गिरीश कुबेर यांचा (लोकरंग- १ सप्टेंबर) ‘मारेकरी डॉक्टर’ हा लेख अतिशय आवडला. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांनी सद्य:स्थितीत जगायचे कसे, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मते, हे सरकार जाऊन दुसरे सरकार आले तरी या परिस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही. कारण पूर्वीच्या सरकारने केलेल्या चुकीच्या गोष्टी सुधारायला नवीन सरकारला (पूर्ण बहुमत नसल्याने) फारसा वाव मिळत नाही. आपल्या सहकारी पक्षांना, आशेने पाहणाऱ्या नेत्यांना सांभाळण्यातच सत्ताधाऱ्यांची पाच वर्षे निघून जातात. बाकी लचके तोडायला पूर्वीचे सत्ताधारी तयार असतातच, असा याआधीचा अनुभव आहे. त्यामुळे आघाडय़ा, युत्या हे प्रयोग थांबविण्यासाठी किमान मतदानासाठी तरी मध्यमवर्गाने घराबाहेर पडले तरी बराच फरक पडेल. अण्णा हजारेंसारख्या नेत्यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी मतदान जागृती जरी केली तर ते फार मोठे समाजकार्य होईल.
– किरण गुळुंबे, पुणे.
देश वाचवायचा की सरकार?
‘मारेकरी डॉक्टर’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचकांच्या अर्थभानात मोठी भर टाकणारा होता. खरे तर गेल्या दोन महिन्यांत असे अनेक लेख ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले, की ज्यामुळे सामान्य वाचक देशातील आíथक स्थितीबद्दल जागरूक झाले. रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर यांचे आगमन असो की रुपयाच्या गटांगळ्या असोत, फेडरल बँकेच्या घोषणा असोत की अन्नसुरक्षा विधेयक असो- या प्रत्येक घटनेची शास्त्रशुद्ध चिकित्सा करून ‘लोकसत्ता’ने लोकांसमोर जे विश्लेषण मांडले त्यातून फार मोठी अर्थविषयक जागृती झाली आणि पर्यायाने आता ‘देश वाचवायचा की सरकार?’ असा विचार लोक करू लागले आहेत. आज जरी लोक सांप्रत सरकारचाच विचार करत असले तरी कोणाकडे पर्याय म्हणून अपेक्षेने पाहावे अशीही परिस्थिती नाही. असे असले तरी राजकीय स्वार्थासाठी देशाला आíथक समस्यांच्या खाईत लोटणारे सरकार वाचविण्यात अर्थ नाही, एवढा विचार तरी ते करू लागले आणि त्याबाबत समूहांत चर्चा करू लागले, हेही नसे थोडके. लोकांचे अर्थभान विकसित करण्याच्या या धोरणाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!
– प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक.
आíथक स्थितीचे चपखल वर्णन
‘मारेकरी डॉक्टर’ या लेखात गिरीश कुबेर यांनी देशाच्या सध्याच्या आíथक स्थितीचे चपखलपणे केलेले वर्णन धक्कादायक आहे. इतके सविस्तररीत्या आणि उत्कृष्ट वर्णन अर्थतज्ज्ञालाही जमले नसते. देशाच्या दुरवस्थेला सध्याचे सरकार जबाबदार असले तरी १९९२ पासून विस्कटलेल्या आíथक घडीस काँग्रेससह पूर्वीचे केंद्रातले भाजपचे सरकारही पूर्णपणे जबाबदार आहे. तसेच लोकसभेत बहुमत नसतानाही जे नरसिंह रावांना जमले ते डॉ. मनमोहन सिंगांना का जमले नाही? रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपद वा अर्थमंत्रीपद सांभाळण्याइतके पंतप्रधानपद सांभाळणे सोपे नाही, हे डॉ. सिंग यांना माहीत नव्हते असे नाही. पण राजकीय व प्रशासकांचे अधिकार वापरण्याचे कौशल्य डॉ. मनमोहन सिंग यांना जमले नाही. ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेस संजीवनी देण्यात संपूर्ण अपयशी ठरलेल्या सरकारचे ते प्रमुख आहेत. कुबेरांनी आपल्या लेखात बँकेच्या थकित कर्जाविषयी जी धक्कादायक माहिती दिली आहे ती अर्थमंत्र्याना माहीत नसेल असे कसे म्हणता येईल? यापूर्वी इंडियन बँक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आणण्याचा त्यांच्यावर आरोप होता. आíथक सुधारणांच्या नावाखाली एकीकडे सबसिडी घटवण्यात येते, तर त्याच मुद्दय़ावर जनतेला कॅश ट्रान्स्फरच्या नावाखाली पसे वाटले जातात. यातून वित्तीय तूट कशी कमी होणार? देशहितापेक्षा पक्षीय हित जपण्याच्या नादात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांनी देशाच्या अर्थकारणाचे तीन-तेरा वाजवले आहेत. ‘गरिबी हटाव’ ते ‘आम आदमी’ या घोषणेअंतर्गत बँकांना बुडीत कर्जात ढकलून त्या राबविण्यात आल्या आहेत. अन्नसुरक्षा विधेयकात तेवढय़ा अन्नधान्याचे उत्पादन होत नसताना  गरीबांच्या नावाखाली देशात फुकटखाऊंची संख्या वाढविण्याचे काम चालले आहे. चीन व जपानसारख्या देशांमध्ये जनतेस ऐतखाऊ आणि कष्टाविना कोणतेही अनुदान देण्यात येत नाही. पण कर्जमाफी व तत्सम अनेक योजनांमार्फत लोकांच्या जनकल्याण योजना राबवीत असल्याच्या प्रचाराने देशात शेवटी अशा योजनांना पसा येणार कोठून, याचे सरकारकडे उत्तर नाही. तशात घोटाळ्यांच्या अनेक प्रकरणांत कोटी कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराने जगात आपली नाचक्की झालेलीच आहे.
– पुरुषोत्तम तडवळकर, पुणे.

६ गिरीश कुबेर यांचा ‘मारेकरी डॉक्टर’ हा लेख वाचला. खरंच चीड येते या राजकारण्यांची! माझा मुलगा पाचवीत आहे, त्याने जर विचारलं की या देशात का राहू? तर त्याला उत्तर काय द्यायचे?
– शंतनू लिमये.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी

६ ‘मारेकरी डॉक्टर’ हा उत्तम लेख लिहिल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. हा लेख वाचल्यानंतर मनात येतं की, सद्य: आर्थिक परिस्थितीसंदर्भात सामान्य माणूस काय करू शकतो? आपण याबाबतही लिहिलंत तर आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील असं वाटतं.
– डॉ. रमाकांत गोवंडे.
धून झंकारली..
संगीतकार आनंद मोडक रविवारच्या ‘लोकरंग’मधून सुरेल असे ‘स्मरणस्वर’ छेडीत असतात. ११ ऑगस्टच्या ‘त्यांची धून झंकारली’ने अशाच अनेक स्मृतींच्या तारा छेडल्या गेल्या.
‘कोहिनूर’मधल्या दिलीपसाहेबांच्या अदाकारीची आठवण मोडकांनी करून दिली आणि लगेच डोळ्यांसमोर ‘मेरे हुजूर’मध्ये ‘झनक झनक तोरे बाजे पायलीया’च्या वेळचा सतार छेडणारा राजकुमार, ‘दिल एक मंदिर’मध्ये ‘रूक जा ठहर जा रे चंदा’ गाण्याच्या वेळी सतारीवर बोटे फिरवणारी कारुण्यमूर्ती मीनाकुमारी (तिच्या राजकुमारच्या डोळ्यांतील प्रतिमेसह), ‘दस्तक’मधली ‘बैया ना धरो’ म्हणणारी रेहाना सतारीसकट डोळ्यांसमोर तरळून गेली. सतारीचा उत्कृष्ट उपयोग केलेल्या या गाण्यांबरोबरच ‘रसिक बलमा’ किंवा आपलं मराठीतलं ‘मलमली तारुण्य माझे’ कानात झंकारायला लागलं.
‘संगम’मधल्या ‘दोस्त दोस्त ना रहा’चे पियानोचे स्वर थेट घेऊन गेले ‘वक्त’मधल्या ‘कौन आया के निगाहो में’ म्हणणाऱ्या साधनाजवळ. आणि ‘सूर तेचि छेडिता’ म्हणणाऱ्या ‘अपराध’मधल्या रमेश देव यांच्याजवळ. ‘संगम’मध्येच ‘हर दिल जो प्यार करेगा’च्या वेळेस आणि ‘कल, आज और कल’मधल्या ‘एक दिन बीक जाएगा’च्या वेळेस राजसाहेबांनी वापरलेलं अ‍ॅकॉर्डियन त्यांचं आणि शंकर-जयकिशनजींचं या वाद्यावर किती प्रेम होतं ते दाखवून गेलं.
याव्यतिरिक्त ‘मुझे घेर लेते’ (‘प्रेमपरबत’) गीत, ‘आजा तुझको पुकारे मेरे गीत’मधील बासरी;  ‘यारी है इमान मेरा’ (‘जंजीर’), ‘चप्पा चप्पा चरखा चले’ (माचिस)मध्ये वापरलेला रबाब, ‘आ लौट के आजा मेरे मीत’, ‘टूटे हुए ख्बाबों ने’, ‘तकदीर का फसाना’मध्ये वापरलेली शहनाई; ‘खिलौना’, ‘उमराव जान’, ‘पाकिजा’सारख्या चित्रपटांतील दिल खेचून घेणारी सारंगी.. हे सगळं आठवलं की आपल्या संगीतात सुयोग्य वाद्यांचा अचूक उपयोग करणाऱ्या त्या ‘विचारी’ संगीतकारांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. आनंदजी, आपण या लेखात सूरवाद्यांची खुशबू स्मरणकुपीतून बाहेर काढलीत, आता तालवाद्यांचा करिश्मा निनादू द्या.

– शाम पाडेकर, नाशिक.
दीपपूजनाचे महत्त्व
‘बालमैफल’मधील ‘देह जळो अन् जग उजळो’ हा सुचित्रा साठे यांचा लेख सुंदर व प्रबोधनकारक होता. वाचकांना दिव्याचा जन्म कसा झाला, त्यांत कसकसा बदल झाला, हे समजले. लहानपणी मी गावी जात असे तेव्हा मामा संध्याकाळी कंदीलाची काच व भिंतीवरील दिव्याची काच साफ करून चकाचक करीत असे. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून ते आम्ही लावत असू. गावातील लोक कंदिलाला ‘फाणस’ म्हणत. लग्नकार्यात व गणपतीमध्ये पेट्रोमॅक्सचा वापर प्रकर्षांने होत असे. तरीही पणतीचे महत्त्व कमी झालेले नाही. मंदिरातील तेल टाकून लावलेले दीपमाळेचे दृश्य नयनमनोहर असते. आपल्या संस्कृतीतील दिव्यांचे महत्त्व लहान मुलांना समजावून सांगायला हवे. शुभकार्यामध्ये निरांजन व लग्नकार्यामध्ये लामणदिव्याचे महत्त्व या आधुनिक विजेच्या जमान्यामध्येसुद्धा आहे व राहील.     ल्ल
किशोर नारायण श्रीवर्धनकर, नवी मुंबई.

Story img Loader