प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युद्ध हे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढलं जातं. त्यातील एक महत्त्वाची पातळी म्हणजे सांस्कृतिक पातळी. म्हणजे युद्ध सुरू असताना आपल्या सैनिकांचं व नागरिकांचं मनोधैर्य वाढावं आणि शत्रुपक्षाचं खचावं म्हणून स्वयंप्रेरणेनं किंवा काही वेळेस खास मुद्दाम जोर लावून काही कलाकृती सादर केल्या जातात. अर्थात युद्धकाळात दोन्हीचंही महत्त्व आहेच आहे. कविता, गाणी, नाटक, चित्रपट यांच्याबरोबरीने व्यंगचित्रांचंही मोठं योगदान युद्धकाळात असतं. शत्रूच्या कृतीची किंवा त्यांच्या नेत्यांची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रं मुद्दाम काढली जातात. काही पोस्टर्सही प्रचारासाठी तयार केली जातात- ज्यात व्यंगचित्रांना प्राधान्य असतं. त्यांना‘ प्रोपोगंडा कार्टून्स’ म्हणतात. युद्धकाळात अनेक राष्ट्रांनी हे माध्यम प्रभावीपणे वापरलं आहे. शत्रूच्या प्रदेशात अशी व्यंगचित्रं किंवा व्यंगचित्रयुक्त पोस्टर्स विमानातून फेकण्याचं हे तंत्र दुसऱ्या महायुद्धात सर्रास वापरलं गेलं.

दुसऱ्या महायुद्धात अनेक व्यंगचित्रकारांनी अक्षरश: प्राण पणाला लावून धमक्यांना न घाबरता, शत्रूच्या उघड किंवा छुप्या हल्लय़ांना तोंड देत स्वत:च्या राष्ट्रासाठी व्यंगचित्रं काढली. ‘कार्टून्स ऑफ वर्ल्ड वॉर टू’ (संपादक : टोनी हसबंड) या संग्रहात अशी अनेक खास व्यंगचित्रं आहेत.

या महायुद्धात पराक्रमाची शर्थ करणारं आणि सरतेशेवटी जेते ठरलेलं एक राष्ट्र म्हणजे रशिया! सदैव अंतर्गत लढाया, क्रांत्या, रक्तपात, अस्थैर्य, नैसर्गिक आपत्ती आणि महायुद्धं अशा संकटांतही रशियन सांस्कृतिक जीवन स्वत:चं अस्तित्व टिकवून होतं. या संकटकाळातही जगप्रसिद्ध लेखक, चित्रकार, कवी, वास्तुतज्ज्ञ, शिल्पकार यांनी उमेद सोडली नाही. ते नवनिर्मिती करत राहिले. साहजिकच गेल्या शतकात नव्याने रुजत चाललेल्या व्यंगचित्रकलेला रशियात मानाचं स्थान मिळालं. याचं स्पष्ट कारण म्हणजे सत्ताधीशांना या कलेचं महत्त्व पटलं होतं.

विक्टर डॅनी हा प्रचारक व्यंगचित्रकार. हिटलरविषयी त्याला पराकोटीची घृणा होती. तीच त्याने त्याच्या पोस्टरमधून मांडली. ‘एखाद्या बुटात घुसलेल्या डुकराच्या पिल्लाला विज्ञान, विद्यापीठ, संस्कृती वगैरे काय कळणार? त्याचं क्षितीज खूप तोकडं असतं..’ अशा आशयाच्या ओळी त्याने आपल्या एका चित्राखाली लिहिल्या आहेत. या चित्रात बूट हे नाझी सेनेचं प्रतीक मानता येईल. साहजिकच हे व्यंगचित्र (पोस्टर) खूप गाजलं.

