‘उच्च शिक्षणातील सुमार-सद्दी’ आणि ‘शोधनिबंधांची दुकानदारी’ या लेखांची लिंक मी फेसबुकवर शेअर केली. विद्यापीठाच्या ई-मेल सेवेतील सर्वाना त्याबद्दल कळवले. त्यानंतरचा आठवडाभर मी त्यावर आमच्या कॅम्पसमधील विद्वत्जनांकडून प्रतिसाद येईल याची वाट पाहत होते. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागाच्या डॉ. अंबुजा साळगावकर यांचा प्रतिसाद सोडला तर कुणाचा ‘ब्र’ही आला नाही. कदाचित त्यातले काहीजण लिहिलंय ते बरोबरच आहे, आता आणखी आपण काय लिहायचं, असा विचार करून गप्प राहिले असतील अशी शक्यता आहे. पण एरवी कसल्याही बारीकशा मुद्दय़ावर एकमेकांचे अभिनंदन करणारे, निरोप टाकणारे हे लोक या पत्रावर साधा अभिनंदनाचाही निरोप टाकत नाहीत, हे खटकले. फेसबुकवरील लिंकबाबतही तेच झाले. जे रॅकेट चालले आहे ते सर्वानाच आवडते आहे अशी परिस्थिती आहे, हे उघड आहे. केवळ यूजीसी-गुणसंपादनासाठी होणारे शोधनिबंधांचे प्रकाशनच नव्हे, तर विद्यापीठांच्या सिलॅबस ठरवण्याच्या पद्धती, पीएच.डी.चा शिक्का बसावा म्हणून केले जाणारे मार्गदर्शकांमधील साटेलोटे, अभ्यास मंडळांचे राजकारण, विद्यार्थी व शिक्षकांतील कॉपी-पेस्टची बळावलेली वृत्ती असे अनेक मुद्दे आहेत.
– मुग्धा कर्णिक,
संचालक, बहि:शाल विभाग, मुंबई विद्यापीठ.
सुमारांची खानेसुमारी
‘उच्च शिक्षणातील सुमार-सद्दी’ आणि ‘शोधनिबंधांची दुकानदारी’ या लेखांची लिंक मी फेसबुकवर शेअर केली. विद्यापीठाच्या ई-मेल सेवेतील सर्वाना त्याबद्दल कळवले. त्यानंतरचा आठवडाभर मी त्यावर आमच्या कॅम्पसमधील विद्वत्जनांकडून प्रतिसाद येईल याची वाट पाहत होते. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागाच्या डॉ. अंबुजा साळगावकर यांचा प्रतिसाद सोडला तर कुणाचा ‘ब्र’ही आला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-04-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response