शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर इथून एम. बी. बी. एस. आणि त्यानंतर तामिळनाडूच्या चिंगलपुट इथल्या ‘सेंट्रल लेप्रसी ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट’मध्ये कुष्ठरोगावरील उपचारांचं पदव्युत्तर प्रमाणपत्र प्रशिक्षण घेऊन मी १९७३ मध्ये आनंदवनात ‘प्रशिक्षित निवासी डॉक्टर’ म्हणून दाखल झालो. कुष्ठरोग जरी मला परिचयाचा होता, तरी औषधांच्या नव्या ट्रायल्स, नवी संशोधनं, उपचार पद्धतीमधले बदल इत्यादी अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी मला या प्रशिक्षणाचा फायदा झाला. सोमनाथ आणि नव्याने होऊ घातलेल्या इतर प्रकल्पांच्या व्यापामुळे बाबा आमटे कायम फिरतीवर असत. इंदूही बहुतेक वेळा त्यांच्या सोबत असे. त्यामुळे आनंदवनात जरी शेती आणि इतर उद्योगधंद्यांसाठीच्या व्यवस्था तशा सुरळीत लागलेल्या होत्या, तरी हॉस्पिटलसोबत आनंदवनाचं इतर व्यवस्थापन मलाच सांभाळावं लागणार होतं.
डॉक्टर बनून आनंदवनात परत आलो आणि पांढरा कोट घालून पेशंट तपासायला सुरुवात केली. पेशंट येत होते, मी तपासून गोळ्या-औषधं देत होतो आणि ते निघून जात होते. अनेक दिवस हे चालू होतं. मात्र, एक अंतर कायम होतं. मला हे अंतर खूप अस्वस्थ करू लागलं. त्या दिवशी पांढरा कोट काढून टाकला आणि ‘डाक्टर सायबा’चा मी ‘भाऊ’ कधी झालो, हे माझं मलाच कळलं नाही! शिवाय एक गोष्ट सतत जाणवत होती, की नुसतं कुष्ठरोगावर उपचार करून भागणार नाही, तर माणसांच्या उद्ध्वस्त मनांवर उपचार होणं जास्त गरजेचं आहे. कुष्ठरोग झाल्यामुळे समाजाने आणि कुटुंबाने दूर लोटलेल्या एका तळागाळातल्या व्यक्तीच्या मनावरचे आघात खूप प्रचंड आणि गहिरे असतात. ‘गोली खा, पानी पी’ We micro-need आहे. मात्र, आरोग्याबाबत दृष्टिकोन Holistic हवा, हे माझ्या लक्षात आलं. मग दोन तत्त्वं प्रमाण मानून कामाला लागलो.. ‘‘Not ‘Forl the people; but ‘With’ the peoplell आणि ‘‘क am in the office; but not the Boss.ll
आनंदवन लेप्रसी हॉस्पिटलचं कामकाज आनंदवनाच्या पहिल्या फळीतल्या कुष्ठमुक्त आरोग्य कार्यकर्त्यां गीताबाई नेमाडे आणि त्यांनी तयार केलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालत असे. पण त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण तर होताच; शिवाय त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यासही मर्यादा होत्या. तेव्हा पहिला प्रशिक्षित निवासी डॉक्टर या नात्याने मी आधी हॉस्पिटलची व्यवस्था लावण्याचं काम हाती घेतलं. आनंदवनातील कुष्ठरुग्णांचं वर्गीकरण करणं, नव्याने भरती होणाऱ्या कुष्ठरुग्णांचं आजाराच्या प्रकाराप्रमाणे वर्गीकरण करणं, औषधं आणि इतर साहित्याच्या नोंदी ठेवणं.. असं बरंच काय काय. बाबांच्या तालमीत तयार झालेली आणि अत्यंत सचोटीने काम करणारी गीताबाईंची फळी माझ्या नव्या कार्यपद्धतीशी जुळवून घ्यायला तयार नसे. मग काही शिक्षित तरुण कुष्ठमुक्त, अपंग व्यक्तींना सोबत घेत आणि गीताबाईंचा मूड सांभाळत माझं काम सुरू झालं.
हॉस्पिटलमधला माझा पहिला सहकारी होता- मुरलीधर गभणे. मुरलीधर मूळचा भंडाऱ्याचा. आई-वडील आणि सहा भावंडं असं हे कुटुंब. लहानपणी पक्षाघातामुळे मुरलीधरची उजवी बाजू अधू झाली होती. तेव्हापासूनच तिरस्कृताचं जिणं नशिबी आलेला आणि घरी असूनही अन्नास मोहताज झालेला मुरलीधर दहावीनंतर नागपूरला मावसभावाच्या आश्रयास आला. नागपूरला राहत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो तीन महिने उपचारांसाठी दाखल होता. त्यादरम्यान वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक मुरलीधरला वर्गात बोलावून विद्यार्थ्यांपुढे त्याची केस ‘एक्स्प्लेन’ करत. तिथे त्याची औषधांशी प्राथमिक ओळख झाली. नंतर त्याने नागपूरच्या अपंगांसाठीच्या शेल्टर्ड वर्कशॉपमध्ये बुक बाइंडिंग शिकून घेतलं. वध्र्याला काही काळ फोटो स्टुडिओतही काम केलं. तो विशीत असताना आई-वडील आणि सख्ख्या भावांनी त्याला मारून टाकण्याची धमकी देत कौटुंबिक मालमत्तेतून बेदखल केलं. अखेर नागपूरला परत मावसभावाने त्याला आसरा दिला. जिद्दीच्या मुरलीधरने डाव्या हातापायाच्या बळावर वर्षभर सायकल-रिक्षा चालवून अर्थार्जन केलं. त्यादरम्यान एका वर्तमानपत्रात ‘संधीनिकेतन’ची जाहिरात त्याच्या वाचनात आली आणि १९७३ च्या जानेवारीत तो आनंदवनात दाखल झाला. हे कळताच त्याच्या घरच्यांनी ‘मुरलीधरला कुष्ठरोग झाला म्हणून तो आनंदवनात गेला..’ असा बभ्रा केला! असो. आनंदवनात तो अंध विद्यालयात अटेंडन्ट म्हणून काम करू लागला. एकदा अंध मुलांना तो हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन आला. मी इतर रुग्णांची तपासणी करण्यात जरा व्यस्त होतो म्हणून तो मुलांना घेऊन बाजूला बसला आणि अगदी सहजरीत्या मुलांना औषधांची माहिती देऊ लागला. आश्चर्य वाटून मी त्याला बोलावलं आणि औषधांबद्दल तुला कसं काय माहिती, असं विचारलं असता त्याने आपला पूर्वेतिहास कथन केला. मी लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये कामाला घेतलं. लवकरच मुरलीधर औषधं देण्यात पटाईत तर झालाच; डाव्या हाताने इंजेक्शन्सही देऊ लागला. रक्त-तपासणीच्या स्लाइड्स तयार करणं असो वा एक्स-रे फिल्म्स धुणं.. सगळ्यातच तो तरबेज झाला. एखाद्या प्रशिक्षित कंपाऊंडरलाही जमणार नाही एवढय़ा हातोटीने तो कामं पार पाडत असे. माझा जन्म इथला. त्यामुळे आनंदवनातलं वातावरण मला नवखं नव्हतं. शिवाय मी डॉक्टरकीचं औपचारिक शिक्षणही घेतलं होतं. पण मुरलीधर असो किंवा हातापायाची बोटं झडलेले, वाकडी झालेले अब्दुल करीम, शालिकराम सौसागडे, विठ्ठलराव उसकेवार, विनायक नेवलकर, मधुकर डांगरे हे माझे हॉस्पिटलमधले सहकारी- यांनी स्वतच्या कमतरतांवर मात करत आणि क्षमता ताणत अफाट कामं केली.
आनंदवनात उपचार व पुनर्वसनार्थ येणाऱ्या कुष्ठरुग्णांचा आलेख चढताच होता. देशभरातून रुग्ण येत. कुणी रोगाचं निदान न झालेले असत, कुणी अंगावर चट्टे, हाडापर्यंत खोल जखमा असलेले, तर कुणी कुष्ठमुक्त होऊनही रोगामुळे शारीरिक विकृती आल्याने मानसिक विकृती असलेल्या समाजबांधवांकडून, नातेवाईकांकडून नाकारण्यात आलेले. त्यातील काही रुग्णांची अवस्था फारच गंभीर असे. अंगावर बोट ठेवायलासुद्धा जागा नाही एवढय़ा जखमा, मोठाले फोड, त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या.. या केसेसचं वर्गीकरण ‘Burnt-outl केस म्हणून केलं जात असे. ते दृश्य फारच विदारक असे. हीसुद्धा माणसंच; पण कुष्ठरोगाची बाधा झाल्यापासून ते आनंदवनात दाखल होईपर्यंतचा त्यांचा प्रवास अंगावर काटा आणणारा असे. नातेवाईकांनी नाकारले, समाजाने नाकारले आणि कायद्यानेही नाकारले. रोग होऊनही बराच काळ औषधोपचार न मिळाल्याने कधी लोकांपासून लपून, तर कधी भीक मागत आपल्या जखमा वागवत आयुष्य कंठणारी ही माणसं. सुशिक्षित म्हणवणाऱ्या घरात अंधाऱ्या खोल्यांमध्ये पाच-दहा वर्ष कोंडून ठेवण्यात आलेली, जेवणाचं ताट दाराखालून ढकलण्यात येणारीही काही मंडळी होती. अशांना बस-ट्रेनमध्ये प्रवासाची मुभा नसे. बसलीच तर सीट-बर्थ हमखास रिकामा होणार. कुठूनतरी बाबांचं, आनंदवनाचं नाव कानावर पडल्यामुळे कसाबसा प्रवास करत इथपर्यंत येऊन पोहोचत. चुकून सोबत कधी कुणी आलंच तर ती व्यक्ती गेटवरूनच परतत असे. पुन्हा कधीच न येण्यासाठी! कुष्ठरुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एवढा संकुचित होता, की कुष्ठरुग्णांनाही सर्वसामान्यांप्रमाणे इतर आजार होतात याची जाणीवही कुणाला नसे. कुष्ठरुग्णांचा दवाखाना म्हणजे फक्त कुष्ठरोगावर उपचार.. हेच समीकरण. केवढा टोकाचा तिरस्कार या घटकाने अनुभवला होता, हे डॉक्टर या नात्याने त्यांच्याशी संवाद साधताना मी अगदी जवळून बघू शकत होतो. कुष्ठरोगीच अदखलपात्र होते, तर त्यांना होणाऱ्या इतर आजारांची दखल कोण कशाला घेणार! या पाश्र्वभूमीवर रुग्णांमधील इतर आजारांची, कमतरतांची लक्षणं शोधून त्यांच्यावर उपचार करताना माझ्या मूळ वैद्यकीय प्रशिक्षणाचा मला खूप उपयोग होऊ लागला. समूळ आरोग्य तपासणी करताना आधी मी त्यांचे सगळे ‘व्हायटल पॅरामीटर्स’ चेक करत असे आणि मगच औषधोपचार देत असे. अर्थात या पद्धतीने उपचार कुणीतरी प्रशिक्षित डॉक्टरच करू शकणार होता. तो मिळण्यात मात्र २२ वर्ष गेली! बाबा आणि इंदूने गीताबाई, कौसल्याबाई, शंकरभाऊ, सिंधूमावशी यांच्या साथीने तोवर कशी काय खिंड लढवली, हे त्यांचं तेच जाणोत.
उपचारांनी कुष्ठरोग पूर्णपणे दुरूस्त तर होत होता, पण जखमा हाडांपर्यंत खोलवर गेल्याने काही कुष्ठरुग्णांना येणारं अपंगत्व कायमस्वरूपी असे. त्यांचं चलनवलनच ठप्प होत असे. दैनंदिन कामं करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत त्यांचं आयुष्य सुकर कसं करता येईल यासाठी मी माझं अभियांत्रिकी डोकं चालवू लागलो. अर्थात प्रयोग करण्याची माझी इच्छा असली तरी पशांची चणचण होती. त्यामुळे उपलब्ध साहित्यामधूनच साधनं तयार करावी लागत. हाताची बोटं झडलेल्या रुग्णांना जेवण्यासाठी मदतगार ठरणारी साधनं तयार करणे, पाणी-चहा पिण्यासाठी वाकडय़ा बोटांनीही सहजपणे पकडता येतील असे कप बनवणे, पायात अपंगत्व असलेल्यांसाठी भंगारातल्या लाकडी/ लोखंडी सामानातून कुबडय़ा, शिवाय वापरात नसलेल्या जुन्या लोखंडी पाइप्सपासून फोल्डिंग पलंग आणि व्हीलचेअर्स तयार करणे, असे माझे आणि गिरीधरचे बरेच प्रयोग मेटल फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये सुरू असत. यासोबतच कुष्ठरुग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली वस्तू म्हणजे चप्पल. पायाच्या त्वचेच्या संवेदना पूर्णत: नष्ट झाल्याने पायात खिळा, काटा, काच असं काहीही घुसलं तरी त्यांना जाणवत नसे. कुणी सांगितलं वा स्वतच्या लक्षात आलं तरच आपल्याला जखम झाल्याचं त्यांना कळत असे. पण तोवर जखम कधी कधी हाडापर्यंत पोहोचून जंतूंचा संसर्ग होत असे आणि जखमांचं शुक्लकाष्ठ संपतच नसे. साध्या चपला वापरूनही जखमा होतच असत. चिंगलपुटच्या प्रशिक्षणादरम्यान मला कळलं होतं की, एक विशिष्ट प्रकारचं मजबूत रबर वापरून चपला बनवल्या तर जखमा होत नाहीत. शिवाय कुष्ठरुग्णांच्या पायांनाही ते आरामदायी असतं. ते रबर म्हणजे मायक्रो सेल्युलर रबर (एम. सी. आर.)! त्याचं झालं असं की, जगप्रसिद्ध कुष्ठरोगतज्ज्ञ आणि वेल्लोरच्या Christian Medical College चे सर्जन डॉ. पॉल ब्रँड यांनी ‘एमआरएफ’ कंपनीचे संस्थापक माम्मेन मप्पिलाई यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचं ऑपरेशन केलं होतं. त्या ओळखीतून डॉ. ब्रँड यांनी मप्पिलाई यांना कुष्ठरुग्णांच्या पायांसाठी मजबूत आणि आरामदायक असं रबर तयार करण्याचं आवाहन केलं. मप्पिलाई यांनी आपलं कसब पणाला लावत, एकही पसा न घेता ‘एमआरएफ’च्या माध्यमातून मायक्रो सेल्युलर रबरची निर्मिती केली आणि तामिळनाडूमधल्या कारीगरीच्या The Schieffelin Institute of Health- Research & Leprosy Centre मध्ये १९६५ पासून एमआरएफच्या तांत्रिक सहकार्याने एम. सी. आर.ची निर्मिती सुरू झाली. एम. सी. आर.चा शोध कुष्ठकार्यातलं एक ऐतिहासिक वळण ठरलं. असं हे रबर मी बराच पाठपुरावा करून आमच्याकडे मागवलं आणि मग एम. सी. आर.च्या चपला तयार करण्याचं काम आनंदवनात सुरू झालं.
माझा वैद्यकीय अध्याय सुरू झाला तो असा. दिवसाला कधी कधी २०० पेशंट्सची ओपीडी असे. त्यामुळे माझं जेवण बहुतेक वेळा हॉस्पिटलमध्ये कुष्ठमुक्त सहकाऱ्यांसोबतच होत असे. मी नेहमी म्हणतो की, आम्हा दोघा भावांनी डोळे उघडले आणि प्रथम पाहिले ते आई-वडील आणि कुष्ठरोगीच! त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या जखमांचे दृश्य कितीही भयकारी असले तरी त्या साफ करताना मनात कधी किळस उत्पन्न झाल्याचं माझ्या आठवणीत नाही. सुरुवातीला माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना वाटायचं, की मी घरी जाऊन किमान दोन-तीन वेळा तरी अंघोळ नक्कीच करत असेन! पण असं काही नव्हतं. खरं सांगायचं तर आपण काहीतरी वेगळं वगरे करतो आहोत असं कधी वाटलंच नाही. कुणाचं कुणाशी मैत्र असतं तसं माझं ‘कुष्ठ-मैत्र’, एवढंच..
विकास आमटे vikasamte@gmail.com