मनोहर पारनेरकर

samdhun12@gmail.com

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट

पाश्चात्य संगीत, साहित्य, कला यांवर रोखठोक मल्लिनाथी करत सांस्कृतिक विश्वाचे अनोखे पदर खुमासदार शैलीत उलगडणारे सदर..

सत्यजित रे यांनी एकूण ३६ चित्रपट बनवले. (२९ पूर्ण लांबीचे- म्हणजे फीचर चित्रपट, पाच माहितीपट आणि दोन लघुचित्रपट) त्यातील ३० चित्रपटांना त्यांनी स्वत:च संगीत दिलेलं आहे. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना पंडित रविशंकर (‘अपू’ त्रयी आणि ‘पराश पाथर’), उस्ताद विलायत खान (‘जलसाघर’) आणि उस्ताद अली अकबर खान (‘देवी’) या हिंदुस्थानी संगीतातील तीन दिग्गज कलाकारांनी संगीत दिलं होतं. ‘देवी’ (१९६०) नंतर रे यांचं त्यांच्याबाबतीतलं भारलेपण ओसरू लागलं. जे प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार आहेत, ते सिनेमाची मागणी आहे म्हणून स्वत:च्या कौशल्याला मुरड घालू शकणार नाहीत, हे सत्यजित रे यांना तेव्हा तीव्रपणे जाणवलं. संगीत देण्याबद्दल रे त्यांना काही मार्गदर्शन करायचे, ते तर त्यांना मुळीच आवडत नसे. या गोष्टीमुळे त्यांच्यामधलं घर्षण वाढतच गेलं. (ते काही असो. पण ‘पाथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटात भावना खोलवर हेलावून टाकणारे जे क्षण आहेत, त्याचं श्रेय ग्रामीण वातावरण निर्माण करणाऱ्या रविशंकर यांच्या संगीताला जातं, ही वस्तुस्थिती आहे.) त्यानंतरच्या प्रत्येक चित्रपटागणिक रे यांच्या फिल्म संगीताबद्दलच्या स्वत:च्या कल्पना विकसित होत गेल्या आणि अखेर आपण स्वत:च संगीतरचनाकार झालं पाहिजे, हा निर्णय त्यांनी घेतला.

चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतरचनाकार या एकच व्यक्ती असणं हा अत्यंत दुर्मीळ संयोग आहे. जागतिक सिनेमाच्या बाबतीत विचार करताना आपल्या असं लक्षात येतं, की चार्ल्स चॅप्लिन आणि सत्यजित रे हे दोनच चित्रपटकत्रे या दुर्मीळ गटात मोडू शकतात. या दोघांनीही आपल्या चित्रपटांना आपणच संगीत दिलं आहे. (१९५२ सालच्या ‘लाइमलाइट’ या चित्रपटाच्या संगीताबद्दल चॅप्लिन यांना ऑस्करदेखील मिळालं आहे.) पण याव्यतिरिक्त रे संगीत लिहू, वाचू शकत होते. संगीत अरेंज करू शकत होते. ऑर्केस्ट्रा संचालन करू शकत होते. म्हणूनच ते या प्रजातीतील दुर्मीळातील दुर्मीळ नमुना ठरतात. पुढे दिग्दर्शक झालेला हॉलीवूडमधील नट क्लिंट ईस्टवूड हादेखील स्वत: पियानोवादक आणि संगीतरचनाकार आहे. २००३ नंतरच्या आपल्या सर्व सिनेमांना त्यानं स्वत:च संगीत दिलं आहे. (‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’ या त्याच्या सिनेमातील एकदम झपाटून टाकणारी थीम टय़ून मात्र त्याची नसून, अ‍ॅन्नीओ मॉरिकोन या इटालियन रचनाकाराची आहे.) पण दिग्दर्शक व संगीतरचनाकार म्हणून अतुलनीय कामगिरी करणाऱ्या रे आणि चॅप्लिन यांच्या जवळपासदेखील तो फिरकू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच कारणासाठी या विशेष क्लबमध्ये त्याचा समावेश करता येत नाही.

सत्यजित रे इंग्रजी भाषेत कविता करायचे, पण त्यांच्या बंगाली कविता जास्त चांगल्या आहेत. ‘एलियन’ नावाचा एक सायन्स फिक्शन चित्रपट ते हॉलीवूडमध्ये करणार होते. हा चित्रपट का बनू शकला नाही, याविषयी एक विचित्र शोकांतिका आहे. असो. मुद्दा असा की, त्या सिनेमात पीटर सेलर्स (त्याचा ‘पिंक पँथर’ हा चित्रपट आठवतो का?) एक महत्त्वाची भूमिका करणार होता. पण त्याने आयत्या वेळी रे यांना नकार दिला. अत्यंत निराश होऊन रे यांनी पीटर सेलर्सला एक मजेदार कविता लिहून पाठवली. ती अशी :

Dear Peter, if you had wanted bigger part,

Why, you should have told me right at the start,

By disclosing it at this juncture

You have surely already punctured

The Alien- balloon

Which I dare say

Will be grounded soon

Causing a great deal of dismay

To Satyajit Ray

रे यांनी त्यांच्या दोन सिनेमांसाठी गाणी लिहिली. १९६० सालच्या ‘देवी’ या चित्रपटातील एकमेव भक्तिगीत आणि १९६८ सालच्या ‘गोपी गाईने बाघा बाईने’ या चित्रपटातील सात खूपच विनोदी अशी गाणी लिहिली.

‘‘मी जर सिनेमाचा एकमेव प्रेक्षक असेन तर सिनेमात संगीताचा वापर मी करणार नाही,’’ असं रे एकदा म्हणाले होते. संगीत हे सिनेमाचं बाह्यंग आहे असं त्यांना नेहमीच वाटत आलं होतं. चांगल्या चित्रपटकर्त्यांला संगीताचा वापर न करता पूर्णपणे अभिव्यक्त होता आलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. पण रे हाडाचे वास्तववादी होते. त्यांच्या चित्रपटातील अतिशय सूक्ष्म, तरल दृक्प्रतिमा शहरातील सुसंस्कृत प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संगीताचा वापर अनिवार्य आहे हे त्यांना पक्कं उमगलं होतं. अतिशय समर्थ अशा या श्राव्यसाधनाचा अत्यंत कल्पकतेनं, कमीत कमी आणि अतिशय प्रभावशाली असा उपयोग त्यांनी केला आहे. पूर्ण शांततादेखील त्यांनी खूप मोठय़ा कालावधीसाठी वापरली आहे. शिवाय नैसर्गिक नादांचा वापरदेखील केला आहे. उदाहरणार्थ, पक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ, मोटारींचे हॉर्न, इ. आणि त्यातून आश्चर्यकारक परिणाम साधला आहे.

आपल्या सिनेमामधून रे यांनी अभिजात पाश्चात्त्य संगीताचा सढळ हस्ते वापर का केला असावा? चित्रपटकर्त्यांला संगीताची गरज प्राथमिकत: वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक असते. शिवाय- १) सिनेमाच्या कथेतील पात्रांच्या अनुभवास येणारी स्थित्यंतरं दर्शवण्यासाठी, आणि २) अत्यानंदापासून ते तीव्र शोकापर्यंतच्या सर्व भावभावना अधोरेखित करण्यासाठी!

आपलं संगीत बरंच आलंकारिक आहे. त्यामुळे सौंदर्यनिर्मिती होऊ शकते किंवा उदात्त भाव निर्माण होऊ शकतो, पण नाटय़मयता निर्माण होऊ शकत नाही. कारण त्यात परस्परविरोध किंवा संघर्ष नसतो. त्यामुळे नाटय़मय प्रसंगासाठी ते पुरेसं नसतं. तर दुसऱ्या बाजूला पाश्चात्त्य संगीतात षड्ज नेहमीच स्थिर नसतो. तो बदलू शकतो. या बदलाला मेजर आणि मायनर स्केल्सची जोड देऊन प्रचंड प्रमाणात भावनांची आंदोलनं निर्माण करता येतात. त्यामुळे परस्परविरोध, संघर्ष आणि त्यातून नाटय़ निर्माण करता येतं.

आपण पाश्चात्त्य संगीतात भारतीय संगीत का मिसळलं, या प्रश्नाचं उत्तर स्वत: रे यांनी एका फ्रेंच टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत दिलं. ते म्हणतात, ‘‘मी युरोपियन आणि पौर्वात्य किंवा प्राच्य संगीताचं मिश्रण करतो, कारण आमची जीवनशैलीच मिश्रित आहे. ते काहीही असो, पण सिनेमाचा आशय आणि रूप जर समकालीन असेल- विशेषत: शहरी समकालीन- आणि तुम्ही जर निखळ भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर सिनेमात केला तर ते योग्य वाटत नाही. म्हणून मी बहुतेक वेळा त्यांचं मिश्रण करतो.’’

पाश्चात्त्य कलासंगीताच्या वापराची रे यांच्या चित्रपटातली अनेक उदाहरणं देता येतील. पण मला जी अत्यंत महत्त्वाची वाटतात अशी तीन उदाहरणं देतो. १) ‘शाखा प्रशाखा’ हा रे यांचा एक अभिजात चित्रपट. या चित्रपटात बाख आणि बीथोव्हन यांच्या संगीताचा रेंनी अतिशय विचारपूर्वक आणि मुक्तहस्ते वापर केला आहे. या चित्रपटात दोन विषयांगं अतिशय सामर्थ्यवान आहेत आणि चित्रपटात ती पुन्हा पुन्हा अवतरतात. त्यांना उठाव देण्यासाठी त्यांनी हा वापर केला आहे. त्यातलं पहिलं.. आनंद मुझुमदार हा एक श्रीमंत उद्योगपती आहे. परस्परविरोधानं ग्रासलेल्या त्याच्या एकत्र कुटुंबातील निराशा आणि उद्ध्वस्तपणा यांचं चित्रण करण्यासाठी रेंनी पाश्चात्त्य कलासंगीताचा वापर केला आहे. आणि दुसरं म्हणजे- आनंद यांचा मुलगा प्रशांत हा मनोरुग्ण असतो. तो पाश्चात्त्य संगीतात आधार शोधत असतो. त्याच्या मनात उठणाऱ्या भावनांच्या तीव्र कल्लोळांचं चित्रण करण्यासाठी त्यांनी पाश्चात्त्य कलासंगीताचा वापर केला आहे. या चित्रपटातला एक उच्च बिंदू असा आहे की- प्रशांत ‘कायरी एलियेसन’ (‘परमेश्वरा दया कर..’ ही ग्रेगरियन चॅन्ट- काहीशी आपल्या वेदिक ऋचेसारखी!) ऐकत असतो. केवळ परमेश्वरच आमच्या कुटुंबाच्या जखमा भरून काढू शकतो आणि आमच्यावर शांती व आनंदाचा वर्षांव करू शकतो, अशी काहीशी भावना यामधून व्यक्त होते.

२) १९५८ सालच्या ‘जलसाघर’ या चित्रपटात एक प्रसंग आहे. या सिनेमातील प्रमुख पात्र विश्वंभर रॉय हा विझत चाललेल्या झुंबरांकडे बघत असतो आणि आपल्यावर ओढवणाऱ्या सर्वनाशाची भीती त्याला घेरून टाकते. रॉय यांना जी दहशत वाटते, ती विलायत खॉंसाहेबांच्या सतारीच्या संगीतातून (ते कितीही प्रगाढ असलं तरी!) पूर्णपणे व्यक्त होऊ शकणार नाही असं रेंना वाटलं. म्हणून हव्या असलेल्या नादाचा पोत मिळवण्यासाठी त्यांनी खॉंसाहेबांच्या संगीतात फिनलंडचे रचनाकार सिबेलियस यांचं संगीत उलटं वाजवत मिसळलं.

३) १९६४ सालचा रे यांचा सिनेमा ‘चारुलता’! त्याची संरचनाच मोझार्टच्या ‘जी मायनर’मधील String Quintet वर आधारलेली आहे. या सिनेमातल्या पाच पात्रांचं प्रतिनिधित्व पाच String वाद्यांच्या नादानं केलं आहे : दोन व्हायोलिन, दोन व्हायोला आणि एक चेलो. हे नाद त्यांनी संवादी आणि विरोधी तत्त्वांनी वापरले आहेत.

शब्दांकन : आनंद थत्ते

Story img Loader