रबळ होताना दिसते.
‘व्हेअर डू वुई कम फ्रॉम? व्हॉट आर वुई? व्हेअर आर वुई गोइंग?’ (१४० ७ ३७४ सें. मी. ऑइल ऑन बरलॅप.. १८९७-९८) हे त्यांचं मास्टरपीस मानलं जाणारं भव्य चित्र म्हणजे ताहिती आणि गोगांची प्रेमकहाणी! गोगां हे त्यांचं ‘टेस्टामेंट’ आहे असं म्हणत. त्यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. शारीरिक व्याधींनी त्रस्त मनानं आणि पराभूत झाल्याच्या भावनेनं त्यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. या चित्राबद्दल ते म्हणतात, ‘‘Before death I put into it all my energy, a passion so painful in circumstances so terrible and my vision was so clear that all haste of execution vanishes and life surges up.’’ या चित्रात दिसतात गूढ, काही भागांत धुमिल रंग, तर काही हर्षोल्हासाच्या प्रतिमा, निळा समुद्र, निळं आकाश आणि निळे, हिरवे, सावळे डोंगर आणि आदिवासींच्या जीवनातले रोजचे क्षण. दूर एक कोणा देवतेची मूर्ती. ऐहिक आणि पारलौकिकचं मिश्रण असलेली ताहिती! हे चित्र गोगांनी पॅरिसला पाठवल्यावर कलावर्तुळात गोगांच्या कलेच्या प्रशंसेची लाट उठली. याबरोबरच्या ताहितीच्या इतर चित्रांनीही कीर्तीची माळ परत गोगांच्या गळ्यात पडली. पण आता उशीर झाला होता..
१८९९ मध्ये ते फ्रेंच सरकार आणि धर्मसत्तेविरोधात एका फ्रेंच वृत्तपत्रात लिहू लागल्याने त्यांच्यावर सुरू झालेल्या कायदेशीर कारवाईपासून दूर ते माक्र्वेस बेटावर जाऊन राहिले. मित्राला शेवटच्या पत्रात ते लिहितात,‘‘I only desire silence, silence and again silence. Let me die in peace and be forgotten.’’ दुसऱ्याच दिवशी गोगांना चिरशांती मिळाली खरी; पण त्यांच्या कलेला हक्काचा मान मृत्यूनंतरच मिळाला.
arundhati.deosthale@gmail.com