आवडती पुस्तके
फार फार तर मी असे म्हणेन की जे आवडते त्यात अधिक आवडणारे- जे पुन: पुन्हा वाचावेसे वाटते ते..
१) श्यामची आई – साने गुरुजी
२) ययाती – वि. स. खांडेकर
३) कुणा एकाची भ्रमणगाथा – गो. नी. दांडेकर
४) कोसला – भालचंद्र नेमाडे
५) प्रतिस्पर्धी – किरण नगरकर
६) प्रारंभ – गंगाधर गाडगीळ
७) दिवे गेलेले दिवस – रंगनाथ पठारे
८) आंधळ्याच्या गायी – मेघना पेठे
९) उदकाचिया आर्ती – मिलिंद बोकील
१०) नक्षत्रांचे देणे – आरती प्रभू
११) पुष्कळा – पु. शि. रेगे
१२) जेजुरी – अरुण कोलटकर
१३) बटाटय़ाची चाळ – पु. ल. देशपांडे
१४) किमया – माधव आचवल
१५) काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई
– कमल देसाई
१६) विरुपिका – विंदा करंदीकर
नावडती पुस्तके
मुळात साहित्य मला मनापासून आवडते आणि त्यात नावडते ठरवायचे झाले तर ते कठीण आहे. असे कसे साहित्याला बंदिस्त करावे? हे तर स्वत:लाच कोंडून ठेवण्यासारखे. इतर अनेक साहित्यिकांची क्षमा मागून.