डॉ. आशुतोष कोतवाल
पदार्थ विज्ञानातील एक मोठा यक्षप्रश्न प्रा. पीटर हिग्ज यांनी सोडवला- ‘मूलकणांना वस्तुमान हा गुणधर्म कसा प्राप्त होतो?’ वस्तू किंवा पदार्थ यांना काहींना काही वजन असणारच हे आपण स्वीकारलेले ज्ञान आहे. या सामान्य धारणेतूनच आपले अंतर्ज्ञान विस्तृत होत जाते.

मात्र, आईनस्टाईनचा ‘विशेष सापेक्षतावाद’ जसा वैज्ञानिक जगतामध्ये रुजू लागला तशी ‘वस्तुमानविरहित’ मूलकणांची संकल्पना हळूहळू उदयाला येऊ लागली. इतकेच नव्हे तर तीच अधिक साहजिक, नैसर्गिक वाटू लागली. पूर्वीच्या धारणा आणि आडाखे यांचा फेरविचार करण्याची वेळ आली. सन १९५० पासून वजनदार मूलकणांची समस्या ठळक झाली.

Loksatta kutuhal Discovery of aliens with the help of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परग्रहांचा शोध
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
schizotypal personality disorder in marathi
स्वभाव-विभाव: संदर्भाचा भ्रम
effective treatment on psoriasis with side effects advice from dermatologist
सोरायसिसवर आता प्रभावी उपचार अन् दुष्परिणामही कमी! त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
loksatta kutuhal human friendly artificial intelligence
कुतूहल : बुद्धिमत्तेची कुरघोडी
Effectiveness of Sex Education in Adolescents
लैंगिकतेच्या शिक्षणाला पर्याय नाही
kutuhal
कुतूहल: प्रगत हयूमनॉइड

कल्पना करून पाहा, इलेक्ट्रॉन हा मूलकण वस्तुमानविरहित असता तर ‘अणु’ अस्तित्वातच कसा आला असता? आणि मग या यक्षप्रश्नाचे महत्त्व जाणवू लागले. खुलासा शोधण्याचे प्रयत्न सुरू होतात की, मूळच्या वस्तुमानविरहित इलेक्ट्रॉनला वस्तुमानाचा गुणधर्म कसा चिकटला आणि त्यानंतर अणु, मग विश्वातले जडतत्त्व आणि मग चराचर सृष्टी ही मालिका कशी अस्तित्वात आली!

हेही वाचा : गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…

सन १९६५ मध्ये, स्कॉटलंडमधील एडिंबर्ग विद्यापीठामध्ये सर पीटर हिग्ज प्राध्यापक होते. नॉर्थ कॅटोलिना विद्यापीठ अमेरिकेतील चॅपेल हिल येथे आहे. आमच्या ड्य़ुक विद्यापीठाच्या जवळच ते आहे. तिथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून ते येत असत. त्याच काळात त्यांनी विश्वरचनेची पायाभरणी करणारा आराखडा मांडला- ज्याचे पडसाद दीर्घकालीन संशोधनावर उमटणार होते. वस्तुमान प्रदान करण्यामधील निसर्गाची विलक्षण गूढजन्य यंत्रणा त्यांच्या अंतर्दृष्टीला जाणवली. आता प्रतिष्ठा पावलेल्या या ‘हिग्ज यंत्रणे’च्या कोनशिलावर पुढची वैज्ञानिक भाकिते उभी राहिली, एक नवी जाण आली की अवकाशाची पोकळी ही रिक्त पोकळी नाही, तर ती पोकळी ‘हिग्ज यंत्र’ नावाच्या एका गूढ पदार्थाने व्यापलेली आहे.

पुंजवाद म्हणते की, या हिग्ज क्षेत्राचा आविष्कार हिग्ज बोझॉन मूलकणातून होतो. आणि मग अर्धशतकाचा काळ लोटला हा मूलकण हाती सापडायला. सन २०१२ मध्ये स्वित्झर्लंडमधील ‘सर्न’ प्रयोगशाळेत हा शोधप्रवास संपला आणि २०१३ चे पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषिक सर हिग्ज यांच्या नावाने घोषित झाले.

हेही वाचा : गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!

एवढी शाश्वतस्वरूपी उपलब्धी मिळवलेले सर हिग्ज स्वत: अतिशय शांत स्वभावाचे, मितभाषी आणि प्रसिद्धीपराङ्मुख होते. आत्मप्रौढीचा अभाव आणि ऐहिक जीवनाविषयी काहीशी उदासीनता ही त्यांची खास वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. २० आणि २१व्या शतकातील पुढच्या पिढीच्या वैज्ञानिकांना ‘हिग्ज बोझॉन’चा खूप खोल अभ्यास करण्याचा वारसा त्यांनी ठेवला आहे. हिग्ज बोझॉन या मूलकणाच्या पोटात असंख्य रहस्ये दडलेली आहेत, असा विश्वास वैज्ञानिकजगतामध्ये दृढ झालेला आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी अचूक प्रयोगशीलता आवश्यक आहे.
फ्रिट्झ लंडन प्रोफेसर ऑफ फिजिक्स.

ड्य़ुक युनिव्हर्सिटी, डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना, यू.एस.ए.