‘लोकरंग’मधील (२६ मे) ‘माझिया मना’ या सदरातील ‘माझं अवकाश’ हा लेख वाचला. हल्ली ज्या ‘स्पेस’चा उल्लेख आपण करतो, तेच हे अवकाश! लेखातील स्त्री, तिचा प्रश्न आणि लेखकानं त्यावर सुचवलेला उपाय हा मला थोडाफार ‘सन्मान्य तडजोड’ या स्वरूपाचा वाटला. मुळात िहदू विवाहपद्धतीत वैवाहिक जीवनात प्रवेश करणे म्हणजेच व्यक्तिगत आशाआकांक्षांना तिलांजली देणे असा अर्थ आहे. प्रजोत्पादन, त्यांचे संगोपन व अर्थार्जन करत असताना गृहस्थाने पाळायचे नियम आणि त्याच्या पत्नीने करायची कामे हे अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे. वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर, विशेषत: स्त्रीने आपले ‘अवकाश’ निर्माण करणे हे तसे सोपे नसते. लोक काय म्हणतील? नवरा काय म्हणेल? मुलांना हे आवडेल का? अशा असंख्य प्रश्नांनी ती घेरली जाते. आणि सरतेशेवटी ‘आहे ती परिस्थिती’ निमूटपणे स्वीकारते. मानसोपचारतज्ज्ञ तिला निराशेच्या गत्रेतून फार तर बाहेर काढू शकतील; परंतु तिचा मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो. यावर उपाय किंवा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ‘सुरुवात’ म्हणू हवे तर- प्रत्येक स्त्रीने आपले अवकाश तरुण वयातच निर्माण करावे असे मला वाटते. सांगायला अतिशय आनंद वाटतो की, मी माझ्यापुरते हे ‘अवकाश’ वयाच्या फार आधीच्या टप्प्यावर निर्माण केले आहे. केवळ अर्थार्जनाची संधी म्हणजे हे ‘अवकाश’ मुळीच नाही. ही आपल्यापुरती एक छोटीशी खासगी स्पेस आहे, जिच्यावर फक्त आपला आणि आपलाच हक्क असतो. जिथे स्त्रीला व्यक्त होता येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या या अवकाशाचा स्वीकार सर्वप्रथम ती स्वत: आणि नंतर तिचे कुटुंबीय अतिशय खुल्या दिलाने करतात. हा थोडा ‘प्रीव्हेंटिव्ह मेजर’ स्वरूपाचा तोडगा वाटेल, परंतु माझ्या दृष्टीने तरी तो उपयुक्त ठरला आहे .
– मेधा गोडबोले, विलेपाल्रे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा