संगीत व नाटय़क्षेत्रात कमालीचे कर्तृत्व व लोकप्रियता संपादन केलेल्या कलावंत ज्योत्स्ना भोळे यांच्यावर त्यांची कन्या वंदना खांडेकर यांनी जो लेख लिहिला आहे, त्यात त्यांनी ज्योत्स्नाताईंच्या कर्तृत्वाचे घडवलेले दर्शन पूर्णत: वस्तुस्थितीनिदर्शक आहे. तथापि, त्यात ज्योत्स्नाताईंच्या स्वभावात प्रकर्षांने प्रत्ययास येणाऱ्या एका महत्त्वाच्या गुणाचा उल्लेख राहून गेला आहे असे वाटते. तो गुण म्हणजे त्यांच्या स्वभावातील आत्यंतिक साधेपणा! प्रचंड लोकप्रियता लाभूनही त्यांच्या स्वभावात आढय़तेचा लवलेशही नव्हता.
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. मी त्यावेळी नागपुरात वास्तव्यास असताना ज्योत्स्नाताई आपला नाटय़संच घेऊन तिथे आल्या होत्या व त्यांनी आपली लोकप्रिय नाटके तिथे सादर केली होती. माझी पत्नी प्रतिभा व मला नाटकांची व संगीताची आवड असल्याने आम्ही त्यांची नाटके आवर्जून पाहिली. ज्योत्स्नाताईंच्या अविस्मरणीय अभिनयाचा आणि संगीतकौशल्याचा मनसोक्त आनंद घतला. त्यामुळे आम्ही भारावून गेलो होतो. त्यांचे स्टेजवरील सहजतेने वावरणेदेखील अतिशय भावले.
ज्योत्स्नाताईंच्या नाटकात अभिनेत्री कुसुम देशपांडे यांचाही समावेश होता. त्या आणि माझी पत्नी या बालपणीच्या मैत्रिणी असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी माझी पत्नी गेली होती. तिला पाहताच कुसुमताईंना खूप आनंद झाला. त्यांनी माझ्या पत्नीची ज्योत्स्नाताईंशी ओळख करून देत दोघींच्या लहानपणाच्या बाहुला-बाहुलीच्या लग्नाची गंमतीदार हकीकत त्यांना सांगितली. मग ज्योत्स्नाताईंनीही आपल्या लहानपणच्या काही आठवणी दिलखुलासपणे सांगितल्या.
– व. वा. इनामदार, वांद्रे पूर्व, मुंबई.
ज्योत्स्नाबाईंचा साधेपणा
संगीत व नाटय़क्षेत्रात कमालीचे कर्तृत्व व लोकप्रियता संपादन केलेल्या कलावंत ज्योत्स्ना भोळे यांच्यावर त्यांची कन्या वंदना खांडेकर यांनी जो लेख लिहिला आहे, त्यात त्यांनी ज्योत्स्नाताईंच्या कर्तृत्वाचे घडवलेले दर्शन पूर्णत: वस्तुस्थितीनिदर्शक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response