१. १९३० साली माडखोलकर यांच्या दोन कादंबऱ्या एकदम प्रसिद्ध झाल्या. ‘मुक्तात्मा’ आणि ‘भंगलेले देऊळ.’ या कादंबऱ्यांविषयी अत्रे यांनी अत्यंत वाईट पद्धतीची टीका केली होती. ‘मुक्तात्मा नव्हे, भंगात्मा’ आणि ‘भंगलेले देऊळ नव्हे, भंगलेल्या लेखकाचे देऊळ’ अशी अश्लाघ्य टीका त्यांनी ‘मराठा’मध्ये त्वरित लिहिली. कारण खांडेकर, फडके आणि माडखोलकर ही मराठी कादंबरीच्या त्रिमूर्तीची निर्मिती केवळ दोन कादंबऱ्यांमुळे झाली, हे अत्रे यांना पचवणे जड गेले.
त्यांच्या या संकुचित वृत्तीमुळे पुढे ‘मराठा’मध्ये ‘विनोबा हे वानरोबा’, ‘तर्कतीर्थ नव्हे, नर्कतीर्थ’ तसेच देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या थोर क्रांतिकारकाचे त्यांच्या वहिनीशी संबंध होते, असे हीन आणि किळसवाणे लेखन त्यांनी केले. म्हणूनच शिवाजी पार्कसमोर त्यांची गाडी थांबवून सावरकरभक्तांनी त्यांना चोप दिला. शिवाजी पार्कमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लाखांच्या सभा घेणाऱ्या अत्र्यांना मार बसताना लोकांनी त्याच शिवतीर्थावर पाहिले.
२. नागपुरात आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ वृत्तपत्राची आवृत्ती काढली. त्यावेळी त्यांचा मुक्काम श्याम हॉटेलमध्ये राहिला. ‘मराठा’च्या पहिल्या अंकात पहिल्याच पानावर अग्रलेख आला होता. त्याचे शीर्षक होते- ‘माडखोलचा माडोबा कोकणात पळणार’! तर ‘तरुण भारत’च्या अग्रलेखाचे शीर्षक होते- ‘दै. मराठाचे स्वागत’! अर्थात दैनिक ‘मराठा’चा ११ महिन्यांतच गाशा गुंडाळला गेला. त्यामुळे नागपूर आवृत्तीचा शेवटचा अग्रलेख होता- ‘आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा’! थोडक्यात, माडखोलकरांच्या ‘तरुण भारत’पुढे ‘मराठा’ने ११ महिन्यांत नांगी टाकली.
या सर्व गोष्टींच्या रागामुळे बेळगाव साहित्य संमेलनाचा उल्लेख ‘लोकरंग’मधील या लेखात आहे; परंतु बेळगाव-कारवारसहित संयुक्त महाराष्ट्राचा उद्गाता आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर होते, याचे अत्रे यांना जाणीवपूर्वक विस्मरण झाले असे दिसते. १९८५ साली लेखन आणि वाणी म्यान करणाऱ्या उपऱ्याला हे पत्र लिहिण्याची दुर्बुद्धी झाली, ती यामुळेच.
– प्रियदर्शन माडखोलकर, नागपूर.
अत्र्यांचे वैर आणि कटुता
‘लोकरंग’मधील कै. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी- खंड ६’मधील पुनमुद्र्रित लेख वाचला. वाचून सखेद आश्चर्य वाटले, म्हणून हा पत्रप्रपंच. लेखात परिच्छेद क्रमांक १ व २ मध्ये बेळगावच्या साहित्य...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reply to article