‘लोकरंग’ (२७ ऑक्टोबर) मधील ‘पडसाद’ सदरामधील पत्रे वाचली. सुनील किटकरू यांच्या ‘प्रचारक… संघाचा कणा’ हा मूळ लेख प्रचारक म्हणून कार्य केलेल्या लेखकाचा आहे. त्यामध्ये संघ संघटनेला टिकवून धरणारा ‘मुळांचा’ परिचय म्हणजे प्रचारक अशी लेखाची मांडणी होती.

मागे तळजाई शिबीर (संख्या ३५,०००) झाल्यावर संघद्वेष करणारे (संख्या ३५) ना. ग. गोरे यांच्या पुण्यातील घरी जमले आणि निषेध ठराव केला गेला. त्या वेळी त्यांनीही ही अल्प संख्येची खंत बोलून दाखविली होती. तसेच काहीसे हे आहेत. प्रत्येक संघटनेत कमी-जास्त त्रुटी असतातच. त्यावर मात करून ज्यांना समविचारी संघटना उभी करता येत नाहीत ही मंडळी अशा प्रकारे लिहून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. -सुनिल मोने

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’

दूषित राजकीय वातावरणाचे अचूक विश्लेषण

‘लोकरंग’मधील (२० ऑक्टोबर) ‘दहा दिशांनी, दहा मुखांनी’ हा राजेंद्र साठे यांचा लेख सद्या राजकीय दूषित वातावरणाचे लेखापरीक्षण करणारा होता. ‘मी या लोकशाही राष्ट्राचा नागरिक आहे व मतदानाचा हक्क मी बजावणारच’ या प्रामाणिक भावनेने मतदान करणारा मतदार म्हणजे आज राजकीय पक्षांच्या हातातले खेळणे झाले आहे. आजच्या तांत्रिक युगात बोगस मतदार तयार करणे, मतमोजणीमध्ये हवा तो घोळ करणे, यात जो पक्ष चतुर ठरेल त्याच्या हाती सत्ता जाते. ‘तुम्ही आता जिंकला आहात मग आता मतदारांचे काय भले कराल?’ या प्रश्नाचे एकमुखी उत्तर येईल- ‘आम्ही त्यांचे लचके तोडून त्यावर गुजराण करू व आमचे खिसे भरू.’ खरंच, प्रामाणिक मतदार हा पाच वर्षांनी एकदाच आठवला जातो. मतदानादिवशी तथाकथित पुढारी हात जोडून त्यांना वंदन करतात, मात्र मतदान करून तो बाहेर आला की महागाईचा राक्षस त्याचे स्वागत करायला उभा असतो. मतदान करून घरी आल्यावर बोटावरची ‘शाई’ पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो, हीच माझी ‘लोकशाही’! -सूर्यकांत भोसले, मुलुंड.

उल्लेखनीय ‘नाचाओधासां!’

‘लोकरंग’ (६ ऑक्टोबर) मधील बालमैफल सदरातील ‘नाचाओधासां!’ ही रती भोसेकर यांची बालकथा वाचली. या कथेद्वारे लहान मुलामुलींना सुरक्षित स्पर्श व वाईट स्पर्श यांची करून दिलेली ओळख सद्या:स्थितीत फारच महत्त्वाची आहे. तसेच विपरीत प्रसंग ओढवला तर काय करायचे तेही यात सांगितले आहे. पालक तसेच शिक्षकांनी यासंदर्भात मुलांना माहिती सांगणे आवश्यक आहे. यातून अनेक घातक प्रसंग टळतील. त्यासाठी लहान मुलामुलींबरोबर घरात बोलणे व संवाद असावा. -प्र. मु. काळे, सातपूर, नाशिक

दिवाळीचा आनंद आणि अभ्यंगस्नानाचे शास्त्र

‘लोकरंग’ मधील (२७ ऑक्टोबर) ‘बालमैफल’ सदरातील ‘अभ्यंगस्नान’ ही मॅटिल्डा डिसिल्वा यांची कथा वाचली. दिवाळीचा सण हा आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठ्या आणि आनंददायी सणांपैकी एक आहे. दिवाळीच्या आगमनासोबतच आपल्या मनात एक वेगळाच उत्साह भरून येतो. या सणाची तयारी, नवीन कपडे, फटाके, फराळ आणि मित्र-परिवारासोबतचा आनंद या सगळ्या गोष्टी आपल्याला बालपणीच्या आठवणींना उजाळा देतात. पण दिवाळी हा केवळ आनंद आणि उत्सव साजरा करण्याचाच दिवस नाही, तर तो आपल्या संस्कृतीतील अनेक रूढी परंपरांचाही साक्षीदार आहे. यापैकी एक महत्त्वाची रूढी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच नरक चतुर्दशीला केले जाणारे अभ्यंगस्नान.

सोहम आणि जिमी या दोन बालमित्रांच्या संवादातून आपल्याला या अभ्यंगस्नानामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणं समजतात. -अजित लक्ष्मणराव तरवटे, परभणी.

कर्तव्याविषयी अनभिज्ञ जनता

‘लोकरंग’ (६ ऑक्टोबर) मधील ‘कारवीचं फुलणं… एक क्लेशदायक अनुभव…’ हा लेख वाचला. लेखाच्या शीर्षकातील ‘कारवीचं फुलणं’ अन् पुढे सुखद शब्दांच्या बांधणीऐवजी ‘क्लेशदायक’ या शब्दाने पुढील पडझडीची कल्पना आली.

कोणा एका यूट्यूबरच्या प्रसिद्धीसोसाने ‘कारवीचं’ रान उनाड लोकांसाठी खुलं झालं आणि आपला सामाजिक बेजबाबदारपणा माळरानांवरील निरागस ‘कारवी’वर अन्याय करून गेला. प्रवासाच्या अनवट वाटा धुंडाळणारी प्रवासवर्णने माझ्यासारख्या अनेकांना निखळ आनंद देत असतात. पण मोबाइलक्रांतीने प्रगतीबरोबरच अधोगतीही पाहावयास मिळते. नागरिक म्हणून आपली काही कर्तव्यं असतात याचं सुटलेलं भानं ‘कुरतडलेल्या कारवी’च्या निमित्ताने वनस्पती-अभ्यासकाने करून दिलंय त्यासाठी त्यांचं कौतुक. -विजय भोसले, घणसोली, नवी मुंबई</strong>

Story img Loader