श्रीनिवास बाळकृष्ण

पोटलीबाबा हिवाळय़ात राजस्थानला गेला होता. उंटाच्या हलेडुले चालण्यानं त्याला गाढ झोप लागली आणि दहाव्या दिवशी तो एका गावात धपकन् पडलाच. गावात बघावं तिथं चित्रंच चित्रं! तिथं चावडीवर गप्पा मारत बसलेल्या पुरुषांनी या चित्रांमागची गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचं पुस्तकच मला दिलं. ते इतकं भन्नाट आहे की, तिथून धावतच मी मुंबईत आलो आणि तुझ्यासाठी लिहायला बसलो.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Bollywood actress Malaika Arora shares her 9 health goals for November
नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल
BJP advertisement in major dailies featured slogan Ek Hai To Seif Hain with caps
भाजपच्या जाहिरातीत सर्व जातींच्या टोप्या…एक टोपी मात्र मुद्दाम…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले

‘मोर डुंगरी’ हे पुस्तक इकतारा प्रकाशन संस्थेनं हिंदूीत (मराठीत ज्योत्स्ना प्रकाशन) काढलं. ती राजस्थानमधील एका गावाची कथा आहे, जिथं गावकरी आणि मोर (सर्वच पशुपक्षी) एकत्र राहत असतात. वन्य पशुपक्षी गावकऱ्यांना त्यांच्यातलंच मानत असतात. ते त्यांच्या छपरावर, अंगणात बिनधास्त येतजात असतात. घरातल्या पाली, उंदरं खातात. गावकरीही त्यांच्यासाठी दाना-पाणी ठेवतात. असं सर्व काही ठीकठाक चालत असतानाच, एका आदेशानं जंगलातल्या आदिम निवासी असणाऱ्या गावकऱ्यांना दुसऱ्या (नागरी वस्तीच्या) ठिकाणी हलवण्यात येतं. जिथं सर्व सुखसुविधा आहेत, पण मोर नाहीत. वाघाचे आवाज येत नाहीत. किंवा रोजच्या जगण्यात निसर्गतला एकही पशुपक्षी दिसत नाही. डोळय़ांना गुदगुल्या करणारा मोरांचा नाच नाही, छता-अंगणात त्यांची पिसंही पडत नाहीत. निसर्गाशी एकरूप झालेले गावकरी आतल्याआत अस्वस्थ होतात. मग त्या आठवणीत स्त्रिया आपल्या घराच्या भिंतींवर मोरांची (पशुपक्षाचीही) चित्रं काढू लागतात. त्यातून त्यांच्या भावनेला मोकळी वाट करून देतात, अशी ही कथा.

प्रत्यक्षात असं घडलंही असेल. आपण इलस्ट्रेशनकडे पाहू. इथं गावात एकाच पद्धतीचं नक्षीकाम असणारी चित्रं पाहायला मिळतात. ते कसं? तर बायका एकमेकींची चित्रं पाहून त्यातलं जे आवडतं, सोपं वाटतं ते उचलत, हळूहळू एका ठरावीक सोप्या पद्धतीत चित्रं साकारत गेल्या. तेच आकार वापरायचे असं ठरवलंही असेल. त्यामुळे त्या सर्वाना आणि पुढल्या पिढीला जशाच्या तशा आकाराला चित्रात शिकवता- वापरता आलं. या दिसण्याच्या सारखेपणामुळे एक विशिष्ट पद्धत (शैली) निर्माण झाली. त्या चित्रशैलीला ‘मांडणा’ म्हणून संबोधू लागले.

अशाच एका मांडणा कलाकाराला पोटलीबाबा प्रत्यक्ष भेटलाही. राजस्थानमधील सवाई माधवपूर भागातील गावात राहणाऱ्या चित्रकार सुनीता. हे पुस्तकही त्यांचं स्वत:चं. त्यांनी लहानपणी आजीच्या कलाकुसरीकडे पाहून घराची भिंत आणि जमिनीवर या पद्धतीची चित्रं गिरवली.त्यांनी सांगितलं की, खरी मांडणा चित्रं अशी पुस्तकात दिसतात तशी नसतात. शेण, गेरू (माती) यांना एकत्र करून ते मिश्रण भिंत, जमिनीवर लावलं जातं. (हे आपल्याकडे रांगोळी काढताना करतात) खाणकामगार जमिनीच्या पोटातून एक विशिष्ट प्रकारची पांढरी गुळगुळीत माती काढतात. ती गावोगावी विकायला येत असते. आम्ही ती घेतो. तिला पाण्यात घोळवून चांगली पेस्ट बनवतो आणि आपल्या बोटांनी चित्र काढतो. त्यामुळे भिंतींवर खूप ओघवत्या रेषा येतात. ब्रशमध्ये तसा अनुभव मिळत नाही. बोटांनी आकारही मोठे मिळतात व कामही भरभर होतं.

पुस्तकात मात्र ब्रशनेच काम केलं आहे. मुलांसाठी पुस्तक असल्यानं तिनं चित्र आकर्षक करायला रंगही वापरले आहेत. कथेनुसार काही नव्या वस्तू काढलेल्या आहेत. घराच्या भिंतीवर असं काही नसतं. पुस्तक असो वा घर, ते सजवण्याची इच्छा सर्वाना असते. त्यासाठी चार-आठ दिवस ( खरं तर रात्र) हे काम चालतं. पूर्वी फक्त बायकाच हे काम करीत,आता सर्व मिळून हे काम करतात. शहरात मात्र घर सजवणं हे रेडिमेड वस्तूंद्वारे होतं.चित्रातील हे आकार बघ. देशातल्या इतर कुठल्याही ग्रामीण लोककलेला साजेशा अशाच आहेत. लोकांनी एकत्र मिळून तयार केलेली कला म्हणजे लोककला. म्हणजे तुलाही हे येईलच ना मित्रा!

आज आपण करूयात का घराचा एक कोपरा सुशोभित? रंग तुझ्या आवडीचा घे. प्राणी, झाड, कीटक असं काहीही ठरव. त्यावर चित्रात दिसतेय तशी डिझाइन मनाशी ठरव. आता थांबलायस का? मित्रा, उचल ते बोट आणि लाव त्या भिंतीला!
shriba29@gmail.com