डॉ. कमल राजे
संमेलन, जलसे आणि त्यातून साकारणारी ‘साहित्यऊर्जा’ हा अलीकडच्या काळाचा संशोधन विषय बनावा, अशी परिस्थिती असतानाही मराठी भूमीत गेल्या वर्षी ‘लिटफेस्ट’च्या धर्तीवर पुस्तक महोत्सव भरवला गेला. त्यात झालेली ११ कोटींची ग्रंथखरेदी हा कित्येक महिने चर्चेचा विषय राहिला. ग्रंथ व्यवहाराची दोरी गेल्या दोन दशकांत भारतात उगवत असलेल्या ‘लिटफेस्ट’ संस्कृतीकडे चालली आहे. यानिमित्ताने भारतातील लेखकवाचकांना जोडणाऱ्या या नव्या दुव्यावर चर्चा आणि पुढील आठवड्यात होत असलेल्या दुसऱ्या पुणे महोत्सवाच्या आयोजक समितीतील सदस्याचे मनोगत…

गेल्या वर्षी आठवडाभर पुण्यात एक विक्रमी घटना घडली. पहिलाच ‘पुस्तक महोत्सव’ म्हणून मराठी प्रकाशकांनी भीत भीत जे स्टॉल लावले, त्यात उभे राहायलाही जागा नव्हती इतकी अभूतपूर्व गर्दी होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मराठी-इंग्रजी आणि हिंदीतील प्रकाशनसंस्थांची पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचकांची इतकी झुंबड कुठल्याही अखिल भारतीय संमेलनाने अनुभवली नसावी. तब्बल २५० स्टॉल्सवरच विक्रीचा अधिकृत आकडा ११ कोटी रुपयांहून अधिक होता. यात पुणे आणि आजुबाजूच्या परिसरातील खरेदीदार वाचक तर होतेच, पण मुंबई-नाशिकसह राज्यातील विविध भागांतून लोक या महोत्सवात ग्रंथ उपसणी करीत होते. हिंदी पट्ट्यातील प्रकाशकांसह इंग्रजी ग्रंथसंस्थादेखील हा प्रतिसाद पाहून चाट पडल्या. मराठीतील काही महत्त्वाच्या बड्या प्रकाशकांनी आपला स्टॉल न लावल्याचा पस्तावा करावा आणि सावधगिरीतून छोटे गाळे घेणाऱ्यांना होणाऱ्या तुफान विक्रीचा अंदाज घेता न आल्याने हळहळत राहावे अशी परिस्थिती उद्भवली. कारण संमेलनात तुरळक संख्येने वाचक येण्याचा शिरस्ता त्यांच्या परिचयाचा. वाचक आणि ग्रंथप्रेमी असलेले लोक कार्यक्रम पाहण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी आणि आपल्याला हव्या त्या देशी-विदेशी पुस्तकांच्या हुंदळकीत रमण्यासाठी जमलेले. सांस्कृतिक नगरी असे नामकरण केले जात असले तरी या मराठी प्रदेशातल्या ग्रंथविक्रीच्या अफाट शक्यतेची ओळख ‘पुणे पुस्तक महोत्सव’ या ‘लिटफेस्ट’ने देशभरातील प्रकाशकांना करून दिली. एकीकडे आपली पारंपरिक साहित्य संमेलने दूरदेशी जाऊन ‘जागर’ वगैरे करण्याच्या आत्मानंदात रंगलीत. श्रोतेशोधक हौशा-गवशांची काव्यसंमेलने, कालबाह्य विषयांवरील परिसंवाद आणि ग्रंथविक्रीमारक वातावरणात समाधान मानणाऱ्या या संस्थांनी ग्रंथविक्रीस पूरक ‘लिटफेस्ट’चे अवलोकन करावे, अशी परिस्थिती सध्या आलीय. हिंदी पट्ट्यांमध्ये जेथे वाचकसंख्या घटण्याची धास्ती नाही तिथेही ‘लिटफेस्ट’ची लाट आली असून, पुस्तक विक्री- लेखकाच्या नव्या लेखनाच्या प्रचार आणि प्रसाराचे हे सर्वोत्तम माध्यम बनत आहे. ‘जयपूर लिटफेस्ट’चे यशस्वी मॉडेल दोन दशकांत देशभरात इतके व्यापत चालले आहे की, देशातील आंतरराष्ट्रीय लिटरेचर फेस्टिव्हलची संख्या डझनांहून अधिक झालीय. नव्या-जुन्या लेखकांचे- नवे ग्रंथ आणि त्यांची व्याख्यानमाला, पुस्तकांसाठी असंख्य प्रकाशनांचे पर्याय आणि पूरक रंजक कार्यक्रमांची रेलचेल यांनी गंभीर झालेल्या उतारवयीन वाचकांपासून उत्साहाने सळसळत्या तरुणाईला हे आकर्षणस्नेही वातावरण आवडत आहे.

kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
Loksatta anvyarth Regarding the implementation of the Right to Information Act Supreme Court
अन्वयार्थ: कुंपणानेच खाल्ले शेत…
Torres Jewelry House scam investment a new pattern of fraud foreign company
टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?

फक्त १८ लेखक आणि १०० च्या जवळपास प्रेक्षक यांनी २००६ साली सुरू झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे २०२४ चे स्वरूप किती आवाढव्य होते, त्याची आकडेवारीच उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या चार-पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात ५०० हून अधिक वक्ते होते. त्यांचे २०० कार्यक्रम. या सगळ्याचे नियोजन करायला ४५० हून अधिक स्वयंसेवकांचा ताफा राबत होता. जगभरातील चार लाखांहून अधिक लोक या महोत्सवाला भेट देताना, तिथल्या अर्थव्यवस्थेची पुरेपूर वृद्धी करीत होते. इथे मिळणाऱ्या कपडे-चादरींपासून ते दागिन्यांपर्यंत आणि पर्यटनस्थळांपासून ते रेस्तराँ-मिष्टान्नाच्या व्यापारापर्यंत सारेच प्रत्यक्षरीत्या महोत्सवासाठी या काळात राबत होते. महोत्सवस्थळी चार हजार विक्रेत्यांची गर्दी होती ती वेगळी. शिवाय त्या शहरात नजीक याच काळात आणखीही दोन आंतरराष्ट्रीय महोत्सव भरले होते. त्याची गर्दी आणि अर्थव्यवहार माध्यमांच्या खिजगणतीतही नव्हता.

या महोत्सवाची दक्षिणी भावंडे आता देशी यंत्रणेसह आंतरराष्ट्रीय प्रकाशक आणि लेखकांना खुणावत आहेत. ‘केरळ लिट फेस्टिव्हल’ या समुद्रकिनारी भरणाऱ्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय लेखकांइतकेच स्थानिक भाषेतील लेखकही सभा गाजवतात. तिथली तरुणाईची उपस्थिती आणि पुस्तक विक्रीचे बातम्यांतून येणारे आकडे चक्रावून टाकणारे असतात. दोन वर्षांपूर्वी या राज्यातीलच ग्रामीण भागात सुरू झालेले ‘वायनाड लिटफेस्ट’, २०१२ साली सुरू झालेले ‘बेंगळूरु लिट फेस्टिव्हल’, ओदिशामधील ‘कालिंगा लिटफेस्ट’ ही आता जगाच्या दृष्टीने मोठी होत चाललेली महोत्सवांची नावे. पूर्वी युरोप-अमेरिकेतील निवडक लिट फेस्टिव्हल्सना आंतरराष्ट्रीय लेखकांच्या दृष्टीने जे महत्त्व होते, त्याहून अधिक आता भारतात होणाऱ्या फेस्टिव्हल्सबाबत वाटत आहे. आवाढव्य लोकसंख्येच्या या देशात इंग्रजी वाचकांचा टक्का कमी असला, तरी ती संख्याही हा पुस्तकविक्रीचा महत्त्वाचा भाग म्हणून हे लेखक आयोजकांच्या निमंत्रणावरून घसघशीत मानधन घेऊन दाखल होत आहेत. या वर्षी ऑस्कर सोहळ्याच्या महिनाभर आधी ‘ओपेनहायमर’ या सिनेमा ज्या ग्रंथावरून बेतला त्याचा लेखक सेल्फी अधिक सहीसह जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल्समध्ये भारतीय वाचकांसाठी उपलब्ध होता. इतरही ढिगाने अमेरिकी आणि युरोपीय लोकप्रिय लेखकांचा जथ्था तिथे वाचकांशी, चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत होता. बेंगळुरू आणि केरळ लिटफेस्टमध्येही हाच कित्ता गिरविण्यात आला.

