स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी ८५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्या निमित्ताने ‘लोकरंग’   (२९ सप्टेंबर) पुरवणीतील ‘स्वरांचा परीसस्पर्श’ हा विभाग हृदयाला स्पर्शून गेला. आजच्या पिढीला लतादीदींच्या गाण्याबद्दल वाटणारी ओढ आणि मनातील कृतज्ञतेचा भाव विविध संगीतकारांच्या आणि गायिकांच्या शब्दांतून व्यक्त झाला आहे. लतादीदींच्या आवाजाची जादूच अशी विलक्षण आहे की, माणसांच्या आयुष्यात जोपर्यंत सुख, दु:ख, आनंद, प्रेम, विरह, राग, लोभ, भक्ती इत्यादी भावनांना स्थान आहे, तोपर्यंत आजच्याच काय, पण पुढील कित्येक पिढय़ांना ती भुरळ घालेल! लतादीदींची गाणी ऐकणे आणि आपले कान व मन तृप्त करून घेणे हा त्यांच्या इतर लाखो रसिकांप्रमाणे माझाही एक आवडता छंद आहे. आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!
– नारायण के. ताले, पुणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्लेख खटकला
‘लोकरंग’ (८ सप्टेंबर) मधील ‘सूरा मी वंदिले’ हा सुधीर गाडगीळ यांचा चिरतरुण सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पाश्र्वगायनाचा लेखाजोखा मांडणारा लेख वाचला. लेख सुंदर व अप्रतिम आहे. परंतु ‘महाराष्ट्रानं दोन भोसल्यांना सतत वंदन केलंय. छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि दुसऱ्या आशा भोसले’ हा लेखाच्या सुरुवातीलाच केलेला उल्लेख मात्र खटकला.
–    धनराज खरटमल, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई.

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response to article