१९२० च्या सुमारास मॉस्कोमधील एका आर्ट स्कूलमध्ये तीन समवयस्क तरुण चित्रकार विद्यार्थी गप्पा मारत बसले होते. तिघांचीही एकत्र येऊन काहीतरी काम करण्याची इच्छा होती. आणि स्थानिक विषयांचा त्यांना कंटाळा आला होता. नुकत्याच झालेल्या क्रांतीची नशा त्यांच्या डोक्यात होतीच. त्यांनी एकत्र येऊन व्यंगचित्रं काढण्याचा निर्णय घेतला. आपापल्या नावातील प्रमुख अक्षरं एकत्र करून त्यांनी ‘कुक्रिनिस्की’ हे टोपणनाव खास व्यंगचित्रांसाठी धारण केलं आणि त्यांची व्यंगचित्रं अनेक सरकारी प्रकाशनांतून प्रसारित होऊ लागली. हिटलरविषयी समाजामध्ये संताप निर्माण होईल आणि लोकमत जागृत होईल अशी व्यंगचित्रं त्यांनी रेखाटली. आर्ट  स्कूलचे विद्यार्थी असल्याने अर्कचित्र, चेहऱ्यावरील हावभाव, काळ्या-पांढऱ्या रंगांचा वापर, बारीकसारीक तपशील यामुळे त्यांची चित्रं प्रभावी वाटतात. मॅक्सिम गॉर्की या सुप्रसिद्ध रशियन लेखकाने या त्रिकुटाला नैतिक पाठबळ दिलं होतं.

उदाहरण म्हणून कुक्रिनिस्की यांचं सोबतचं कार्टून पाहता येईल. या चित्रात मेंढीशी अत्यंत प्रेमाने वागणारा हिटलर एका अबलेची मात्र सहज हत्या करू शकतो! हे त्याचं दुहेरी व्यक्तिमत्त्व चित्रात प्रभावीपणे रेखाटलेलं आहे.

तत्कालीन रशियन व्यंगचित्रकारांमध्ये सर्वात प्रभावी आणि मोठं नाव म्हणजे बोरीस एफीमोव! ते प्रचंड मोठं आयुष्य जगले. १९०० सालचा त्यांचा जन्म. त्यांनी झारला पाहिलं. पहिलं महायुद्ध अनुभवलं. लेनिनची क्रांती पाहिली. दुसरं महायुद्ध, स्टॅलिन, शीतयुद्ध, रशियाचं विघटन.. आणि अगदी परवा परवापर्यंत त्यांनी पुतिन यांना मतदानही केलं!! असं तब्बल १०९ वर्षांचं समाधानी आयुष्य ते जगले!!

१९२४ साली त्यांच्या व्यंगचित्रांच्या संग्रहाला कम्युनिस्ट विचारवंत व बंडखोर नेते ट्रोटस्की यांनी प्रस्तावना लिहिली. पण संपादक ते पुस्तक छापायला तयार होईनात. कारण स्टॅलिन यांच्याशी दुश्मनी घ्यायला कोणी तयार नव्हतं. अखेरीस संपादकांनी नाइलाजाने पुस्तक छापलं. ट्रोटस्की यांनी नंतर देशांतर केलं आणि स्टॅलिन यांनी संपादकाला फाशी दिली. खुद्द व्यंगचित्रकारालाही फाशी दिली जाण्याची शक्यता होती; परंतु स्टॅलिन यांनी त्याला अभय दिलं. याचं कारण स्टॅलिन यांनी व्यंगचित्र या माध्यमाचं महत्त्व जाणलं होतं. हा माणूस पुढे उपयोगी पडेल, हा त्यांचा त्यामागचा हेतू होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बोरीस एफीमोव यांनी असंख्य व्यंगचित्रं काढली. ती अर्थातच हिटलरविरोधी होती. त्यामुळे हिटलर- जो स्वत: व्यंगचित्रांच्या बाबतीत फार जागरूक होता- त्यालाही या व्यंगचित्रांमुळे संताप यायला लागला. त्यामुळे मॉस्को जिंकल्यानंतर ज्यांना फाशी द्यायचं असं हिटलरने ठरवलं होतं, त्या यादीत बोरीस एफीमोव या व्यंगचित्रकाराचा अग्रक्रम होता!!

अनेक व्यंगचित्रांतून त्यांनी स्वस्तिक या नाझी राजवटीच्या चिन्हाचा मोठय़ा कल्पकतेनं आणि प्रभावीपणे वापर केलेला आहे.

त्यांच्याच दुसऱ्या चित्रात जगाच्या शाळेत हिटलर हा घाबरलेला, बिच्चारा शाळकरी मुलगा म्हणून दिसतोय. भिंतीवरच्या नकाशावर ‘मॉस्को’ लिहिलेलं आहे. याचा अर्थ जर्मनी-रशियाचं युद्ध ही या चित्राची पाश्र्वभूमी आहे. चित्रात पाठमोरा नेपोलियन (त्याचाही रशियामध्ये पराभव झाला होता.) हिटलरला बजावतोय, ‘हिटलर, तू इतिहासापासून काहीच शिकत नाहीस का?’ या चित्रातील इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी याच्या अर्कचित्राकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

बोरीस यांची अर्कचित्रावरची हुकमत म्हणजे निव्वळ चेहऱ्याचा सारखेपणा नव्हे, तर त्या व्यक्तिरेखेची देहबोली आणि चेहऱ्यावरचे हावभाव रेखाटण्यातही ते माहीर होते. त्याशिवाय चित्राची रचना, तोल हे तर होतंच; पण या सर्वापेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांचं राजकीय भाष्य! ते जबरदस्त असायचं. एखाद्या राजकीय नेत्याची खिल्ली उडवण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. त्यामुळे ते त्या काळातले अत्यंत महत्त्वाचे राजकीय व्यंगचित्रकार ठरले.

महायुद्ध संपल्यानंतर ते अनेक रशियन सरकारी प्रकाशनांसाठी व्यंगचित्रं काढत होते. शीतयुद्धाच्या काळात एक मोठा प्रसंग घडला. अमेरिकन सैन्य उत्तर ध्रुवावर आपल्या हालचाली वाढवत होतं. त्यावर बोरीस यांनी व्यंगचित्र काढलं. एस्किमो, बर्फ, पेंग्विन वगैरे वगैरे आणि अमेरिकन सैन्याच्या छावण्या.. आणि भाष्य होतं- ‘अमेरिकेला वाटतंय, कदाचित हे एस्किमो अमेरिकन सैन्याला घातक ठरू शकतील!! ’ पण हे व्यंगचित्र प्रकाशित होण्याआधी स्टॅलिन यांच्याकडे गेलं. त्यांनी बोरीस यांना बोलावून घेतलं आणि त्यात त्यांनी लाल पेन्सिलने काही  सुधारणा सुचवल्या. ‘‘अमेरिकेच्या हालचाली या मूर्खपणाच्या आहेत! त्यामुळे रशियाला काहीच फरक पडत नाही..’’ अशा आशयाची स्टॅलिन यांची कॉमेंट होती.

बोरीस घरी गेले. त्यांचं मन द्विधा नव्हे, तर त्रिधा अवस्थेत होतं. त्यांच्यासमोर काही विकल्प होते. एक म्हणजे स्टॅलिन सांगेल तसं चित्र काढून द्यायचं किंवा अजिबात काढायचं नाही, किंवा मग खूप वेळ लावायचा!! यामागे एक महत्त्वाचं कारण हेही होतं की, बोरीस यांच्या सख्ख्या भावाला स्टॅलिनने पक्षविरोधी कारवायांचं कारण पुढे करून फाशी दिलं होतं. तो राग आणि भीती त्यांच्या मनामध्ये होती. त्यांनी वेळकाढूपणा करायचं ठरवलं. पण त्याच दिवशी दुपारी तीन वाजता स्टॅलिन यांचा फोन आला आणि उद्या संध्याकाळपर्यंत व्यंगचित्र पाठवून द्या असं त्यांना सांगितलं. बोरीस यांचा नाइलाज झाला. त्यांनी सुधारित चित्र दिलं. ते प्रसिद्धही झालं. पुढे अमेरिकेबरोबर रशियाची बोलणी सुरू असताना अमेरिकेने या व्यंगचित्राबाबत स्टॅलिन यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. बोरीस यांचे मूळ व्यंगचित्र आणि त्यावर स्टॅलिन यांच्या लाल रेषांच्या सुधारणा हे स्टॅलिन यांच्या दिवाणखान्यात नंतर अनेक र्वष होतं.

महायुद्ध संपल्यानंतर युद्ध-गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी झालेल्या खटल्याला ‘नुरेम्बर्ग ट्रायल्स’ असे म्हणतात. विशेष म्हणजे अनेक महिने चाललेल्या या खटल्याचं कामकाज पाहण्यासाठी अनेक देशांनी व्यंगचित्रकारांनाही पाठवलं होतं. त्यात रशियातर्फे कुक्रिनिस्की आणि बोरीस एफीमोव हे व्यंगचित्रकार होते.

जाता जाता एक (बिन)महत्त्वाची माहिती.. व्यंगचित्रकार बोरीस एफीमोव यांचा पगार त्या काळात रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांच्या पगारापेक्षा चार पटीने अधिक होता!