हे लिटफेस्ट गर्दी का खेचतायत आणि पारंपरिक संमेलने ओस पडलेली का भासतायत, याचा विचार वर्षानुवर्षे संमेलनांचे एकच प्रारूप आखणाऱ्या आयोजकांनी करायला हवा. निधी मिळतोय म्हणून साहित्याशी सुतराम संबंध नसलेल्या राजकीय व्यक्तींची लुडबुड, त्या लुडबुड्यांच्या निकटवर्तीयांची संमेलनातील कार्यक्रमांमध्ये ठळक दिसणारी उपस्थिती, प्राध्यापक-साहित्यिकांचा स्वतंत्र सवतासुभा आणि शीघ्रकवींची जागोजागी असलेली उपस्थिती सजग वाचकांपुढे कोणत्या प्रकारची आकर्षणे निर्माण करू शकतील? काही वर्षांपूर्वी संमेलनावर तसेच त्यांतल्या मान्यवरांवर तातडीने पाडली गेलेली आणि गायन करून सादर केलेली भीषण दीर्घकविता दर संमेलनकाळात खिल्ली उडवत पसरवली जाते. व्यक्तींची मानापमान नाट्ये आणि राजकीय पक्षांची हुजरेगिरी यांत खर्च झालेले आयोजन -नियोजन पुस्तकांची विक्री आणि ग्रंथविक्रीची दालने यांना दुय्यम-तिय्यम महत्त्व देतात. त्यामुळे ज्या ‘साहित्य’ नामक घटकासाठी हा खटाटोप होतो, त्याला सर्वात कमी प्राधान्य मिळालेले असते. कुठून येणार मग तिथे ‘साहित्यप्रेमीं’ची गर्दी?

जयपूर लिटफेस्टची रूपांतरे करणाऱ्या दक्षिणी राज्यांनी गेल्या काही वर्षांत आपली पुस्तके ‘पॅन इंडिया’त पसरविण्यासाठी अमाप प्रयत्न केले आहेत. मल्याळी, तमिळ, कन्नड चित्रपट ज्या जोमाने भारतभर पाहिले जात आहेत, त्या वेगाने येथील ग्रंथांचेही इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादासाठी या लिटफेस्टमध्ये करार होत आहेत. गेल्या वर्षी बेंगळुरू लिट फेस्टमध्ये असे भरपूर करार झाले.

या दक्षिणेकडच्या साहित्याला पूरक अशा अनेक गोष्टी लिटफेस्टमधून साकार झाल्या आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले, तर बेन्यामिन या मल्याळी लेखकाची ‘गोट डेज’ (गोट लाइफ) ही कादंबरी. २००९ साली या मल्याळी कादंबरीला केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अरब राष्ट्रात अडकलेल्या केरळी माणसाची ही गोष्ट. कादंबरीचा इंग्रजी अनुवाद भारतातील सर्व लिटफेस्टमधून यापूर्वी गाजविण्यात आला होता. या वर्षी सुरुवातीला झालेल्या केरळ लिट फेस्टिव्हलमध्ये या कादंबरीचा सिनेमापर्यंतच्या प्रवासावर स्वतंत्र परिसंवाद होता. यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या निमित्ताने पुस्तकाची नव्याने विक्री झालीच. पण भारतातील तिकीटबारीवर १६० कोटी इतका प्रचंड व्यवसाय करणारी फिल्मदेखील ठरली. (पहिल्या क्रमांकावर हिंदी नाही, तर ‘कल्की’ हा तेलुगू चित्रपट आहे, हेदेखील विशेष) त्यामुळे येत्या काळात मागासरूप असलेल्या, आत्मगौरवाच्या, गतकाळाच्या संपन्नतेचे टेंभे मिरविणाऱ्या पारंपरिक साहित्यिक संमेलनांनी आपल्या अस्तित्वाची आरसेपाहणी करायला हवी. लोक ढुंकून पाहण्यासाठीदेखील येऊ नये असे उत्तरोत्तर स्वरूप बनत जाणाऱ्या संमेलनांची वाट चालतील की, ग्रंथांना महत्त्व देणाऱ्या तसेच त्यांची विक्री महत्त्वाची मानणाऱ्या लिटरेचर फेस्टिव्हल्सना, हे काहीच वर्षांत समोर येणार आहे. पुणे लिटफेस्ट ही बदलाची नांदी आहे. साहित्यविश्वात यांमुळे खरेच सकारात्मक बदल होत असतील, तर ते कुणाला नकोत?

lokrang@expressindia.com

Story img Loader