मनोहर पारनेरकर

samdhun12@gmail.com

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

तुमचं जर सिनेमावर खरंच प्रेम असेल आणि हे माध्यम म्हणजे निव्वळ करमणुकीचा एक प्रकार नसून ती एक कलादेखील असू शकते असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा महान सिनेमा अगोदरच बघितला असेल! आणि जर बघितला नसेल तर लवकरात लवकर तो बघून टाका (त्याची १९८९ मधील आवृत्ती)

हा सिनेमा २१६ मिनिटांचा आहे. (म्हणजे तो आपल्या शोले या सिनेमापेक्षाही लांबीने मोठा आहे) या भव्यदिव्य चित्रपटाचा दिग्दर्शक ‘डेव्हिड लीन’ होता. १९६२ सालीतील या चित्रपटाला ऑस्करसाठी १० नामांकनं होती आणि त्याला ७ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि डेव्हिड लीनला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाने स्टीव्हन स्पीलबर्गपासून ते रिडली स्कॉट (२०१२ साली निर्मिलेल्या ‘प्रोमेथियस’ या गाजलेल्या सायन्स फिक्शन चित्रपटाचा दिग्दर्शक) पर्यंतच्या अनेक दिग्दर्शकांना प्रभावित केलं आहे.

टी. ई. लॉरेन्स- ज्याच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवला गेला आहे, ही एक अतिशय धाडसी व्यक्ती. कवी, अभ्यासक आणि योद्धा अशा विविध प्रकारच्या पलूंनी त्याचं सुरस आयुष्य भरलेलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिश सरकारचा एक सन्याधिकारी म्हणून तो मध्यपूर्वेत कार्यरत होता आणि तुर्कीविरुद्धच्या अरबांच्या बंडात त्यानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

लॉरेन्स हे अतिशय गूढ आणि अनाकलनीय व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्यात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना आणि अनेक विरोधाभासांनी भर घातली होती. पीटरने हे सर्व परस्परविरोधी पैलू आणि त्यांच्या छटा आपल्या भूमिकेतून अत्यंत सुंदर रितीने आणि समर्थपणे सादर केल्या आहेत.

हा लेख या डेव्हिड लीनच्या गाजलेल्या सिनेमाबद्दल नसून, तो मुख्यत: पीटर ओ’टूल आणि ओमार शरीफ यांच्याबद्दल आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत ते दोघेही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्टार झाले. पीटर ओ’टूलला टी. ई. लॉरेन्सच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्कर पारितोषिक मिळालं, तर अरब टोळीप्रमुखाच्या भूमिकेबद्दल ओमार शरीफला साहाय्यक अभिनेत्याचं ऑस्कर पारितोषिक मिळालं. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघेही एकमेकांचे आजन्म मित्र झाले. या दोन्ही वल्ली अत्यंत सदोष किंवा ज्याला आपल्याला  seriously flawed म्हणता येईल अशा होत्या. त्यातून ओमार पीटरपेक्षा जरा जास्तच सदोष होता.

त्यातली आश्चर्यकारक गोष्ट अशी की, ते दोघेही एकाच साली जन्मले होते आणि त्यांचा मृत्यूदेखील दोन-एक वर्षांच्या अंतराने झाला. या लेखात नंतर मी डेव्हिड आणि त्या अनुषंगाने या सिनेमाच्या संदर्भातल्या दोन-तीन अतिशय मजेशीर, पण तुलनेने कमी माहीत असलेल्या  गोष्टी सांगणार आहे, पण आधी पीटर आणि ओमार यांच्याबद्दल.

पीटर ओ’टूल ( १९३२-२०१३)

या लेखाच्या मर्यादेत पीटर ओ’टूलच्या लार्जर दॅन लाईफ आणि त्याच्या कलाकार म्हणून असलेल्या उत्तुंग कारकीर्दीला संपूर्ण न्याय देणं कठीण आहे. म्हणून मी त्यांच्या अभिनयातल्या अष्टपलुत्वाबद्दल आणि त्याच्या वैशिष्टय़पूर्ण, पण जराशा तिरकस, सूक्ष्म आणि खास ब्रिटिश विनोदबुद्धीबद्दल थोडक्यात सांगणार आहे. नट म्हणून पीटर हा सरडय़ासारखा होता. तो जी भूमिका करायचा त्याप्रमाणे त्यांचे रंग बदलायचा आणि संपूर्ण सिनेमाभर त्यांचं हे ‘बेअिरग’ टिकवायचा. विविध प्रकारच्या अनेक भूमिका तो अतिशय सहजतेने करायचा आणि त्या पात्राला विश्वासार्हता प्राप्त करून द्यायचा. पीटरने ज्या विविध प्रकारच्या भूमिका अतिशय समर्थपणे केल्या आहेत, त्यावर एक नजर जरी टाकली तरी आपल्याला आश्चर्याने थक्क व्हायला होतं. त्याची काही उदाहरणं : १) टी. ई. लॉरेन्स (लॉरेन्स ऑफ अरेबिया) २) जीझस ख्राइस्ट आणि जॅक द रिपर (द रुलिंग क्लास) ३) हॅम्लेट (हॅम्लेट) ४) पोप पॉल (द टय़ुडर) ५) एक सिने दिग्दर्शक (द स्टंट मॅन) ६) किंग हेन्री (‘बेकेट’ आणि ‘द लायन ऑफ विंटर’ या दोन्ही चित्रपटांत) ७) कॅसानोव्हा (बी. बी. सी.वरची याच नावाची एक नाटय़मालिका ) आणि ८) आर्थर चिपिंग (गुडबाय मिस्टर चिप्स).

आणि आता खास त्याच्या पीटर ब्रॅन्डच्या विनोदाचे दोन नमुने. एका मुलाखतकाराने पीटरला जेव्हा हा प्रश्न विचारला की ‘‘तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता?’’ त्या वेळी पीटरची प्रकृती मुळीच चांगली नव्हती. त्यावर त्याचे उत्तर असे- ‘‘माझे नियमित व्यायाम करणारे जे मित्र शवपेटीत विसावले आहेत त्यांच्या शवपेटय़ांच्या मागे चालणे हाच माझा एकमेव व्यायाम आता उरला आहे.’’ आयुष्याच्या शेवटी त्याला जेव्हा एका मुलाखकाराने त्याच्या प्रेमजीवनाबद्दल विचारलं तेव्हा पीटर उत्तरला, ‘‘जॉर्ज इलियट ही माझी न बदलणारी प्रेयसी आहे. आम्ही दोघंही दर रात्री एकत्र झोपतो.’’ मेरी अ‍ॅन इव्हान्स या व्हिक्टोरियन काळातील एका प्रसिद्ध कवयित्रीचं/ लेखिकेचं जॉर्ज इलियट हे टोपण नाव होतं. आपलं लिखाण गंभीरपणे घेतलं जावं आणि आपलं खाजगी आयुष्य प्रकाशात येऊ नये म्हणून १४० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या या लेखिकेने हे टोपणनाव निवडलं होतं. हे जर वाचकाला माहीत नसेल तर या विनोदातला सूक्ष्मपणा हरवून जाईल.

ओमार शरीफ (१९३२-२०१५)

ओमार शरीफ हा इजिप्शियन होता हे खरं आहे, पण सर्वसाधारण  समजाप्रमाणे तो मुस्लीम मात्र नव्हता. त्याचे आई-वडील हे लेबनीज-सीरियन ख्रिश्चन होते आणि त्याचं मूळ नाव मायकेल चॅलहौब असं होतं. त्याच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती चांगली होती. प्रथम एका खाजगी शाळेत आणि नंतर कैरो युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं शिक्षण झालं होतं. इंग्लिश आणि फ्रेंच या दोन्ही भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. इजिप्शियन सिनेजगतात तो जरी तसा नावारूपाला आलेला होता तरी लॉरेन्स ऑफ अरेबिया या चित्रपटानंतर त्यांच्या कारकीर्दीला विलक्षण कलाटणी मिळाली. तो एकदा म्हणाला होता, ‘‘मी जर लॉरेन्स ऑफ अरेबियामध्ये काम केलं नसतं, तर मी कदाचित कैरोमध्येच राहिलो असतो. मला अर्धा डझन मुलं आणि अनेक नातू झाले असते.’’

पण ओमारने आपाली प्रतिभा आणि क्षमता यांचा वापर नीट केला नाही. आणि कुठल्याही सुमार चित्रपटात फालतू भूमिका देखील केल्या.  आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यानं जुगार खेळणं सोडून दिलं. इतकंच काय, पण ब्रिजदेखील खेळणं सोडून दिलं होतं. (तो एक जागतिक पातळीचा ब्रिज खेळाडू होता आणि बरीच वर्ष ‘श्किागो ट्रिब्यून’ या वृत्तपत्रासाठी ब्रिजवर सदर लिहीत असे.)

ओमारला एक प्रकारचा  all-purpose international look’‘ प्राप्त होता. त्यामुळे त्याला अनेक वैविध्यपूर्ण अशा भूमिका उत्तमपणे करता आल्या. उदाहरणार्थ : शेरीफ अली (लॉरेन्स ऑफ अरेबिया), स्पॅनिश धर्मगुरू (बिहोल्ड द हॉर्सेस), चेंगिझखान या कॉमिक स्ट्रीपमधील प्रमुख भूमिका, नाझी अधिकारी (द नाईट ऑफ द जनरल्स) आणि चे गव्हेरा (चे गव्हेरा).

