सईंनी जागवली ‘सय’
‘लोकरंग’मधील (३० मार्च) सई परांजपे यांच्या लेखाने अनेक आठवणी जाग्या झाल्या. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘ईस्ट-वेस्ट कल्चरल असोसिएशन’तर्फे आम्ही पॅरिस आणि कोग्नॅक या ठिकाणी फ्रेंच कुटुंबात ४-५ आठवडे राहिलो होतो. त्या वेळी नेहमीच्या प्रसिद्ध ठिकाणांहून वेगळ्या इतर अनेक दुर्मीळ, ऐतिहासिक महत्त्वाच्या, पण ‘टुरिस्ट स्पॉट’ नसणाऱ्या अशा काही जागा आम्हाला आवर्जून दाखवल्या होत्या. सईंनी केलेल्या नाटय़गृहांच्या, नाटय़प्रयोगांच्या सुंदर वर्णनामुळे त्या जादुई दिवसांची आठवण झाली आणि माझी ‘जी ले दोबारा’ अशी अवस्था झाली.
या लेखाच्या उत्तरार्धात वसंताच्या आगमनाने मोहोरलेल्या पॅरिसचं वर्णन तर अगदी लाजवाब आहे. जन्मजात असलेली अंगभूत रसिकता, सौंदर्यासक्ती, नावीन्याची ओढ असलेल्या कलासक्त फ्रेंच माणसांना वसंताची जादूची छडी खरंच आणखीनच सुंदर, तरुण व धीट बनवते. फुटपाथवर कॅफेमध्ये बसून दिसणारं वाहतं सौंदर्य काय किंवा लक्झेम्बर्गच्या वा कोणत्याही बागेतील इकडेतिकडे चोहीकडे दिसणाऱ्या प्रेमपुराचे वा ‘ऊ-ला-ला’ या तारुण्यसुलभ सहज उद्गारातील मौजमजा तंतोतंत वर्णन करताना सई यांचा मिस्कीलपणा दाद देण्याजोगा आहे. रसिल्या, रंगील्या पॅरिसचं हे शब्दचित्र उत्तरोत्तर चढत्या श्रेणीने अधिकच रंगत गेले आहे. सईंच्या सहज स्वाभाविक आणि उत्स्फूर्त लेखनशैलीमुळे या साऱ्या आठवणी छान माहितीपूर्ण व रंगतदार झाल्या आहेत. सुंदर, अभिरुचीपूर्ण नाटके, सिनेमे व गजरा यांसारखे प्रसन्न कार्यक्रम देणाऱ्या सई परांजपे खूप मोठय़ा कालावधीनंतर या लिखाणामधून पुन्हा भेटल्यामुळे खूप आनंद झाला.
– सुषमा साने
पडसाद
सईंनी जागवली ‘सय’ ‘लोकरंग’मधील (३० मार्च) सई परांजपे यांच्या लेखाने अनेक आठवणी जाग्या झाल्या. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘ईस्ट-वेस्ट कल्चरल असोसिएशन’तर्फे आम्ही पॅरिस आणि कोग्नॅक या ठिकाणी फ्रेंच कुटुंबात ४-५ आठवडे राहिलो होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response