श्रीनिवास बाळकृष्ण

मोठय़ांना असं वाटतं की, हे जग आणि त्यातले प्रश्न मोठय़ांचेच आहेत. त्याबद्दलचे सिनेमे, नाटकं, पुस्तकं लहानांनी पाहू नयेत की वाचूही नयेत; पण हे जग मोठय़ांइतकंच लहानांचंही आहे हे तुला आणि या पोटलीबाबाला चांगलंच माहिती आहे; आणि म्हणूनच आजचं हे अगदी खास पुस्तक तुझ्याचसाठी आणलंय. या पुस्तकाची कथा सांगितली तरी त्याची संपूर्ण सुंदरता तुला समजणार नाही. त्यासाठी पुस्तक हाताळावंच लागेल. याची दोन कारणं. एक- कथा दोन जणांच्या संवादातून पुढे सरकते. त्यातला भाव कथेतून सांगता येत नाही. दुसरं कारण, संवादाबरोबरच कमालीची सुंदर चित्रं ‘इलस्ट्रेशन’ म्हणून आपली सोबत करतात. दूध जसं हळूहळू वेळ घेत आटत आटत त्याची मधुर बासुंदी बनते, तसंच ‘आयशा’ पुस्तकातले शब्द आणि चित्रं यांची सुंदर शब्द-चित्रमय बासुंदी आपल्यासमोर येते.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

थोडक्यात कथा अशी की, एक सर्वसाधारण गरीब स्वभावाची मुलगी तिच्या जगण्यातले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन थेट राजाला भेटायला जाते. ते प्रश्न वरवरचे नाहीत. अगदी सच्चे आहेत. तिचं राजकीय ओळखीतलं कुणी नाही, तिची राजाशी काय, पण राजवाडय़ातल्या साध्या सैनिकाशीही ओळख नाही, मग राजकारणात मश्गूल सुलतान तिला का भेटेल? १८-१८ तास काम करणारा व्यस्त राजा हिला भेटायची वेळ देईल का? जयजयकाराच्या घोषणेत रमलेला त्याचा कान तिचं ऐकून घेतो का? सैनिक, द्वारपाल, मंत्री, प्रधान यांचे अडथळे पार करत सुलतानासमोर उभं राहायची हिंमत त्या चिमुरडीत तरी असते का? तिला राजवाडय़ाबाहेर भेटणारा कुणी दाढीवाला तिचं म्हणणं सुलतानापर्यंत पोहोचवेल का?

हे सगळं आपल्यासमोर खूप शांतपणे येतं.. शब्दांतूनही आणि चित्रांतूनही! मुलांसाठी आहे म्हणून चटकदार संवाद, निरुत्तर करणारी आगाऊ मुलगी, कार्टून वाटावीत अशी इलस्ट्रेशन नाहीत. ही ‘चित्रं’ मोठय़ांनाही मोहून टाकतील अशी. पारंपरिक मुस्लीम आर्किटेक्चरचे नक्षीकाम- बांधकामाला चित्रात उतरवलं आहे. त्यातल्या नक्षीला वेळ घेऊन चितारलेलं नाही. ही सर्व चित्रं अॅक्रॅलिक जाड रंगांनी चितारली आहेत. त्यातला पोत (टेक्श्चर), सौम्य रंगछटा वाचकाच्या मनावर कोरली जातात.

ही चित्रं लिखाणाला बाळबोध सोबत करणारी नाहीत. कथेत असणारा, पण लिखाणात येऊ न शकलेला भाव या चित्रांतून नेमका उतरवला आहे. कथा वेगळय़ा देशात घडत असल्याने त्या देशाला, काळाला, वातावरणाला आपल्यासमोर आणण्यातही ही चित्रं मदत करतात आणि तेही निव्वळ सुंदर रचनेच्या, रंगलेपनाच्या साहाय्याने. एकेक चित्र फ्रेम करून लावावं इतकं सुंदर आहे. त्यासाठी ‘आयेशा’ वाचावंच लागेल.

लेखक पीटर वान आउधस्देन, चित्रकार स्टीफानी डी ग्राफ आणि अनुवादक अवंती देवस्थळे यांनी खूप मोठा विषय तरलपणे आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. हे मूळ पुस्तक बेल्जिअममधून २००९ मध्ये प्रकाशित झालं. ‘ए अँड ए बुक्स’तर्फे हिंदूीत २०१२ ला आलं. हे पुस्तक प्रकाशकांच्या संकेतस्थळावर किंवा ऑनलाइनही मिळेल.

shriba29@gmail.com