आता थोडं सुखावह विषयांतर. आपली मराठी मुलगी सोनाली कुलकर्णी हिला जेव्हा ओमार शरीफ म्हणाला होता की, ‘‘तू सुंदर आहेस आणि तुझा  ‘international’’ लुक नजरेला लुभावणारा आहे,’’ तेव्हा ती अर्थातच खूप सुखावली होती. पण या एवढय़ा मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्टारला सोनाली कुलकर्णी भेटलीच कशी आणि कुठे, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. या दोघांनी ‘फुओको दी सु’ (माझ्या हृदयातली आग) या २००५ सालच्या इटालियन चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यातल्या मुख्य स्त्री भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णीला अत्यंत प्रतिष्ठेच्या २००६ सालच्या ‘मिलान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं होतं. आणि आता या सिनेमाबद्दलच्या भारतीय संबंधाबद्दल. आधी सांगितल्याप्रमाणे, याबद्दल मी दोन-तीन अतिशय मनोरंजक गोष्टी सांगतो.

दिलीप कुमारचे असंख्य चाहते आतापर्यंत सतत एक प्रश्न विचारत आले आहेत आणि तो असा- ‘‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटासाठी दिलीपसाहेबांना विचारलं होतं का?’’ तर ‘हो’ असं याचं उत्तर आहे. शेरीफ अली या भूमिकेबद्दल डेव्हिड लीनने दिलीप कुमारला सर्वप्रथम विचारलं होतं. पण त्यानं ही भूमिका का नाकारली हे आजही गूढ आहे; निदान मला तरी. ‘द शॅडो अँड सबस्टन्स’ या आपल्या आत्मचरित्रातदेखील त्यानं यावर काहीही प्रकाश टाकलेला नाही.

या गोष्टीला जरा आता नीट सामोरं जाऊ या. त्या वेळी दिलीप कुमार हा भारतीय उपखंडात घराघरात पोहोचलेलं नाव असलं तरी त्यामानाने पाश्चात्त्यजगतात ते अपरिचित होते. ही भूमिका त्यांच्याकडे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे डेव्हिड लीनची भारतीय पत्नी लीला मतकर हे होतं. डेव्हिड लीनने एकूण सहा लग्नं केली. लीला मतकर ही त्याची चौथी पत्नी. (लीला अतिशय सुंदर असून हैदराबादच्या निजामाच्या सेवेत असलेल्या प्रो. वेलिंगकरांची ती कन्या होती. (लीलाचा घटस्फोट झाला होता आणि तिचा पहिला पती चंद्रसेन मतकर हा इंदोरच्या महाराजा  होळकरांचा नातेवाईक होता) दिलीप कुमारच्या अनेक भक्तांना असं वाटतं की जर दिलीपसाहेबांनी ही भूमिका स्वीकारली असती तर त्यांनी ती ओमार शरीफपेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगली केली असती. शिवाय या भूमिकेमुळे त्यांना हॉलीवूडचे दरवाजे तर खुले झालेच असते आणि डेव्हिड लीनच्या ‘पॅसेज टू इंडिया’ या पुढच्या चित्रपटातील डॉ. अझीझ ही अतिशय गाजलेली भूमिकादेखील मिळाली असती. आणि यानंतर दिलीपसाब ग्रेगरी पेक आणि मार्लन ब्रान्डो यांच्यासारख्या हॉलीवूड स्टार्सच्या पंगतीत जाऊन बसले असते.

याबद्दल माझं मत असं की, या अशा तऱ्हेची भाकितं नेहमीच एक प्रकारच्या कल्पनारम्यतेच्या जगात मोडतात. सर अलेक गिनेस, अ‍ॅन्थनी क्विन, जोझ फेरर, जॅक हॉकिन्स यांसारख्या तगडय़ा स्टारकास्टमध्ये आपण झाकोळून गेलो असतो हे मला वाटतं आपल्या चतुर आणि समंजस युसुफसाहेबांना कळून चुकलं असणार. शिवाय, लीन यांच्या ताठर स्वभावाशीदेखील त्यांना जुळवून घ्यावं लागलं असतं ते वेगळंच. मागे वळून पाहताना व्यक्तिश: मला असं वाटतं की, दिलीप कुमारनं आपल्या दीर्घ कारकीर्दीत ‘न खेळलेली’ ही सर्वोत्तम खेळी होती. ‘‘शेरीफ अली ही भूमिका पडद्यावर ओमार शरीफपेक्षा मी काही जास्त चांगली साकारू शकलो नसतो,’’ असं या मुत्सद्दी सद्गृहस्थाने म्हणून ठेवल्याची नोंद आहे.

आय. एस. जोहर यांची या चित्रपटातील छोटीशी भूमिका पण हो, या चित्रपटाचा थेट भारताशी संबंध अगदी छोटासा का होईना, पण आला होता.

हा संबंध म्हणजे, या चित्रपटातील गासिम नावाच्या बदाऊनी टोळीवाल्याची भूमिका आपला विनोदी नट आय. एस. जोहरने केली होती. या दोन मिनिटं लांबीच्या भूमिकेमध्ये आपल्या इंदरजीत सिंग जोहर यांना काय काम करायचं होतं- तर खूप थकल्याचा अभिनय करून उंटावरून खाली पडायचं आणि लॉरेन्स यांच्या हातून मरण पावायचं. पण ही छोटीशी भूमिका आपल्या जोहरसाहेबांनी जरा जास्तच उत्साहानं केली आहे.

Story img Loader