कमलाकर नाडकर्णी यांचे बालरंगभूमीबाबतचे दोन लेख वाचले. मराठी बालरंगभूमीसाठी (बऱ्यापैकी) भरीव योगदान देणाऱ्या (कै.) नरेंद्र बल्लाळ यांचा एका ओळीत आणि तोही ओझरता उल्लेख करून नाडकर्णी यांनी बल्लाळ यांच्यावर अन्याय केला आहे. बल्लाळ माझे वडील होते म्हणून मला ही गोष्ट खटकली नाही तर मराठी बालरंगभूमीने बाळसेही धरले नव्हते, त्या काळात तिला शक्ती आणि आत्मविश्वास देण्यासाठी १९६८ साली पहिली मराठी बालनाटय़ परिषद त्यांनी स्थापन केली. त्याचे उद्घाटन गजानन जहागीरदार यांनी केले होते. पुरुषोत्तम दारव्हेकर, भालचंद्र कोल्हटकर आणि विजय तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज त्यास उपस्थित होते. सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी यांनाही बल्लाळ यांनी आपल्याबरोबर नि:स्पृहपणे घेतले होते. मराठी बालरंगभूमीला गांभीर्याने घेतले जावे असेच बल्लाळ यांना वाटत होते. एक प्रकारे त्यांनी बालरंगभूमीकडे सर्वाचे लक्ष वेधले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा