याआधी मी प्रसंगाप्रसंगाने मला आवडलेली पुस्तके सांगितली आहेत. आता सांगत असलेली पुस्तके नजीकच्या काळातली आणि आता उपलब्ध असलेली अशीच आहेत. शिवाय आवडलेलीही आहेत.
आवडती पुस्तके
१. गाथा सप्तशती – स. आ. जोगळेकर
२. गर्जा महाराष्ट्र – डॉ. सदानंद मोरे
३. दलित पँथर : एक संघर्ष   – नामदेव ढसाळ
४. प्रतिस्पर्धी – किरण नगरकर, अनुवाद – रेखा सबनीस
५. माय नेम इज रेड – ओरहान पामुक, अनुवाद – गणेश विसपुते               
६. माणूस, त्याचा समाज व बदल – सुधाकर गायकवाड
७. खेळघर – रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ              
८. बोलावें तें आम्ही – श्रीकांत देशमुख
९. चित्रव्यूहचलच्चित्रव्यूह – अरुण खोपकर 
१०. लोकशाहीवादी अम्मीस.. दीर्घपत्र – सईद मिर्झा, अनुवाद- मिलिद चंपानेरकर                 
नावडती पुस्तके
लेखनाचा पोत आणि माझी वैयक्तिक गरज याआधारेच मी पुस्तकांच्या वाटेला जातो. त्यामुळे निराशा अपवादानेच वाटय़ाला येते. तरीही काही वेळा एखादे पुस्तक अध्र्यावरून सोडावे लागते, ते आवडले नाही म्हणूनच. पण त्यांची यादी नको.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा